तुझ्या डोहडोळ्यात डोकावणारे
मला पाहवेनात ते चेहरे
गळाभेट होता स्वतःची स्वतःशी
किती व्हायचे कावरेबावरे
तुझा श्वास होई कुणाची रुबाई
उसासा गझल अन मिठी स्पंदने
कुणी ओठ ओठांत घ्यावेत अलगद
कुणी उतरवावीत आभूषणे
खुला केशसंभार रजनी कुणाची
कुणा चोरटा स्पर्श तो आवडो
कुणी फक्त यावे, कुस्करून जावे
कळ्या सापडो वा फुले सापडो
तुझी देहवीणा अशी कर्मयोगी
सुरांची तिच्या व्हायची साधना
मला सारखे हेच वाटायचे की
बघ्याचीच माझी असे भूमिका
ठरवले जरासे तुझे व्हायचे मी
पहाटे पहाटे तुला भेटतो
तुला ठेवतो चांदणे शुभ्र माझे
तुझे विश्व माझ्याकडे ठेवतो

वाचने
5004
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आह..
अरर,
अवघड आहे वाचायला.
भेदक
बेला, अत्यंत हृदयस्पर्शी
हेच
In reply to बेला, अत्यंत हृदयस्पर्शी by यशोधरा
निश्चितच भिडणारी कविता !
हम्म
तुझ्या डोहडोळ्यात डोकावणारे