Skip to main content

टॅटू ...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 20/10/2018 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
टॅटू ! आॅपरेशन झालं. अगदी व्यवस्थित पार पडलं. शांत पहुडलेल्या त्या पेशंटकडे समाधानानं पाहात डाॅक्टरांनी मास्क काढला. ग्लव्हज काढून बिनमध्ये टाकले आणि बेसिनवर हात धुवून तोंडावर पाण्याचा सपकारा मारून ते तसेच ओटीमधल्या त्यांच्या आरामखुर्चीत बसले. ती त्यांची सवयच होती. नेहमीच आॅपरेशन पार पडलं की ते इथे बसायचे. तोवर बाकीचा स्टाफ आवराआवर करायचा आणि आरामखुर्चीतून डाॅक्टरांची नजर पेशंटवर खिळलेली असायची. आजची पेशंट वृद्ध असल्याने डाॅक्टरना थोडी काळजी वाटत होती.

दोसतार- १६

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/10/2018 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा दोसतार १५ - https://www.misalpav.com/node/43124
वर्गात कवितेचा उत्सव सुरू होता. वर्गा बाहेरून त्यावेळे कोणी गेले असते तर त्याला एकाच वेळेस दहा बारा रेडीओ ऐकतोय असे वाटले असते. शाळा सुटल्याची घंटाही आम्हाला कुणालाच ऐकू आली नाही आणि त्या अगोदर झालेले" अभ्यासाची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत " हे प्रकटनही ऐकू आले नाही.आम्ही कविता म्हणतच राहिलो. आख्ख्या शाळेच्या इतिहासात झाले नसेल आज प्रथमच कोणालाच घरी जायची घाई नव्हती. तास असाच अजून चालूच रहावा , शाळा उगाच लवकर सुटली.
एकदाची पुस्तके आले.

कढाई छोले

लेखक योगेश कुळकर्णी यांनी शुक्रवार, 19/10/2018 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे ४५ मिनिटे लागतील या पाककृती - दीड वाटी काबुली चणे - २ कांदे बारीक चिरून - १ टोमॅटो + एक टेबलस्पून टोमॅटो सॉस - १० लसणीच्या पाकळ्या ठेचून - इंचभरापेक्षा जरा जास्त आलं किसून किंवा ठेचून - चमचाभर कसूरी मेथी - दीड चमचा छोले मसाला - एक चमचा धणे पूड - एक चमचा जिरेपूड (भाजक्या जिर्‍याची असेल तर जास्त चांगलं) - अर्धा चमचा आमचूर - अर्धा चमचा गरम मसाला - पाव चमचा हळद - हवं असेल तर लाल तिखट पाव चमचा - चवीपुरतं मीठ - चिमूटभर साखर - कोथिंबीर - लोखंडी मोठी कढई असेल तर उत्तम. त्यात करावे. - काबुली चणे ८/१० तास किंवा रात्रभर भरपूर पाण्यात भिजवावे.

भाजा मुंगेर/मुगेर दाल - माझे इंप्रॉव

लेखक योगेश कुळकर्णी यांनी शुक्रवार, 19/10/2018 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
युट्यूब वर रेस्प्या पाहाणं एक टैमपासे माझा. त्यात ही एक रेस्पी दिसली. चांगली वाटली म्हणून आधी जशीच्या तशी केली पण नंतर जरा व्हेरीएशन केले तर जास्त चांगले लागले चवीला. म्हणून इथे ही रेसीपी देतो आहे. नक्की करून पाहा. सुरेख चव येते. घरामध्ये भाजी वगैरे काही नसतांना अतिशय चविष्ट असा प्रकार जमतो.

हि सर पावसाची पुन्हा आज आली.

लेखक AjayRGodse यांनी शुक्रवार, 19/10/2018 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
हि सर पावसाची पुन्हा आज आली हि सर पावसाची पुन्हा आज आली पुन्हा आसवांची मोकळी वाट झाली मन व्याकुळ होते, पुन्हा चिंब न्हाते, क्षितिजावरी का तुला ते पहाते ? पुन्हा पावसाशी तुझी बात झाली. हि सर पावसाची, हि ओढ तुला भेटण्याची. हि सर पावसाची पुन्हा आज आली तुझ्या आठवाणी पुन्हा जाग आली मन बेभान होते, तुझे गीत गाते. का मिलनाची तुला साद देते ? तुला भेटण्याची का मना आस झाली ? हि सर पावसाची, हि ओढ फक्त मिलनाची. हि सर पावसाची पुन्हा आज आली. तुझ्या अंतरीचे गुज सांगून गेली. मन बेधुंद होते, विरहात झुरते. स्वप्नी तुझ्या का हळुवार बुडते? निसटून गेली पुन्हा रात्र ओली.
काव्यरस

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १०

लेखक रा.म.पाटील यांनी गुरुवार, 18/10/2018 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate your love..) कथा - १० नवरात्र.. प्रेमाचे रंग.. आज दुर्गादेवीचे आगमन झाले होते.. वातावरण भक्तिमय झाले होते.. देवीची पूजा म्हणजे स्त्रीची पूजा, स्त्रीत्वाची पूजा, पण सकाळचीच बातमी होती, स्त्रियांना मंदिरातील प्रवेश बंदीवरून.. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीला भेटण्यास बंदी तेही पुरुषाकडून.. सगळेच विचित्र.. तरी सर्वत्र देवीची पूजा आजपासून सुरू होणार होती.. तो मित्राला समजावून सांगत होता, ' कसे आहे ना स्त्रियांनाही एक माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे, ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना चुकीचे वागण्यास मुभा असावी..

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 18/10/2018 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो.

नवरंग - भोंडला

लेखक नूतन यांनी गुरुवार, 18/10/2018 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
'ताई, तुमच्या मोबाईलमध्ये बघून सांगा ना उद्याचा रंग!' माझ्या कामाच्या मावशींची ही मागणी मी वॉट्स अ‍ॅप उघडून पूर्ण केली. त्याचबरोबर मनात विचार आला की खरच,'म. टा. 'नवरंग आणि भोंडला हे मुंबईकर भगिनींच्या रक्तातच भिनलं आहे. अगदी कामवाली पासून ते कॉर्पोरेट जगातील प्रत्येकीला 'नवरंगात'रंगायचं असतं. दुकानदारांची धन करायची, दुसरं काय! इथपासूनं अमूक रंगाची साडी आणली नाही तर नवर्‍यांचं काही खरं नाही या सारखे वॉट्स अ‍ॅप विनोद, घर आणि ऑफिस मधील कामाचा भार या कशाचीही पर्वा न करता या सार्‍या जणी हौसेने 'नवरंगी नवरात्र'साजरं करतात.

रंगराव कंपोस्टवाला

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 17/10/2018 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारी अस्मादिकांची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाली. सभेत स्वागत, सत्कार वैग्रे सोपस्कारातही रंगराव कंपोस्टवाला की पारखी नजर होती ती आपल्या कामाच्या कचर्‍याकडे. कार्यक्रम पार पडल्यानंतर पसार्‍यातली ढीगभर पुष्पगुच्छ घरी सोबत आणली. एक एक बुके वेगवेगळे करायला जवळपास तीन तासाचा वेळ गेला. काय काय निघालं, यादी तर पहा - १. हुच्च फुले जरबेरा, कार्नेशन वेगळी काढुन घरभर फ्लावर पॉट सजवले. २. सजावटीचा हिरवा पाला आणि फुले- बारीक कातरुन कंपोस्ट करीता गच्चीवर रवाना ३. बुकेला लपेटलेला पारदर्शक प्लास्टिक पेपर - सुटे करुन गादीखाली.

रफाल - भाग २

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 17/10/2018 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो.