Skip to main content

सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 4 : खेड ते हरिहरेश्वर

लेखक अन्या बुद्धे यांनी शनिवार, 30/03/2019 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
17.03.2019 सकाळी साडेसहाला खेड सोडलं तेंव्हा श्रीनि कार ने, अप्पा आणि सूरज सायकलवर माझ्या सोबत होते. अप्पा 5एक km नंतर परत फिरले. काही अंतराने श्रीनि पण निघून गेले आणि मग आम्ही दोघेच उरलो. सूरज आणि खेड सायकल ग्रुपचा हा नेहमीचा रूट. त्यांच्या नेहमीच्या खुणा दाखवत सूरज सोबत होते. झकास वातावरणात प्रवास सुरु होता. 15 कमी नंतर कुवे घाट सुरू झाला. घाट संपायच्या थोडं आधी सूरज दरीकडे पहात उभे दिसले. जवळ गेल्यावर दरीपलीकडच्या चढावर रान डुकरांचा मोठा कळप दाखवला. ते उत्साहाने 'तो बघा! बाब्बो!' वगैरे म्हणत होते पण मला काहीच समजत नव्हतं. तरी 'ओह! हम्म!' असे काही उद्गार काढत होतो.

बसणं हे निमित्तमात्र

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 30/03/2019 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
लई दिसानं आस्ला कच्चा माल घावला: छटाक, आतपाव, पावशेर, अर्धाशेर. वरल्या मापात घेतला आन फायनल प्राडक्ट पाझीटीव केल्यं. घ्या. मग पुढे असं होतं की .. पावलांमधलं अंतर कमी होत जातं अंगामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू वाढत जातं. स्पर्श लागतात आठवायला. आणि भांडणं होतात विसरायला. नातं लागतं विणायला. असं व्हावं म्हणून भेटायचं.. बसणं हे निमित्तमात्र.. - पाभ्या
काव्यरस

दुरून डोंगर साजरे (लघुकथा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 29/03/2019 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल. "Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?" "No!

दुरून डोंगर साजरे (लघुकथा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 29/03/2019 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल. "Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?" "No!

बातम्या बघणे हे निमित्तमात्र..

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 29/03/2019 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमाला तर तीन तीन पेर्ना येक दो और तीन मग पुढे असं होतं की .. शब्दा शब्दांनी वाद वाढत जातात.. डोळ्यामधले निर्झर वाहू लागतात... ओठांमधून सुस्कारे सुटू लागतात ... उखाळ्या पाखाळ्या सुरु होतात .. आणि मागचे शिल्लक हिशोब लागतात उलगडायला.. मी म्हणूनच कसे सोसते ते दोन्ही बाजूनी येउ लागते ऐकायला.. आपण मात्र, आई आणि बायकोच्या मध्ये सापडू नये म्हणून गप्प बसायचं.. बातम्या बघणे हे निमित्तमात्र.. (अनुभवी) पैजारबुवा,

चौथयांदा झालेल पाहिलं प्रेम

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 29/03/2019 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवांपूर्वी लायब्ररी मध्ये एक नवीन मुलगी आली. पहला प्यार बार बार आणि लगातार होण्यामागे ज्या मुली असतात त्यातलीच एक... जेमतेम पावणेपाच फूट उंचीची..