द टाईमब्रिज अर्थात कालसेतू –२
भुलीची कोठी आणि त्यासाभोवातलचा रिकामा माळ, जो भुलीचा माळ म्हणून ओळखला जाई, आमच्या गावातले एक कुप्रसिद्ध ठिकाण होते.
गावाच्या बाजूने वळण घेऊन वाहणाऱ्या नदीच्या पलीकडच्या बाजूला दगडाधोंड्यांची एक उतरंड नदीचा चढाव चढत गेली होती. त्यातले काही दगड जुनेपुराणे ताशीव घडीव तर काही अनवट. त्या उताराच्या वरच्या अंगाला काही शेते राने आणि मग एक प्रचंड माळ होता. दहा एक एकर तरी असेल. माळ संपला की काही तुरळक शेते, राने आणि मग जंगल सुरु होत होते. माळाच्या मध्यावर काळ्या करंद घडीव दगडांची प्राचीन वास्तू होती. तिला भुलीची कोठी म्हणत. या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे तिला एकही दरवाजा अगर खिडकी नव्हती.
मिसळपाव