macOS आणि iOS-5 (AirDrop)
फाईल्स शेअर करण्यासाठी प्रत्येकवेळेस Finder मध्ये जाऊन file sharing feature ऊघडायचे किंवा ⌘+space वापरुन Spotlight search मधून AirDrop लाँच करणे या द्राविडी प्राणायामापेक्षा जर AirDrop तुमच्या डॉकवरच असेल तर? जशी तुम्हाला वारंवार लागणारी ॲप्स तुम्ही डॉकवर place करता तसे? तर या लेखात आपण AirDrop डॉकवर कसे place करायचे ते पाहू.
AirDrop डॉकवर place करायचे म्हणजे खरं तर AirDrop feature चा शॉर्टकट place करायचा. पण हे feature नेहमी system folder मध्ये असते आणि तेही by default हिडन. म्हणजे सहज शोधायचे म्हटले तर दिसणार नाही. macOS महत्वाचे फोल्डर हिडन ठेऊन एकप्रकारे काळजीच घेत असते.
मिसळपाव