Skip to main content

नाळ!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 20/11/2018 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
कालच 'नाळ' पाहण्याचा योग आला. सुरुवातीच्या दृष्या बद्दल आणि त्याची 'फॉरेस्ट गम्प'शी तुलना यावर बरीच चर्चा झालीय. पण हा सीन निश्चित आवडून जाईल. 'सुधाकर रेड्डी यंकट्टी' यांनी 'देऊळ', 'हायवे' आणि 'सैराट' नंतर या चित्रपटाच्या कॅमेरा सोबत दिग्दर्शनाची धुरा पण सांभाळली आहे.

आयुबोवेन रत्नद्वीप --प्रस्तावना

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 20/11/2018 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी रोजच्या कामकाजाच्या धावपळीतून कधीकधी जरा विश्रांती मिळावी आणि कुटुंबाबरोबर चार निवांत क्षण घालविता यावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.पण वेळ, सर्वांच्या सुट्ट्या आणि पैसे असे सर्व गणित नेहमीच जमते असे नाही. या वर्षी मुलांना जशा दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या तेव्हाच आमचे फिरायला जायचे नक्की झाले होते.पैशांची जमवाजमव एकीकडे चालू होतीच.पण याहीवर्षी परिस्थिती काही फार वेगळी नव्हतीच.

राजाची सभा

लेखक वन यांनी मंगळवार, 20/11/2018 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजा येतो सगळे उठतात राजा बसतो सगळे बसतात राजाचे स्वागत होते सगळे टाळ्या पिटतात राजा सभोवार बघतो सगळे नजर फिरवतात राजाची बडबड सुरू होते सगळे शून्यात बघू लागतात राजा मधूनच जोरात बरळतो सगळयांच्या मुद्रा त्रासिक होतात राजा विजयी मुद्रेने सभोवार पाहतो सगळे सुटका होण्याची वाट बघतात राजाने अधिकार प्रदर्शित केलेला असतो सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असतो. ----------------------------–--------
काव्यरस

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ८

लेखक कलम यांनी सोमवार, 19/11/2018 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सफाईदार वळणे घेत इन्स्पेक्टर पाटलांची पोलीस व्हॅन 'ग्रीन वाइल्ड रेसोर्ट' मध्ये शिरली तेव्हा इन्स्पेक्टर पाटील सकाळपासून घडलेल्या घटना आठवत होते. आज सकाळी सहा वाजता जेव्हा इन्स्पेक्टरांना फोन आला तेव्हा ते मॉर्निंग वॉक करून नुकतेच घरी पोचलेले होते. रिसॉर्ट मध्ये खुनाची केस हि फार गंभीर बाब होती. एक तर ग्रीन वाईल्ड हे फार मोठं आणि नावाजलेलं रिसॉर्ट होतं आणि दुसरं म्हणजे खुनाच्या बातमीनं रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास असलेल्या इतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता होती. सकाळच्या नाश्त्यासाठी पण न थांबता पाटील सगळ्यात आधी खून झालेल्या स्थळी पोहोचले.

जाणीव

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 19/11/2018 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
जाणवे मज आज जेव्हा काहीच नसे इथे आपुले, सांगू कुणा ही व्यथाच माझी शोधूनी आता मन हे थकले ||१|| अथांग या दुनियेमधला जणू उपरा मी भाडेकरू, स्वकेंद्री अशा अवनीवरती कुणालाच मी माझे म्हणू? ||२|| मी यावे अथवा जावे लोचनी न कुणाच्या आसवे, कुणा न वाटे हृदयामधूनी मन मोकळे करावे मजसवे ||३|| धावतो मी रोज आहे काहीतरी मिळवावया, सिनेमाच तो पडदा नुसता वेळ लागला मज कळावया ||४|| कशापरी तू धाडीलेस मज सुटेल का कधी कोडे देवा? गतजन्मींच्या पापांचा वा पुण्याईचा म्हणू हा ठेवा?

माझं पहिलं ई - पुस्तक

लेखक नूतन यांनी सोमवार, 19/11/2018 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझं पहिलं ई-पुस्तक 'अरण्यबंध'काल बुकगंगा.कॉम वर प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध बंगाली पुस्तक "आरण्यक"( लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय) चा मराठी अनुवाद आहे. पुस्तकाविषयी थोडक्यात : कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमिनदाराच्या मालकीच्या जंगल महालाचा इस्टेट मॅनेजर म्हणून रुजू होतो. पण त्या निर्जन अरण्यात आल्यानंतर आल्यापावली परत जाण्याचा विचार ते त्या अरण्याच्या प्रेमात पडणं, या परिवर्तनाचा आलेखं मांडणारं हे पुस्तक..... या सोबत ओघाने येणारी निसर्गवर्णनं, भेटलेली माणसं...

खरा इतिहास : वाल्मिकी/महार समुदाय हा पूर्वीचा क्षत्रिय

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 19/11/2018 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
(भारतीय समाजात जातीभेदाचे विष पसरविण्यासाठी मूळ निवासी युरेशिअन इत्यादी थोतांड इतिहासाच्या नावावर पसरविले जातात. हे पसरविणारे स्वत:ला इतिहासकार इत्यादी म्हणवितात. खर म्हणाल तर आजच्या लोकांचे अध्ययन केले तरी खरा इतिहास कळू शकतो). हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात लेकीच्या सासरी एक लग्नाला गेलो होतो. त्यावेळी राज्यात निवडणुकीचे दिवस होते. साहजिकच होते गप्पा मारताना राजनीती जातीपातीचा विषय निघणारच. हिमाचल प्रदेशात २७ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे, पण वाल्मिकी समुदाय २०११ जनसंख्यानुसार अर्ध्या टक्क्याहून कमी याचे कारण काय, हा प्रश्न आला.

घालमेल

लेखक लौंगी मिरची यांनी सोमवार, 19/11/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
“कबूल का करत नाहीस ? एकदाचं मान्य करुन मोकळी हो . रोजचं तीळ तीळ मरणं . त्यापेक्षा, एकदाच हो, आहे माझं तुझ्यावर प्रेम, तुझ्याशिवाय़ काहीच सुचत नाही, म्हण आणि मोकळी हो .” तो आज फार बोलत होता, माझी घुसमट पाहवत नव्हती त्याला. पण, मी एकटी ने मान्य करुन काय होणार होतं? जो मला हे मान्य करायला सांगतोय तो मात्र कुणा दुसरीतच अडकलाय आणि हो प्रामाणिकपणे हे पहिल्याच भेटीत सांगितलं. मग तरीही मी त्याच्यात का अडकली असेन? गुंतणं आपल्या हातात नसतं, हेच खरं. “मला समजून का घेत नाहीस? प्रेमाच्या भावना बदलता येत नसतात..

अतृप्त आत्मा -10

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 18/11/2018 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे बघताना नानाची नजर आजीबात स्थिर नव्हती.भयचकीत नजरेने आणी विदीर्ण चेहऱ्याने बघत नाना किंचाळला. "बाप्या भडव्या ! हा काय चावटपणा लावलायस " " हॕ हँ !! मालक माझा बोनस आणी मागच्या महिन्याचा पगार राहिलाय तो घ्यायला आलोय. देताय ना ?" आम्ही विचारलं "पण तु इथं कसा आला परत ? तु तर मेलायस ?? आत्ताचा तर तुला पेटवुन आलो आम्ही " नाना गोंधळल्या घाबरल्या आवाजात बोलला. " नाना ! तु आणी तो म्हातारा गोखल्या जो पर्यंत जिवंत आहात ना तो पर्यंत या बापु जोश्याला मुक्ती नाही. तुझं आणी आप्प्याचं सगळं बोलणं ऐकलय मी " आम्ही जरा जरबेतच बोललो. "म्ह..म्हणजे तु भु..भुत " नाना तातरायला लागला होय !