Skip to main content

आजही...

लेखक नायकुडे महेश यांनी शुक्रवार, 15/02/2019 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आजही स्वप्नात मी त्या बावऱ्या परीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। आजही वेड्या मनाला याद येते तिची आजही ओल्या सरीतून साद येते तिची आजही हृदयात मी त्या लाजऱ्या कळीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। आजही ते थेंब ओले झेलण्या आतुर मी आजही ते क्षण गुलाबी छेडण्या आतुर मी आजही प्रेमात मी त्या गोजिऱ्या परीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। महेश नायकुडे
काव्यरस

[शशक' १९] - प्राक्तन

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 14/02/2019 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
"या; काय हवंय ? " "चहा?" "नको" "कॉफी?" "नको मला तू पाहिजे" "काय ?" "हो आदेश आलाय" "कोणाचा ?" "आज संध्याकाळी तू या खुर्चीतच शेवटचा श्वास घेशील. " त्याला घाम फुटला त्यांन मागं वळून घंटी वाजवली. समोर बघतो तर कुणीच नाही. संध्याकाळपर्यंत गिऱ्हाईकांच्या वर्दळीत तो सगळं विसरला . "ए चल, काय असेल ते काढ" "अहो हे काय चाललंय? " "कोण तुम्ही ?" "ए चल बाहेर ये , भाईला प्रश्न विचारतो ? ". "अरे अरे माझा शर्ट" "भाई बसा भाई" भाई खुर्चीत बसला. हातातल्या चाकू टेबलवर खुपसला.

[शशक' १९] - निरोप

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 14/02/2019 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
हातातली तीन नाणी सावरत तिने होस्टेलच्या सार्वजनिक फोनवरून एक नंबर फिरवला. चक्क रॉंङ्ग नंबर! दोनदा!! आपल्या खंद्या स्मरणशक्तीने दगा दिल्याचे दुःख पचवून १९८ फिरवला. नाव पत्ता सांगून नंबर मिळवला. नाणं परत आलं. मैत्रिणीच्या शेजारच्यांनी तत्परतेने तिच्या घराची बेल वाजवली. फोन घेतला तिच्या नवऱ्याने. सांगितला निरोप - तिच्या गाइडनी आज दुपारी साडेबारा वाजता बोलावलंय. तीनही नाणी गेली. दुपारी मेसमधे जेवून मग ती विभागात डोकावली. "सर, आली होती का माधवी?" " हो. आज तसं ठरलं नव्हतं, पण बरं झालं.

[शशक' १९] - प्रतीक्षा संपली

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 14/02/2019 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
तो कंटाळला होता ती असंबद्ध आणि सततची बडबड ऐकून. मागचे शंभर वर्षे तो इथे पोस्ट होता. वेगवेगळ्या भाषा पण तोच हिंसकपणा आणि तीच चर्चा. सुरुवातीला त्याला वाटलं की चुकांतून आणि इतिहासातून शिकतील पण कसलं काय. इथे इतिहासाचं चक्र असतं एवढं मात्र त्याला कळलं. त्याला जेव्हा पोस्ट सोडायचा आदेश आला आणि ते ही पोस्ट कायमची मोकळी ठेवत आहेत असं कळलं तेव्हा त्याला हर्षवायू झाला. असेही संवाद करायचे प्रयत्न विफल झाले होते पण प्रोटोकॉलप्रमाणे त्याने एक शेवटचा संदेश पाठवला. आधीप्रमाणे त्याला उत्तर आले नाही. परत निघायच्या आधी त्याने एकदा डोळेभरुन त्या निळ्याशार गोळ्याकडे बघितले.

माझी आयर्नमॅन स्पर्धा (भाग-१)

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी गुरुवार, 14/02/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
https://photos.app.goo.gl/aU5egGA5WyoJZCe36 मित्रहो, मागील १ वर्ष केवळ या स्पर्धेसाठी "अर्पण" केल्याने विशेष लेखन करता आले नाही. तर आयर्नमॅन या स्पर्धेचे २ प्रकार असतात. 70.३ आणि 140.६- अर्थात 70.३ माइल्स आणि 140.६ माइल्स (११३ किमी आणि २२६ किमी). यातील 70.३ ला ८तास ३० मिनिट वेळ असतो तर 140.६ ला १७ तास वेळ असतो. जगातील अवघड अशा काही स्पर्धांमध्ये याचा समावेश होतो. मी 70.३ मध्ये भाग घेतला होता. या ८:३० तासामध्ये 1.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल आणि २१ किमी पळणे याचा समावेश होतो. स्पर्धा सुरूझाल्यावर आधी पोहणे - सायकल- पाळणे असा क्रम असतो.

खेळ राजकारणी असा रंगला....

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 14/02/2019 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
गदिमा आणि सुलोचना चव्हाणांची माफी मागून, मूळ गीत - फड सांभाळ तुर्‍याला ग आला.... खेळ राजकारणी असा रंगला.... काका लागला काड्या घालायला || धृ || मूळ बारामतीचं बेणं.... हळूहळू यानं गिळलं पुणं.... धोका देण्यात अति प्रवीण.... घेतलं कडेवर जनता पार्टीला.... दिला धक्का वसंतदादांला.... बाईने हाकललं याच्या सरकारला.... परतून धरले राजीवच्या पायाला…. काका लागला काड्या घालायला || १ || पाळले कलानी आणि ठाकूर.... खाल्ले मुद्रांक तेलगीबरोबर.... पोरगी - पुतण्या आणले वर.... गोवारींवर काठ्या बरसल्या.... करुन विरोध गोर्‍या बाईला.... काढला पक्ष दुकान चालवायला.... परी सरकारी जोडीने नांदला…. काका लागला काड्या घाला