मी का तुला पाहतो रे?
प्रस्तुत लिखाण झी मराठीवर रोज रात्री साडे आठ वाजता दाखवण्यात येणाऱ्या "तुला पाहते रे" ह्या मालिकेवर आधारित आहे. ही मालिका न बघणाऱ्यांना कदाचित लिखाणाचा संदर्भ लागणार नाही.
ऐकलंत का ?
ईशा निमकरच्या मावशीला हव्या असलेल्या एका विशिष्ट साडीसाठी विक्रांत सरंजामेंनी दोन मिनिटात आणि तेही एका फोनवर ती साडीची अख्खी कंपनी विकत घेतली...
झालं काय की, ईशाच्या मावशीला एका साडीचा रंग, दुसऱ्या साडीचं डिझाईन, तिसऱ्या साडीचा पदर, चौथ्या साडीचा पोत आणि पाचव्या साडीचं ब्लाउज पीस आवडलं. आता तिला हे सगळं एकत्र करून एका साडीत हवं होतं.एवढी साधी सरळ मागणी हो तिची. तर तो मुजोर सेल्समन चक्क नाही म्हणाला तिला.
मिसळपाव
