Skip to main content

य मजा आणणारा फाफे!

लेखक हर्मायनी यांनी सोमवार, 30/10/2017 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
टॉक करत डोक्यातील विचारचक्रे फिरवणारा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, आपल्या हुशारीने गुंडाना, देशद्रोह्यांना पकडून देणारा हा सहावी-सातवीत भेटलेला हा सुपरटॅलेंटेड सुपरहिरो विदाउट सुपरपॉवर पुन्हा येतोय हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया होती अर्थातच टॉक!! नवरा देखील फाफे फॅन असल्यामुळे चित्रपट पाहायला जायचा निश्चितच होतं. मग पहिल्या दिवशीच जाऊन आलो. आपल्याला भेटलेला बन्या आता मोठा झालाय. आत्ताच्या पिढीतल्या कोणत्याही मुलाप्रमाणे तोही मोबाइल, इंटरनेटचा पूर्णपणे वापर करतोय. मेडिकलची प्रवेश परीक्षा द्यायला तो पुण्याला भा. रा. भागवतांकडे येतो.

बीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 30/10/2017 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्‍या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच इण्टरेस्ट ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा 'रेल फॅन च्या नजरेतून' नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील. काही वेळा खूप तपशीलात न शिरता सीन असतो. फक्त एका रॅण्ड्म गाडीच्या टपावरून. तेथे काही गोची असण्याची शक्यता कमी असते. काही जुन्या गाण्यांमधे डब्याच्या आतले सीन्स आहेत.

उजाडताना उल्कांचे व्रण

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/10/2017 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिवधनुष्य एका हाताने सहज उचलले भात्यामध्ये शब्दच होते, नंतर कळले कवितेच्या दरबारी नवशब्दांची मनसब मिळता कोठे झुकायचे ते नाही कळले शब्दप्रभूंना वाट विचारीत इथवर आलो शब्द कधी रक्तातच भिनले, नाही कळले पुन्हा पुहा मी अंधाराशी केली सलगी उजाडताना उल्कांचे व्रण शब्दच झाले
काव्यरस

यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 30/10/2017 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे बनेशच्या जिगरी दोस्त शरद शास्त्रीने म्हटलेली ही ओळ ह्या चित्रपटालाही तन्तोतन्त लागू पडते. मुळात फास्टर फेणेची कथा चित्रपट स्वरूपात मान्डणे हे मोठे धाडसाचे काम आहे. धाडसाचे अश्यासाठी की मध्यम वयीन आणि सत्तर ऐशीच्या दशकातील पिढीच्या डोळ्या मनात फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा ठसलेली आहे त्यामुळे त्या व्यक्तीरेखेला जरा जरी धक्का लागला तरी हा प्रयोग फसण्याची भिती होती. तसेच हॅरी पॉटर च्या जमानातल्या नव्या पिढीला फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा तितकीशी माहीत नाही. त्यामुळे ही व्यक्तीरेखा चित्रपटात उभी करणे हे मोठे धाडसाचे काम होते.

x

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 29/10/2017 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदर सुंदर सकाळ झाली. सुंदर सुंदर सुर्य उगवला. काळ्या लाल पिसांचा सुंदर कोबडा भल्या सकाळी सुंदर आरवला. नदी सुंदर दिसत होती. झाडे सुंदर दिसत होती. आभाळही सुंदर दिसत होते. अधूनमधून ढग दिसत होते. तेही तितकेच सुंदर होते. जागोजागी धुके पसरले होते. ते ही तितकेच सुंदर होते. कुठेसा थोडासा हलकासा भुरभुरा पाऊस पडत होता. तो ही तितकाच सुंदर होता. एका सुंदर झाडाखाली म्हसोबाचे एक सुंदर देऊळ होते. त्याच्या पायऱ्यांवरती फुलांचा सुंदर सडा पडला होता. 'ही पण एक सुंदर दुपारंच म्हणायची' काळ्या पाषाणावर झोपलेल्या वैराग्याने हात वर करून कडकडून आळस देत मनाशीच म्हटले.

Making of photo and status : ४. टम्म् फुगीर जॅकेट!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 29/10/2017 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या मुलाचे जॅकेट पहा, कसे वारा भरल्याने फुग्यासारखे टम्म् फुगले आहे ते !!!

आंबराई

लेखक चांदणशेला यांनी शनिवार, 28/10/2017 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
ये साजणी आंबराईतल्या आडापाशी आतुरल्या भेटाया दोन जीवांच्या वेशी सांगू नकोस सखीला आपुलं गुपित होईल गावभर बोभाटा विसरून रीत किती दिस झालं होईना नजरेच्या गाठीभेटी बघाया तुला केली झाडांवर राघू मैनांनी दाटी बगळ्यांनी बांधल्या नभात शुभ्र कमानी वाहणाऱ्या ओढ्यतले जरासे थबकले पाणी ये चुकवून आडवाटेचे खट्याळ डोळे घुमू लागली काळजात एकांताची मुकी वादळे
काव्यरस

इतिहास व्याख्यान - पाक्षिक सभा

लेखक मनो यांनी शनिवार, 28/10/2017 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी भारत इतिहास संशोधक मंडळात काही गोष्टींविषयी शुक्रवार दि. ०३ नोव्हेंबर २०१७ संध्याकाळी ६.३० वाजता एक व्याख्यान देतो आहे. इतिहासात रस असलेल्या सर्वानी जरूर या, तुमचे स्वागतच आहे. इतर तपशील, विषय, स्थळ इत्यादी ===================== श्री राजा शिवछत्रपती महाराज आणि ज्ञानियांचा राजा श्री ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे दोन मानबिंदू. भारत इतिहास संशोधक मंडळातल्या शुक्रवार ०३ नोव्हेंबरच्या पाक्षिक सभेत या दोन्ही विषयी एकत्रित आजपर्यंत अप्रकाशित आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे कागद आणि चित्रे याविषयी श्री मनोज दाणी यांच्या व्याख्यानाचा योग जुळून येत आहे.

ग्राम"पंचायत" लागली..!! -5

लेखक विशुमित यांनी शनिवार, 28/10/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ "मंगेश कारभारी इकडे या", नानांनी त्यांच्या २ नंबरच्या भावाच्या नातूला हाक मारली. आजोबा वारल्या नंतर चुलत्याबरोबर समांतर कारभारपण त्याच्या वाट्याला आले होते. अर्थातच हा युतीचा कारभार कुरबुरीचा होता. उभ्या आयुष्यात पोपटमामा नानांशी बोललेला मी पाहिला नाही. कारण सिम्पल होते. त्याचे लग्न नानांनी त्याला पोरगी न दाखवताच परस्पर लावून दिले होते.

चोर कोण?

लेखक नेत्रेश यांनी शनिवार, 28/10/2017 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
अस्सा संताप आला होता! चोरी, आणी ती ही माझ्या अंगणात? बघतोच आता. तर मंडळी, आज शुक्रवार, तेव्हा ऑफीसमधुन संध्याकाळी जरा लवकर परतलो. घरी कुणीच नव्हते. मागे पाहीले तर उन्हाने सर्व झाडे कोमेजलेली वाटली. अंगणात गेलो तेव्हा या आठवड्यात माळ्याने टांग दील्याचे दीसले, हा येवढा परसातल्या पानांचा कचरा. ते वाढलेले काम पाहुन जरासा मुड ऑफ झाला. हल्ली असे बर्‍याचदा करायला लागलाय , तरीच त्याला शेजार्‍याने काढले असणार. मनातच त्याला दोन शीव्या घातल्या. या आठवड्यानंतर त्याला काढुन शेजार्‍याकडे येणार्‍या माळयाला ठेवायचा विचार करायला हवा. तर सुकत आलेल्या झाडांना पाणी घालण्याचे काम चालु केले.