युगांतर - आरंभ अंताचा भाग १६
हस्तिनापुर महाल.
पुर्वदिशेला सुर्यदेवांचे आगमन झाले तसे महालाच्या खिडकीतून किरणांनी कक्षेत प्रवेश केला. अंबिकेला वरच्या कक्षात जाण्याची आज्ञा राजमातांनी दिली आणि तिने कक्षात प्रवेश केला. तो कक्ष एका दिव्य प्रकाशाने व्यापलेला होता. तिव्र प्रकाश असह्य होऊन तिने डोळे गच्च मिटले.
सत्यवती आतुरतेने येरझाऱ्या घालत होती.
"माते" महर्षी व्यासांचा आवाज ऐकून सत्यवती त्यांच्या जवळ आली.
"पुत्र व्यास.... अंबिकेला....."
"पुत्र होईल, माते. परंतु...."
"परंतु काय?" सत्यवती मनातून घाबरली.
"तो अंध असेल."
सत्यवती हातपाय गळल्या सारखी व्यासांकडे बघत राहिली.
"मी दिव्यशक्तीला आवाहन केले होते, माते.
मिसळपाव