दोसतार-१७
मागील दुवा https://www.misalpav.com/node/43463
शिक्षकाना निदान एकच विषय असतो. आम्हाला इथे गणीत , मराठी , इंग्रजी, भुगोल, भौतीक शास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र , चित्रकला, हे सगळेच विषय. प्रत्येक विषयाचा गृहपाठ वेगळा. काळकाम वेगाच्या गणीताचे उदाहरण देताना प्रत्येक मजूर स्वतःच्या वेगळ्या विटा घेवून भिंत बांधतो असे कुठेच सांगीतलेले नव्हते.पुढच्या आठवड्यात घटक चाचणी. शाळेत घरी रस्त्यातून येता जाताना काय जे एकमेकांशी बोलणे चालणे व्हायचे ते सगळे घटक चाचणी संदर्भात. आम्हाला तर वर्तमानपत्रातही घटक चाचणी दिसत होती.
मिसळपाव