Skip to main content

३_ किलबील किलबील पक्षी बोलती.

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/07/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
या आकृतीत गोलाला दोन छोट्या रेषा जोडून त्या खाली दोन फुल्या मारल्या. मुलाचे आणि मुलीचे अगदी कमीत कमी रेषांमधे. मग जवळंच आणखी काही रेषा जोडून एक कौलारू बैठी इमारत काढली, शाळेच्या इमारती सारखी. खडूच्या आणखी दोनचार जुजबी फरकाट्यात शाळेची इमारत जिवंत व्हायला लागली . दोनचार ठिपके इकडे तिकडे दिले . मैदानात खेळणारी मुले दिसायला लागली.....
मागील दुवा http://misalpav.com/node/44923 अजून काय करता येईल बरे….. खरे तर असा विचार डोंगरे सर चित्र काढताना कधीच करत नाहीत.

विळखा -२

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 26/07/2019 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -२ मी शेजारीच असलेल्या माझ्या बायकोच्या दवाखान्यात आईला घेऊन गेलो. बायकोला आईची ती मानेची गाठ दाखवली आणि पुढे तपासणी करायची आहे असे सांगितले. पाच मिनिटे बोलून आई परत घरी गेली. तेंव्हा मी बायकोला म्हणालो कि तिला आता तरी क्षयरोग असण्याची शक्यता बोलून दाखवले आहे पण मला तर हा कर्करोगच आहे याची १०० % खात्री आहे. उद्या सिटी स्कॅन मध्ये काय निघतंय ते पाहू. एवढे बोलून मी परत दवाखान्यात आलो. आपली [पुस्तके काढून पाहीली आणि मनात एक शंका होती कि हा तिसऱ्या तर्हेचा म्हणजे MEDULLARY CARCINOMA OF THYROID (MTC) पण असण्याची शक्यता आहे.

लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 26/07/2019 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?! कशी गम्मत असते बघा.... लग्न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तू लग्न करून सुखी आहेस का तर तो/ती नक्कीच म्हणतात की उगाच या फंदात पडलो/पडले. एकटं असणं जास्त सुखाचं असतं.... आणि तरीही या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मुलांनी लग्न करायला हवंच असतं. असे किती पालक असतील जे म्हणतात की बाळा, तू अजिबात लग्न करू नकोस.  अगदी धीट मत मांडायचं तर लग्न हे उमेदीच्या काळात शरीरसौख्यासाठी आणि उतरत्या वयात सोबतीची गरज म्हणून केलं जातं. भावनिक गुंतवणूक - आयुष्य जोडीने जगण्यासाठी - तिचे/त्याचे विचार पटले म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.......

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ११

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 26/07/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
काशीचा राजमहाल सुवासिक फुलांनी सजला होता. दास दासी येणाऱ्या राजांचे गुलाब पाणी, अत्तरे शिंपडत स्वागत करत होते. स्वयंवरात जमलेल्या राजांनी आसन ग्रहण केले. काशीनरेशने सर्व स्वयंवरात आलेल्या राजांना अभिवादन करून स्थानबद्ध झाले. लाल रंगाच्या पायघड्यांवरून डोक्यावर माळलेल्या सुवर्ण हिरेजडीत शिरोमणी ते पायातल्या बोटात घातलेल्या जोडव्यांचा भार पेलत अंबा, अंबिका, अंबालिका तिथे पुष्पवर्षावात तिथे हजर झाल्या. स्वयंवर सुरु करण्याची घोषणा देत दासांनी तीन सजवलेले पुष्पहार तिन्ही राजकन्यांसमोर धरले. भीष्माचार्यांनी महालात प्रवेश केला आणि थेट काशीनरेश पुढे जाऊन उभे राहिले.

युगांतर आरंभ अंताचा भाग १०

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 26/07/2019 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
"बोलावलेत राजमाता?" भीष्म कक्षात प्रवेश करून हात जोडून उभा राहिला. "हो भीष्म!" "काय आज्ञा आहे?" "उद्याच्या दिवशी काशीनगरीला एक स्वयंवर योजला आहे काशीनरेश नी. त्यांच्या तीन राजकन्यांचा. तु त्यात सहभागी हो. अंबा, अंबिका आणि अंबालिका मला पुत्रवधू म्हणून हव्या आहेत." "महाराणी सत्यवती?" "काळजी नसावी. तुझी प्रतिज्ञा मी तुला मोडायला सांगणार नाही." "मग राजमाता, ही स्वयंवरास जाण्याची आज्ञा ?" " विचित्रवीर्यसाठी, भीष्म!" "पण राजमाता, नियमाप्रमाणे, स्वयंवर विचित्रवीर्यने स्वतः जिंकायला हवे.

शोले चित्रपट ,मिपा च्या नजरेतून ( शुद्धलिखित )

लेखक हस्तर यांनी शुक्रवार, 26/07/2019 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
१) शोले जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा चालला नव्हता ,तो किंवा गेला बाजार हम आपके हैं कौन पण प्रदर्शकानी लग्नाची कॅसेट म्हणून नाके मुरडली होती मिसळपाव वर पण बरेच धागे प्रदर्शित होतात एक दोन दिवस प्रतिसाद नाही मग अचानक रतीब सुरु होतो २) ठाकूर ची सून जया दिवसभर पणत्या मध्ये तेल टाकत असते तसे बरेच लोक जिलब्या टाकत असतात ३) कधी कधी संपादकानेमध्ये ठाकूर ( दुर्गा गोगटे फेम ) शिरतो व यह हाथ नाही फासी का फंदा म्हणून आयड्यांना उडवून टाकतात ४) मग त्या आयड्या ड्यू डाकू बनून धुमाकूळ घ

विळखा

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 26/07/2019 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझा दवाखाना ज्या इमारतीत आहे त्यातच वरच्या मजल्यावर आमचे आई वडील राहतात. आमच्या वसाहतीचा पुनर्विकास झाला त्यात मी दवाखान्याची जागा घेतली आहे आणि वरच्या मजल्यावरचेच घर वडिलांना मिळाले. आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला होता आणि त्याचा इलाज चालू होता आणि ते सुधारत होते. १९ जून २०१९ रोजी संध्याकाळी ८ वाजता दवाखान्यात कुणी नव्हते म्हणून मी त्यांना पाहायला गेलो. तेंव्हा आईने सांगितले कि अरे आज मी चेहऱ्याला पावडर लावायला गेले तर मला मानेला डावीकडे थोडं सुजल्यासारखं वाटतंय. आमच्या आईला मानेचा आणि कंबरेच्या स्पॉनडायलॉसिस चा त्रास ८-१० वर्षे तरी आहे.

किलबील किलबील पक्षी बोलती(२)

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 26/07/2019 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/44903
चित्र पाहून झाल्यावर त्यानी आपल्या पाठीवर थाप मारली , घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. फार काही बोलले नाहीत पण म्हणाले आज मी चित्र कानांनी ऐकली. सनै चौघड्याचे आवाज, राज्याभिषेकाचे मंत्रघोष , गर्दीतली दबकी कुजबूज, सगळं ऐकू आलं रे, बोलकी चित्रे काढतोस.म्हणत खूप वेळ आपला हात हातात घेवून काही न बोलता त्यावर नुसते थोपटत राहीले.
आर्ट्स स्कूल ला असताना चित्र कसे पहावे याचे गायतोंडे सर खूप सुंदर प्रात्यक्षीक द्यायचे. त्यांनीच तर शिकवलं होतं हे. आपली चित्रं बोलकी असतात.

चांगुलपणा !

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/07/2019 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
‘इंटरनेट’मुळे एक बरं झालंय. एखादा संदर्भ, एखादी गोष्ट, सहज सापडत नसेल, तर ‘सर्च इंजिन’वर जायचं. मग लगेच त्या शब्दाचे सारे संदर्भ समोर येऊन उभे राहतात. थोडक्यात, ‘शोध सोपा झाला!’ हे माहीत असल्यामुळेच, हा लेख लिहिण्याआधी सहज एका सर्च इंजिनवर एक शब्द टाईप केला... ‘चांगुलपणा’! शेकडो रिझल्टस समोर आले. पण पाहिजे तो संदर्भ त्यातून शोधण्यासाठीही खूपच मेहनत करावी लागली. इतकी, की इंटरनेटच्या सर्च इंजिनवरूनही चांगुलपणा हरवत चालला आहे की काय, अशी शंका येऊ लागली. काही संदर्भ आढळले.

सफरचंद हलवा by Namrata's CookBook :१२

लेखक Namokar यांनी गुरुवार, 25/07/2019 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ३० मिनिटे(*सफरचंदाचे प्रमाण किती आहे यावर पाककृतीसाठी लागणारा वेळ कमी जास्त होईल) लागणारे जिन्नस: सफरचंद तुप साखर वेलची पुड साय काजू , बदाम क्रमवार पाककृती: १. सफरचंद धुवून ,त्याचे २ काप करुन त्यामधल्या बी काढून किस करुन घ्या २. कढई मध्ये तुप घ्या ३. तुप गरम होत आलेकी , काजू बदाम तुपावर २ मि. परतून घ्या ४.