द्रव्यांचे जवळ येणे व दूर जाणे (Substances and their movements)
नितळ पाण्याच्या तळ्यातील माशांचा व इतर जलचरांचा वेध घेणे हे चिंतनशील अशा विक्रम राजाचा आवडता छंदच. अहाहा काय ते सुंदर दृष्य..पाण्याचा उथळ पृष्ठभाग सकाळच्या कोवळ्या किरणांमध्ये लख्ख उजळून निघावा. सकाळच्या किरणांचं आगमन झाल्यावर अनाहूत पाहुण्यांच्या आगमनाने होते तशी पाण्यातल्या सर्वच माशांची, कासवांची, ओक्टोपसांची व इतरेजनांची गडबड व्हावी. मग मासे एकमेकांकडे यावेत. काहीतरी बोलल्यासारखे करावेत व पुन्हा इकडे तिकडे जावेत. काही जोरात जावेत काही हळूहळू जावेत. काही चिमुकले असावेत तर काही शार्क, देवमाश्यासारखे अतिमहाकाय असावेत.
मिसळपाव