Skip to main content

विकासाचे पर्यायी मॉडेल

लेखक संदीप ताम्हनकर यांनी रविवार, 22/10/2017 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातल्या पर्यावरणवादी आणि प्रकल्प विस्थापितांच्या हक्कांसाठी अनेक वर्षे चळवळ आणि आंदोलने चालवणाऱ्या आदरणीय नेत्या मेधाताई पाटकर यांच्या भाषणाला गेलो होतो. त्यांनी पोटतिडकीने विषयाची मांडणी केली. भाषण नक्कीच प्रेरणादायी होतं. भाषणात अनेक विषयांवर त्या बोलल्या.

नवीन आहे

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी शनिवार, 21/10/2017 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
एक गझल लिहिण्याचा प्रयत्न आहे. जाणकारांनी जरूर मार्गदर्शन करावे. विशेष सूचना- हौशे, नवशे, गवशे ह्यांनी दूर राहावे ( हे मिपावर कमी मात्र झुक्या फॅमिलीत विपुल आहेत) व आपापल्या मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी "मी चंद्र आणेल किंवा का गं सोडून गेलीस मला, एकटे टाकून गेलीस मला " ह्या प्रकारातील काव्य वापरावे जे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
काव्यरस

रूम नंबर- 9 (गूढकथा)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 21/10/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
आसावरी सहा महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जातांना तिच्या मनात कालच्या “लाईफ वेलनेस सेमिनार” चा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता – “तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून!

कागदाचे झाड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

हे टाळता आले असते? वारिग फ्लाईट २५४

लेखक लाल टोपी यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षांत मलेशियन एअरलाइन्सच्या, एअर एशियाच्या किंवा काही दिवसांपूर्वी कोलंबियात फुटबॉल संघाच्या विमानाला अपघात झाले आहेत. नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरी या वाहिन्यांवर 'एअरक्रॅश इन्व्हेस्टिगेशन' ही मालिका नियमित पाहत असे. विमान अपघाताच्या कारणांचा मागोवा घेण्याची प्रक्रिया अतिशय रोचक पद्धतीने या मालिकेत मांडली जात असे.

भाऊबीज

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोहडोळ्यात डोकावणारे मला पाहवेनात ते चेहरे गळाभेट होता स्वतःची स्वतःशी किती व्हायचे कावरेबावरे तुझा श्वास होई कुणाची रुबाई उसासा गझल अन मिठी स्पंदने कुणी ओठ ओठांत घ्यावेत अलगद कुणी उतरवावीत आभूषणे खुला केशसंभार रजनी कुणाची कुणा चोरटा स्पर्श तो आवडो कुणी फक्त यावे, कुस्करून जावे कळ्या सापडो वा फुले सापडो तुझी देहवीणा अशी कर्मयोगी सुरांची तिच्या व्हायची साधना मला सारखे हेच वाटायचे की बघ्याचीच माझी असे भूमिका ठरवले जरासे तुझे व्हायचे मी पहाटे पहाटे तुला भेटतो तुला ठेवतो चांदणे शुभ्र माझे तु

उनाडटप्पू

लेखक चॅट्सवूड यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
"उभ्या लाइफमध्ये काहीतरी आडवं केलं पाहिजे" असं म्हणून लौकिक खाली बसला. त्याने त्याची निळ्या रंगाची, उजव्या पायातील स्लीपर हातात घेतली. स्लीपरचा बंद बाहेर आला होता, तो जागच्या जागी बसवू लागला. "भावा... मर्दा.... करू या काहीतरी" लौकिकच्या खांद्यावर हात ठेवत प्रतीक म्हणाला. लौकिक आणि प्रतीक नेहमीसारखे 'विपुल की चाय' टपरीवर चहा घेत होते. हा त्यांचा नेहमीचा कट्टा होता. प्रतिक आणि लौकिक... दिसायला तसे साधारण, वागण्यात असाधारण. जीवनाबद्दल काहीच धोरण त्यांच्याकडे नव्हते.

हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा

लेखक मार्गी यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
. एखाद्या माणसामध्ये जिद्द असेल, हिंमत असेल, तळमळ असेल तर नियती त्याला कुठून कुठे नेते, ह्याचे अतिशय तेजस्वी उदाहरण म्हणजे हेईनरिश हारर! स्वामी विवेकानंदांनी निर्भयता हा गुण धार्मिकतेचा मुख्य सद्गुण सांगितला गेला आहे. कशालाही आणि मृत्यूलाही न घाबरणारा माणूसच खर्‍या अर्थाने धार्मिक असतो.