Skip to main content

गूढ अंधारातील जग -९

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 13/06/2018 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -९ पाण्याखालचे वैद्यकशास्त्र आता पर्यंत आपण पाणबुडीतील व्यवहार कायकाय आहेत ते पाहिले. आता पाणबुडीतील सैनिकांना आणि डॉक्टरांना कोणत्या शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते ते पाहणार आहोत.

नेदरलँड्सची सफर भाग -४

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 12/06/2018 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
नेदरलँड्सची सफर भाग -४ एक दिवस ऍमस्टरडॅम मध्ये फिरण्यात घालवून दुसऱ्या दिवशी आम्ही क्यूकेनहॉफ येथे ट्युलिप उत्सव पाहण्यास सज्ज झालो. या उत्सवाची तिकिटे तुम्हाला जालावर काढता येतात आणि हि तिकिटे शिफॉल विमानतळापासून तुम्हाला क्यूकेनहॉफला नेणे आणि आणणे या दोन्ही प्रवासाचा खर्च गृहीत धरूनही काढता येतात. हि सोय फारच चांगली आहे. कारण अगोदरच लिहिल्याप्रमाणे शिफॉल विमानतळ हा सर्व वाहतुकीनी युरोप आणि बाकी सर्व जगाशी व्यवस्थित जोडलेला आहे. त्यामुळे युरोपातील आणि बाहेरील पर्यटक तेथे रेल्वे, विमान किंवा बसने सकाळी येऊन संध्याकाळी परत जाऊ शकतात. असो.

ए पावसा !

लेखक लौंगी मिरची यांनी मंगळवार, 12/06/2018 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
ए पावसा ! थोडं थांबना .. मला जे सांगायचय ते तुला कळतय का सांगना ! सारखच काय ते बरसायचं सारखं आपलं भरायचं , आणि इथे येऊन सांडायचं तुला नाहि का वाटत , थोडा आराम करावासा,? आरामशीर ढगात बसुन खालचा हिरवा गालिचा पहावासा ? ए पावसा ! बास झालं बाबा आता , थोडं तरी ऐकना तुझ्या मनात नक्कि काय आहे ? एकदा तरी सांगना ! ऐकलीस का कुजबुज कधी , “ साला किचाट करतो पाऊस ह्याला कधीपण ढासळायची कसली ती भारी हौस ?? “ मला तु आवडतोस माझं काहिहि म्हणणं नै पण मला नै आवडत ब्वॉ तुला बोललेलं काइबाइ ! म्हणुन सांगते ..

macOS आणि iOS -1 (Change Folder Icon)

लेखक शाली यांनी मंगळवार, 12/06/2018 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS (iPad आणि iPhone) विषयी मला माहित असलेली माहिती देण्यासाठी एक सदर सुरु करावे म्हणत होतो. यात काही टिप्स असतील, ट्रबलशुटींग असेल किंवा मला आवडलेली काही ॲप असतील. किंवा ॲप्पलविषयीच्या नव्या बातम्याही असतील. पण प्रश्न होता भाषेचा. ईंग्रजीत तर लिहायचे नाही आणि मराठीत लिहायचे तर ईंग्रजी शब्दांना पर्याय सापडत नाही. म्हणजे निदान मला माहित नाहीत. मग ठरवले जमेल तसे लिहावे, सुचतील ते शब्द वापरावे. तर आज अगदी साध्या गोष्टीने सुरवात करु. माझ्या डेस्कटॉपवर अनेक फोल्डर असतात. ज्यात माझ्या वेगवेगळ्या कामाच्या फाईल्स असतात.

निरोप

लेखक मकरंद घोडके यांनी मंगळवार, 12/06/2018 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
भावनेची आर्तता भरभरून मांडणारा, सुटलेपणाची, तुटलेपणाची बोचणी देणारा- क्षणापूर्वी आपला असणारा आणि पुन्हा कधी अनुभवता येईल की नाही अशा साशंक वळणावरचा हा क्षण! कुणीतरी देण्यापूर्वी तो घेता यायला हवा असा हा अलौकिक क्षण- निरोप कधी अल्लड वयात घरभर नाचणारी सर्वांना आपलंसं करुन घेणारी लाडकी लेक मायेचा उंबरठा ओलांडून जेव्हा दूरदेशी वेशीपल्याड निघते तेव्हा आई बाबांच्या कापऱ्या हातांना अगदी घट्ट धरून हुंदके देत देत पोरसवदा भावनेने इच्छा नसताना एक निरोप घेते. तिला तो घ्यायचा नसतो आणि मायेच्या माणसांनाही तिला तो द्यायचा नसतो पण हा निरोप ठरलेला असतो.

आपला आवाज कसा रेकॉर्ड करावा [ऑडिओ-व्हिडीओ एडिटिंग / दृक-श्राव्य संपादन] [भाग १]

लेखक चहाबिस्कीट यांनी मंगळवार, 12/06/2018 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ https://www.misalpav.com/node/42802 भाग २ https://www.misalpav.com/node/42838

नमस्कार,

मागे कबूल केल्याप्रमाणे ऑडिओ/व्हिडिओ एडिटिंगवर सदर सुरु करत आहोत. पहिल्या भागात आपण आवाजाचं रेकॉर्डिंग कसं करायचं आणि ते रेकॉर्डिंग ऑडासिटी (Audacity) मध्ये कसं पहायचं हे बघणार आहोत. आम्ही असे गृहित धरले आहे की तुमच्या कडे अँड्रॉइड स्मार्टफोन आहे आणि तुम्ही विंडोज वर काम करत आहात.

राजयोग - १२

लेखक रातराणी यांनी सोमवार, 11/06/2018 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
पहारेकऱ्यांनी निर्वासनासाठी तयार रघुपतीला विचारलं, "ठाकूर, कोणत्या दिशेला जाणार?" रघुपती म्हणाला, "पश्चिम दिशेला.." नऊ दिवस पश्चिम दिशेला प्रवास केल्यानंतर पहारेकरी रघुपतीला घेऊन ढाका शहराच्या जवळपास पोचले. रघुपतीला तिथे सोडून ते परतीच्या प्रवासाला लागले. रघुपती मनातल्या मनात म्हणाला, "कलियुगात ब्राह्मणाचा शाप फळणार नाही. आता बुद्धीनेच काम करायला हवं. बघूया तरी गोविंदमाणिकय काय चीज आहे आणि मी काय चीज!" त्रिपुराच्या सीमेलगत एका छोट्या कोपऱ्यात असलेल्या त्या मंदिरात मुघल साम्राज्याच्या बातम्या काही पोचत नसत.

एक उनाड संध्याकाळ

लेखक सचिन काळे यांनी सोमवार, 11/06/2018 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. "अहो! आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का? आणि हो! बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या" मग काय? ऍडजस्ट करणे भागच होते. मी विचार केला, कामावरूनच तासभर उशिरा निघू.

बांडगूळं

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 11/06/2018 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८)
काव्यरस