Skip to main content

लाज

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/02/2018 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
******************* पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते ******************* © विशाल विजय कुलकर्णी
काव्यरस

माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 15/02/2018 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

प्रचलित गणनापद्धति, १ ते ९ हे अंक, ० हा अंक आणि स्थानाप्रमाणे अंकाने दर्शविलेले मूल्य असणे ह्या सर्व बाबी अज्ञात अशा प्राचीन हिंदु गणितज्ञांची विश्वाला देणगी आहे हे आता सर्वमान्य झाल्यामध्ये जमा आहे. रोमन, ग्रीक किंवा तत्पूर्वीच्या बाबिलोनियन इत्यादि पद्धतींमध्ये नसलेले गणनाकौशल्य ह्या पद्धतीने जगाला दिले आणि भौतिक शास्त्रांची पुढील सर्व प्रगति ह्या गणनापद्धतीच्या पायावर उभी आहे ह्याविषयी दुमत नाही. आकडा कितीहि मोठा असू दे, ह्या पद्धतीमुळे तो सुतासारखा सरळ होते आणि बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकर असे संस्कार स्वत:वर निमूटपणे करून घेतो.

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ५ - क्बाल स्पीन, तोन्ले साप सरोवर आणि नॉमपेन्ह

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 15/02/2018 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ५ - क्बाल स्पीन, तोन्ले साप सरोवर आणि नॉमपेन्ह.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ ह्या मालेच्या पहिल्या भागामध्ये उल्लेखिल्याप्रमाणे ख्मेर साम्राज्याचा प्रारम्भ ’महेन्द्रपर्वत’ नावाच्या पर्वतावर इ.स.८०२ च्या सुमारास झाला.

फुटकळ लिखाण ...

लेखक विदेशी वचाळ यांनी गुरुवार, 15/02/2018 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस काहीच लिखाण झाले नाही. असे झाले कि कसेसेच वाटते. आपण लेखक नाही ह्याची जाणीव मला आहे. पण अधून मधून विचार प्रकट करत राहावे असे वाटते. आपले विचार हि आपल्या जिवंतपणाची खूण आहे असे वाटत राहते. तर झाले असे आहे कि आज सकाळी सकाळी बरे वाटेनासे झाले. येथे सध्या वेग वेगळ्या व्हायरस मंडळींनी बस्तान बसवले असल्याने कधी कोणता व्हायरस ना सांगता भेटीला येईल ह्याचा नेम नाही. त्यातलाच एक व्हायरस माझ्याकडे माहेरपणाला आला आहे असे वाटते. माहेरवाशीण जशी जास्त काळ राहू शकत नाही तसाच हा पण लवकरच जाईल बहुदा. सकाळी सकाळी उठून थोड्यावेळातच परत मुरगाळून पडलो.

<नाव सुचवा>

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 14/02/2018 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या त्या निरागस आनंदामागेही थोडेसे बालिश शौर्य असेल बहुतेक बागेत सापडलेल्या नारळाला धागे बांधून बनवलेले टेलिफोन मी झोपी गेलो तू तरीही बोलतच राहिलास तू बोललास मरणाला काय घाबरायचे? मुलींचे कपडे घालून काढलेल्या फोटोंची मात्र तुला भीती वाटत असावी. नाहीतर कुलूप लावून पेटीत का लपवले होतेस? खरेतर ज्या दिवशी तू निघून गेलास, तेव्हा मला वाईट वाटले नाही. जेव्हा तू गाडीचा दरवाजा धाडकन बंद केलास मी सुखावलो होतो जरासा.

पुरस्कार वितरण सोहळा

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 14/02/2018 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ च्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सांयंकाळी ६.०० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्या जवळ मुंबई ४०० ०२१ येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात मला देरसू उझाला या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्वांना माझे आग्रहाचे निमंत्रण. आपला, जयंत कुलकर्णी.

व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 14/02/2018 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा सध्या जगात सर्वत्र प्रेमाला उधाण आलेलं आहे. १४ फेब्रुवारी रोजी साज-या होणा-या 'व्हॅलेंटाईन डे' ची तयारी जोरात सुरू असून दररोज वेगवेगळे दिवस त्यानिमित्ताने साजरे केले जात आहेत. दुकानं, रेस्टॉरंट लाल रंगात न्हाऊन निघाली असून प्रियजनांना भेटवस्तू घेण्याची लगबग सुरू आहे. प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईनडे च महत्व अनन्य साधारण आहे.. मनातील प्रेम व्यक्त करण्याचा किंवा प्रिय व्यक्तीला प्रेमाची नव्याने जाणीव करून देण्याचा हा दिवस.

शेजाऱ्याचा डामाडुमा- सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक - मालदीव भाग ८ (अंतिम)

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 13/02/2018 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील या आधीचे ७ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. सातवा भाग इथे आहे :- https://www.misalpav.com/node/41903 आधीच्या भागांमधून आणि त्यावरील प्रतिसादांमधून मालदीवमधल्या सद्यस्थितीबद्दल बरेच सांगून झाले आहे. सध्या मालदीवमधल्या प्रचंड राजकीय उलाढालींमुळे दुसरे 'कॅक्टस' घडेल की काय अशी स्थिती आहे. त्याच्या बातम्या सर्वत्र आहेतच. याचवर्षी आपल्या अन्य काही शेजारी देशांप्रमाणे मालदीवमध्येही सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्याही प्रसारमाध्यमे कव्हर करतील, त्यात मी आणिक वेगळे काय सांगणार?

धोकेबाज

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/02/2018 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, काय सांगू आणि कुठून सुरुवात करू? कशी आहेस? पाच सहा महिन्यांत एकदा तुझी खुशाली कळते. जग कुठल्या कुठे गेलं पण आपलं गाव अजून तसंच . मोबाईल नेटवर्कच नाही. माणसाने कॉन्टॅक्ट ठेवावा तरी कसा! आणि तू आणि तुझे विचार तर त्या गावापेक्षाही जुने. आठवतं, मी पहिल्यांदी गोव्याला आलो, मला नोकरी मिळाली, तुला गोव्याला घेऊन आलो. तूसुद्धा खूष होतीस पण जेव्हा तुला कळलं की मी बिअर बारमध्ये नोकरीला लागलोय तशी तू त्याच रात्रीच्या एसटीने निघून गेलीस. दारूच्या पैशाने चालणार्या घरात पाणीसुद्धा पिणार नाही म्हणालीस. किती दुखावलंस मला. आजकाल कुणी असं नसतं.

गोव्यातला बसवाला

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 13/02/2018 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यातला बस प्रवास, हा एक विशेष विषय आहे. यासंदर्भातला पैसाताईचा भन्नाट लेख माझी प्रेरणा http://www.misalpav.com/node/14121 तर गोव्यात भरपूर सामान असणं हे बसप्रवास न करण्याचं कारण असू शकत नाही. भरपूर गर्दी असणं हे अपेक्षितच असतं. त्यामुळे ट्रेनने सकाळी लवकर पोहोचवल्यावर बस स्टॉपवर उभी राहिले, तेव्हा मी गोंयकाराला(च) शोभणाऱ्या आरामात उभी होते. बस आली, आणि माझ्याकडचं सामान बघून त्या बॅगांना, आणि त्यांच्यानंतर मला अगोदरच सामानाने भरलेल्या केबिनमध्ये कोंबण्याचा सोहळा झाला. त्यानंतर बस आणि ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा एकत्रच सुसाट सुटले.