उद्योग/व्यापार : प्रस्तावना
मराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का? ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर?' मध्ये म्हंटल्या प्रमाणे " दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते.
मिसळपाव