माझा मोबाईल डाएट
“मी मोबाईल डायेट करनार आहे.” मी फार मोठा बॉम्ब वगैरे टाकतोय या थाटात बोललो.
“हे काय नवीन फॅड?” माझा बॉम्ब हा एक फुसका फटाका आहे अशा तुच्छतेने तिने उत्तर दिले.
“अग फॅड नाही. मी मोबाइल वापरनार नाही, मी व्हाटस ऍप वापरनार नाही, फेसबुक बघनार नाही, ट्वीट करनार नाही, युट्युब बघनार नाही म्हणजे माझ्याकडे किती रिकामा वेळ असेल, मी तो वेळ तुम्हा लोकांना देउ शकेल.
भाऊ बहिण नाते
बहिण भावाचं नातं भांडणारं तर कधी रुसणारं।
सुखदुःखांमध्ये एकमेकांना साथ देणारं।।
बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन।
याच नात्याला जिवापाड जपणारं हळवं असतं मन।।
भांडण, रुसवेफुगवे तितकीच असते माया।
भाऊ - बहिणीच्या नात्यांमध्ये नेहमी दिसतो गोडवा।।
ताई असते दुसरे आईचेच रुप।
भावाला देते ती मायेची ऊब।।
राखी बांधून भावाला बहिण नातं घट्ट करते।
बहिण-भावाच्या नात्याची ती हळुवार जपणूक करते।।
भावाच्या आनंदात स्वतःचा आनंद मानते।
त्यात तीला कुठल्याचं गोष्टीची अपेक्षा नसते।।
असे निरागस नाते बहिणभावाचे।
मायेच्या हिंदोळ्यावर ते सदा फुलतं रहावे।।
क्रश !
“ बघ हं .. वाटतं तितकं सोप्पं नसतं सगळं , नाई ! आत्ता हो म्हणशिल पण नंतर मन खाइल तुझं तुलाच .“ ह्यावर दरवेळेला माझं “बघु तेव्हाचं तेव्हा “ एवढच उत्तर असायचं . भरकटत चाललेय हे जाणवत असतानाहि स्वताहाला वाहवुन जाउ देत होते मी . तो माझी वाट बघायचा एवढं एक कारण पूरेसं होतं माझ्या बेताल वागण्याला . त्याला कळायचं , माझं जरा जास्तच मागे लागणं वगैरे , मला काहि फरकच पडत नव्हता . जेव्हा , जसं जमेल तसं भेटायचो . व्यसनाधीन झाल्यासारखं . त्याच्यासोबत रहाणं , वेळ घालवणं , हिंडणं , फिरणं .
गाये तो गाये कहा
गाये तो गाये कहा
मला गाण शिकायच आहे खर पण आवाज साथ देत नाही. तस लहानपणी मुलीला झोपोवताना अंगाई गीत म्हणून तीला झोपवले होते नाही अस नाही पण त्यातही ती जास्त गाण ऐकायला नको म्हणून कदाचित लवकर झोपी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता विचारल तर सांगेल ही एखाद वेळेस.
माझी गाण म्हणण्याची हौस मी गणपतीच्या आरती म्हणतात तेंव्हा भागवून घेतो. भक्त संकटी नानाSS म्हणताना आमच्या सोसायटीतल्या नाना नाडकर्णीना बघत नाना तला ना (पहीला ना नाही दूसरा ना ) ओढ़त ओढ़त म्हणतो. तो इतरांच्या आवाजात आवाज मिसळून म्हटल्या मुळे चालून जातो. आरती म्हणताना आपली गायनाची हौस भागवून घ्यावी या स्पष्ट मताचा मी आहे.
देव्हारा
तिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा
पहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा
वाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी
नाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा
उभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती
पण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा
पटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या
आजकालच्या मुली मागती आधीच सातबारा
इतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते
सुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा
पूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे
घरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा
चवणेश्वर अप्रतिम सौंदर्य
चवणेश्वर ' सातारा शहरापासुन पुढे २८ मैल चवणेश्वराच्या पायथ्याशी निसर्गाची कृपा व वनश्रीने नटलेले कंरजखोप गाव आहे. गाव लहान आहे वस्ती बारासे ते तीन हजार पर्यंत आहे.ब्राह्मणाची घरे बोटावर मोजण्याइतकी आहेत.या गावातुन चवणेश्वराला रस्ता जातो.गावातील पाटिलकी धुमाळ यांच्याकडे आहे.तर जोशीपण(पुजारी) वाघ यांच्याकडे आहे.गावात बहुतअंशी धुमाळ आहेत इतर लोक थोडे.गावात यायला कच्ची पायवाट आहे.S.T स्टॅन्ड समोर जुनी देवीची विहीर अाहे म्हणे !
मिसळपाव