Skip to main content

राजमाची-डाऊन द मेमरी लेन

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 10/02/2019 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
साल २००२ - आम्ही ४ मित्र एकाच कंपनीत कामाला होतो. चौघेही सडेफटिंग होतो. त्यात आमच्या दोघांचा कॉलेजनंतरचा पहिलाच जॉब होता. रोज रोज तेच तेच काम करून वैतागलो होतो.एक दिवस टूम निघाली की या रविवारी कुठेतरी ट्रेकला जाऊया. पण सगळ्यांनाच ट्रेकिंगची सवय नव्हती, त्यामुळे ट्रेक असा पाहिजे की रूट माहितीचा हवा. ट्रेकची मजा आली पाहिजे आणि शिवाय फार कठीण नसावा. शनिवारी रात्री निघून रविवारी परत यायचे तर राजमाची बेस्ट पर्याय होईल असे सर्वानुमते ठरले आणि आम्ही कल्याण स्टेशनवर भेटलो.

एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 09/02/2019 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया बालपणी गेलासी तू शाखेसी धराया हादरली ती जननी, थरथरले घरचे जन भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ? मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला? खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान आले किती गेले किती संपले भरारा नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा गुलाबी आणल्या नोटा आम

[शशक' १९] - पूर्ण-अपूर्ण

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/02/2019 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
वैदेही बाल्कनीत उभी होती. रिमझिम पावसात एकमेकांना बिलगत, मस्ती करत चाललेले अविनाश आणि नैना तिला दिसलेत. दहा वर्षांचा भूतकाळ तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा एकदा तिला आठवला. अशाच एका पावसाळी सायंकाळी अविनाशसोबत भविष्याची स्वप्ने रंगवत असताना अचानकपणे त्याने तिला त्याचे विचार ऐकवलेत. "मूल नको" हे विचार तिच्या सुखी संसाराच्या कल्पनेत अजिबातच बसणारे नव्हते. दोन वर्षांपासूनचं त्यांचं नातं तिने तडकाफडकी संपवलं. पुढे नैनाने अविनाशला त्याच्या विचारांसह स्वीकारलं. सतीशशी लग्न करुन वैदेहीने संसार थाटला आणि दोन मुलांना जन्म दिला.

परग्रहवासी की ..... ?

लेखक अमेयसा यांनी शनिवार, 09/02/2019 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
"आपली गती कमी झाली म्हणजे आपण पोचलो का बाबा?" समोर दिसणाऱ्या निळ्या प्रकाशमान गोलाकडे बघत त्याने आपल्या वडिलांना विचारले. काही प्रकाशवर्षे दुरून आलेले ते यान आता एका बिंदू वर स्थिरावत होतं आणि आतिल प्रवासी आपापली उपकरणे घेऊन खालील महाद्विपाकडे जाण्यास सज्ज होत होते. "२ वर्षांपूर्वी तुम्ही इथेच आला होतात का? आणि माझे मित्र म्हणत होते की गेली कित्येक दशकं आपले लोक इथे येत आहेत. खरं आहे हे?" त्याचाच अजून १ प्रश्न. त्याचे वडील या वेळेस खाली जाणार नव्हते आणि फक्त यानाच्या व्यवस्थापन आणि देखरेखी साठी आले होते. त्यामुळेच या मोहिमेसाठी ते आपल्या मुलाला घेऊन आले होते.

[शशक' १९] - क्लिन बोल्ड

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/02/2019 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
अल्झायमरग्रस्त वृद्ध भाऊसाहेब म्हणजे जणू अजाण बालक.जानकी वहिनींसाठी पति पत्नीतील संवाद कधीचाच संपुष्टात आला होता.भाऊसाहेबांशी शब्दांच्या भाषेत केलेला संवाद म्हणजे जणू भिंतीशी संवाद करणं.साहजिकच दैनंदिन बाबींसाठी जानकी वहिनींनी शब्दाबरोबर अभिनयाची कास धरलेली. गेल्या आठवड्यात अचानक थंडीची लाट आली.मूल झालेल्या भाऊसाहेबांनी घरच्या मंडळींची नजर चुकवून कसं कोण जाणे पण फ्रीज ऊघडून पेप्सीची बाटली तोंडाला लावली.परिणामी शिंकांचा सपाटा सुरू आणि आसपासच्या मंडळींवर शेंबडाचं तुषार सिंचनही! सारं काही समजत असलं तरीही क्षणभर का होईना जानकी वहिनी रागावल्या आणि अभिनय करीत म्हणाल्या -खिशातलं कुठे आहे?ते तोंडावर

[शशक' १९] - परप्रांतातून

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/02/2019 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
परप्रांतीयांचे लोंढे येतच होते. मुजोर राज्यकर्त्यांच्या अमानुष अत्याचारांना बळी पडलेल्या त्या लोकांना हे शांतताप्रिय राज्य खुणावत होतं. त्या लोंढ्याबरोबर आलेल्या, अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेल्या, त्या झोपलेल्या किडकिडीत मुलाला सैनिकाने उठवलं. ‘कोण रे तू? कुठून आलास? तुझे आई आणि वडील कुठे आहेत?’ तो दचकून जागा झाला. प्रवासात सहस्रवेळा त्याच्या आई आणि वडिलांची चौकशी लोकांनी केली होती आणि दर वेळी नको नको वाटत असतानाही, त्यांच्या झालेल्या अपमानाचा, छळाचा आणि खुनाचा तो काळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता! दूरवर दिसणाऱ्या तक्षशिला विद्यापीठाकडे पाहत तो म्हणाला, ‘मी विष्णुगुप्त चाणक्य.

सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान....

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 09/02/2019 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कोंडकेंची माफी मागून मूळ गीत - अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान सोनियाच्या सुता, तुला खानदानी वरदान.... एकमुखाने चमचे, गाती राहुल आख्यान || ध || माता किरीस्ताव तुझी, पिता पारशी बावा... जानवेधारी ब्राह्मण म्हणूनी, कैसा तू खपावा? पन्नाशीला आला, बुद्धी बालकासमान.... || १ || चहुकडे ऐसे ज्ञान, पाजळशी राया... सकाळच्या रात्री उठीसी, ऐसी तुझी माया... खुळावले शिंदे, झाले मनमोहन हैराण... || २ || देशद्रोह्यांसाठी घेतलीस, विद्यापीठी धाव.... करा देशाचे तुकडे, हम आए तुम्हें बचाव... चाचा दिग्वीजय, कन्हैया बंधूसमान...

हॅरी पॉटर - भाग पाच

लेखक nishapari यांनी शुक्रवार, 08/02/2019 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
हॅरी पॉटर भाग पाच - . या भागात पुस्तकं न वाचलेल्यांसाठी खूप स्पॉईलर्स आहेत , कथेची जवळपास पुर्ण पार्श्वभूमी आहे . हॅरी पॉटरच्या जगतातील महत्वाची पात्रे - एल्बस डम्बलडोर आणि वोल्डेमॉर्ट नंतर हॅरी पॉटर विश्वातील सगळ्यात महत्त्वाची पात्रं म्हणजे स्वतः हॅरी त्याचा मित्र रॉन विज्ली आणि मैत्रीण हर्माइनी ग्रेन्जर . पण त्यापूर्वी किंचित दुय्यम पण कथेच्या दृष्टीने महत्वाची पात्रं म्हणजे - १ . जेम्स पॉटर , २. लिली पॉटर , ३ . सिरियस ब्लॅक , ४ . रीमस लुपीन , ५ . पीटर पेटीग्र्यू , ६ . सेव्हरस / सिवियरस स्नेप ७ . डर्स्ली कुटुंब ८ . विज्ली कुटुंबातील सर्व व्यक्ती ८ . मॅल्फॉय कुटुंब १ .

सब्रका फल - स्पर्धे बाहेरची शशक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 08/02/2019 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
तो यवन त्याच्यावर पचकन थुंकला, याच्या डोळ्यात अंगार फुलला, “हरामी नजर नीचे” असे म्हणत त्या यवनाने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली. यवनाच्या नरडीचा घोट घ्यायला शिवशिवणारे हात मोठ्या मुश्किलीने आवरत तो म्हणला. “गलाती झाली हुजूर, पुढच्या वेळी तलवार चालवा माझ्या गर्दनीवर, एकडाव माफी द्या गरीबाला” त्याला उद्दामपणे बाजूला ढकलत तो यवन पुढच्या भोया कडे वळाला. हिच संधी साधून तो त्याच्या साथीदारासह तो जडशीळ पेटारा कसाबसा उचलत लगबगीने तिथून सटकला. ठरलेल्या जागी पोचेपर्यंत तो घामाने अक्षरश: निथळत होता. त्याचे हृदया छाती फोडून बाहेर येवू पहात होते.