Skip to main content

शांतीदूत भारत

लेखक Sarita Dyahadroy यांनी शुक्रवार, 03/08/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
शांतीदूत भारत भारत अमुचा जगात साऱ्या,विश्वशांतीचा देतो नारा , शांतीदूत हा, या जगताचा बहुधर्माचे बहुवंशाचे, भारतवासी एक दिलाचे, विविधतेत शोधून एकता पालन करिती सहिष्णुतेचे देव धर्म अन ऐक्याची, शिकवण एका गंगेची पवित्र गंगा आणि तिरंगा, वंदन करीतो भारत सारा शांतीदूत हा, या जगताचा हिमालयातून उगम पावती, अवखळ खळखळ नद्या वाहती, पावन तिर्थी मंगल क्षेत्री ,गंगेमध्ये विलीन होती, सवे घेउनी सर्व नद्यांना ,गंगा मिळते थेट सागरा, भारतदेशा दयासागरा,वैश्विकतेचा तुला किनारा, .

पाठमोरी

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 03/08/2018 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
"आपलं कसं है लक्ष्या, वुडलॅन्ड म्हनजे वुडलॅन्ड" "आत्ता पायात सेमच हाय की बॉस, पन जबरीय राव ट्रॅक्टरटायरवानीच दिसतंय बूट" "मग लका, दोन वर्ष बघायचं नाही आता, आधीचा कंटाळा आला राव. चल काढ गाडी" चकचकीत सफारीत बसताना काचेत स्वतःलाच बघताना मात्र कंटाळा येईना. काळा शर्ट, फिटींगची जीन, खाली वुडलॅन्ड्,डोळ्यावर रेबॅन. सगळा साज कसा रोजचा फिक्स. रेबॅनमागचे डोळे मात्र फिरायचे कायम.

अशीही एक गोष्ट

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 03/08/2018 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
अशीही एक गोष्ट कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली. "Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले. "Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली. रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली. **** मिताली आणि रोहन एकाच शाळेत आणि मग पुढे बारावी पर्यंत एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे जाणे-येणे एकत्र. पक्की दोस्ती दोघांची. मिताली प्रचंड बडबडी. रोहन मात्र तसा कमी बोलणारा.

पावसाळी भटकंती: महिमानगड ( Mahimaangad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 03/08/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
माणदेशाच्या दुर्गभ्रमंतीमधे आपण आज महिमानगडाची सफर करणार आहोत. महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण ( दहिवडी ) तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. सातारा-पंढरपूर रस्त्यावर साधारण पुसेगाव सोडल्यानंतर अवतीभोवती उजाड माळरान दिसायला लागतं. हे माळरान आपल्याला माण तालुक्यातील महिमानवाडीपर्यंत सोबत करतं. महिमानवाडी हे या रस्त्यावरचं आणि गडाच्या पायथ्याचं गाव. याच वाडीतून डोंगररांगातून पूर्णपणे विलग झालेल्या गडाचं दर्शन विलोभनीय वाटतं. मध्यम उंचीच्या या गडाच्या सर्व बाजू ताशीव दिसतात.

i care for u

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 02/08/2018 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
" कसा आहेस ? " " तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . " " आपल्यात काही नव्हतं " " तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील " " बाय द वे माझं लग्न झालं " " माहित आहे मला " " तू केलस कि नाहीस लग्न " " जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही " " ओह्ह कोण आहे ती " " तू आणि कोण ? " " माझं लग्न झालय " " माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही " तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं " तुला काय करायचं आहे ?

भाळी लाल कुंकु

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 02/08/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाळी लाल कुंकु गळ्यात काळे मणी अस्तित्व तुझे जाणवे साजणे क्षणोक्षणी * अंगणी रोज शेणसडा रेखते नाजुक रांगोळी जोडव्याचा तो पदान्यास भासे तू नाजुक कळी * सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजला *. तुळशी समोर तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं उजळते माझे जीवन अकुकाका

मिसळपाव साइट - लेख शोध - Template

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 02/08/2018 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव 'शोध' Template मिसळपाव या आपल्या वेबसाइटवर लेख कसे शोधावेत असा प्रश्न 'प्रसाद_१९८२' या वाचक सभासदाने विचारल्यावर " मिपा Android App" आहे त्यातले "शोध" चांगले चालते असे उत्तर दिले. परंतू गुगल प्ले_स्टॅार'वर असे अॅप नाही म्हटल्यावर मी शोधले तर सापडले नाही. माझ्या मोबाइलमध्ये असलेले अॅप उघडून चालते का पाहिल्यावर ते चालत आहे हे कळले. म्हणजे तो कोड अॅक्टिव/व्हॅलिड आहे.

‘अ’ जीवनसत्व : निरोगी दृष्टीचा मूलाधार

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 02/08/2018 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्यजनांना ‘अ’ या नावाने परिचित असलेल्या या रासायनिक घटकाला जीवनसत्वांच्या यादीत ग्रस्थान द्यायला काहीच हरकत नाही. त्याचे अधिकृत नाव Retinol आहे. आपल्या निरोगी दृष्टीसाठी ते अत्यावश्यक असते. याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्वाची कार्ये ते शरीरात करते. गरीब देशांतील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्यांमध्ये त्याचा आहारातील अभाव बऱ्यापैकी आढळतो. त्यामुळे अनेक राष्ट्रीय आरोग्यसेवांच्या माध्यमातून ‘अ’ च्या गोळ्यांचा पुरवठा वंचितांना केला जातो. अशा या महत्वाच्या जीवनसत्वाचा परिचय या लेखात करून देत आहे.

भारांच्या जगात... २

लेखक अजिंक्य विश्वास यांनी बुधवार, 01/08/2018 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत भटांच्या वाड्यातील भुतावळ भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )

लेखक अनाहूत यांनी बुधवार, 01/08/2018 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
" I m sorry " तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . " " नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत . " Its ok " " नाही पण ... " " पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा " " माझा नाही ना आला कंटाळा ? " " काहीही काय " " हो तस असेल तर सांग " " मी जाऊ का , म्हणजे तुला असच बोलायचं असेल तर जाते मी " ती वळून निघाली . " कायमची निघालीस ? मला सोडून ? " त्याच्या डोळ्यात पाणी होत आणि तो याच्यामुळे खूप हर्ट झाला होता . " नाही रे असं काही नाही .