Skip to main content

चढणं म्हणजे काय असते रे भौ ( एक अशीच केलेली "श श क कविता" )

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 12/03/2019 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
चढणं म्हणजे काय असते रे भौ लेका , चढणं मंजी ईचारांशी लढणं असतं रे भौ लढणं मंजी काय असतं रे भौ लेका लढणं मंजी आतल्याआत कुढणं असतं रे भौ आतल्याआत कुढणं , मंजी काय असते रे भौ लेका , त्ये मंजी सवताच्या नजरेतन पडणं असते रे भौ नजरेतन पडणं म्हणजे काय असते रे भौ लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ मनाविरुद्ध उडणं , मंजी टुल्ली गहाण ठेवणं असतं भौ टुल्ली गहाण ठेवणं मंजी काय रे भौ आरं लेका, त्येच तर बोलून ऱ्हायलोय टुल्ली गहाण ठेवणं म्हणजेच चढणं असते रे भौ :(((((((((( सिद्धेश्वर विलास पाटणकर )))))))))):

नक्की काय अपेक्षित आहे?

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 11/03/2019 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडॆच मला एक-दोघांनी विचारले की सगळे फिजिकल शेअर डिमॅट करून झाले का? ३१ मार्च नंतर त्या शेअरची किंमत शून्य होईल वगैरे... अधिक शोध घेता असे समजले की ३१ मार्च नंतर फिजिकल-टु-फिजिकल होणार नाही. दुसर्‍याच्या नावावर करायचे असल्यास किंवा विकायचे असल्यास ते डिमॅट करणे आवश्यक आहे.

हिंदी चित्रपट गीतांचा संस्कृत भावानुवाद

लेखक धर्मराजमुटके यांनी सोमवार, 11/03/2019 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
युट्यबवर सहज फिरता फिरता संस्कृत रुपांतरीत केलेली काही गाणी आढळली. मला संस्कृत येत नसल्यामुळे ती गाणी अर्थाच्या दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने किती परीपुर्ण आहेत माहित नाही पण ऐकायला मात्र गोड वाटतात. गायकांचा आवाज देखील मस्त आहे. एकंदरीत वेगळा प्रयोग म्हणून बघायचे तर नक्कीच सुंदर प्रयत्न ! काही दुवे येथे देत आहे. उत्सुकांनी एकदा ऐकायला हरकत नाही. १. धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना २. मेरे रश्के कमर ३.

प्रकरण ५: गुणपदार्थनिरूपणम् - द्रव्यांच्या गुणांविषयी परिचय (Introduction to Properties of Material and Non-Material Substances)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी सोमवार, 11/03/2019 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
(टीप: पदार्थाचे पूर्वापार पध्दतीने सांगितले गेलेले गुण म्हणजे: रूप/रंग, रस/चव, गन्ध/वास, स्पर्श/तापमान, संख्या, मिती/मोजमापे/परिमाण, वेगळे असणे, जोडलेले असणे, तुटलेले असणे, लांब असणे, जवळ असणे, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष, गती निर्माण करणे हे १७ गुण ऋषी कणादांच्या वैशेषिक सूत्रांमध्ये वर्णन केले गेलेले आहेत. याशिवाय यात न सांगितलेल्या गुरुत्व, प्रवाहीपणा, अप्रवाहीपणा, शारिरिक वा मानसिक शक्ती, धर्म/मोक्षगामी/विधायकता/नियमितता , अधर्म/विनाशगामी/अनियमितता व शब्द/तरंग या प्रशस्तपादांनी यात जोडलेल्या ७ गुणांसह ही संख्या २४ इतकी भरते. हे वर्णन ४थ्या शतकातले आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.

जाब

लेखक मित्रहो यांनी रविवार, 10/03/2019 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
जाब "ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू" तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता. तो चिडला, वैतागला. त्याने जाब विचारायचे ठरविले. तो पळत निघाला. तो पळत होता. कितीतरी दिवस नुसता पळत होता. तो पळत पळत शेकडो मैल दूर आला. रोम खूप मागे राहीले होते. तो इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड या गावी आला. तो तिथे ट्रिनिटी चर्चपाशी गेला.

माझी आयर्नमॅन भाग -२ (तयारी)

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी शनिवार, 09/03/2019 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
https://photos.app.goo.gl/nfZY36KHdppJYbfBA (Please ignore grammatical errors). गुगल ट्रान्सलेटर चा वापर करून लिहिल्याने भाषा पुस्तकी झाली आहे तरीपण.... जर आपण विचार करीत असाल - "आयर्नमन" माझ्यासाठी नाही तर आपण नक्कीच एकदा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य पूर्ण ताकदीने जगायची इच्छा जागृत करावी लागते. आमच्या रेस मध्ये 67 वयाची महिला सहभागी होती आणि ती २२ वी आयरनमॅन पळत होती आणि कमीतकमी 3 शारीरिक अपंग सहभागी होते (कमीत कमी १पाय किंवा हात नाही).

काचेच्या अलिकडून

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 09/03/2019 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो किंवा लक्ष नाही असं दाखवतो नाहीच जमलं दुर्लक्ष करणं तर मानेनेच नाही म्हणतो आणि कधीकाळी दिलेल्या दहा रूपड्याचं गणित मांडून स्वतःचच समर्थन करतो... पण खरं सांगायचं तर, आत एक द्वंद्व चालू असतं कारण मला पक्कं ठाऊक असतं की, नकार, अपमान, एकटेपण, तिरस्कार, नाकारलेपण, संघर्ष, या शब्दांचे अर्थ मला नाही कळणार कधीच.... ते कळतील फक्त गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या ....त्या हिजड्याला
काव्यरस