कृष्णजन्म
कान्हा !
कुठून रे अक्षरं आणू?
कसे शब्द बांधू?
कश्या भावना गुंफू?
हजार नावं घेऊ?
का शब्दब्रह्म गाऊ?
तुळशींनी सजवू?
मनमखरात बसवू?
का पंचप्राणंच अर्पू?
सगळंच उष्टावलयंस तू ?
कशाचा नैवेद्य दाखवू?
निळाईसंग उत्तुंग आभाळी,
सावळदंग अभंग सावली,
मिस्कीलढंग अनंग माऊली,
मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।।
सावरीत मुग्ध अलगुज,
ऐकवीत गुप्त हितगुज,
खेळवीत मुक्त गाईगुजं,
प्रकटीत तृप्त आत्मगुज ।।
तुज प्रकाशे चेतविती,
संध्या या गर्भवती,
शुद्ध चैतन्या प्रसविती,
पुन्हा आकाशी उगविती ।।
जन्मांचा जन्म जिथे,
मृत्यूंचाचा मृत्यु जिथे,
दिशांचा अंत जिथे,
नियतीला खंत जिथे ।।
शब्दांना सारूनी मागे,
देहाला ठेवुनी जागे,
बुद्धीच
युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३७
कोणाला साधी कल्पनाही नव्हती की गोकुळातले सारे चैतन्य असे एका क्षणात निघून जाईल. त्या निलवर्णी गिरिधराच्या बासरीचे सुमधुर, भावस्पर्शी सूर हवेच्या लहरींसोबत घुमले नाहीत. कानांना तृप्ती दिली नाही, गोपिकांना वेड लावले नाही आणि त्या स्वरांवर धुंद होऊन नाचणाऱ्या राधेच्या पायातील पैंजणांची मंजुळ छुमछुम सुद्धा कोणाला ऐकू आली नाही.
तो दिवस! कंसाच्या सैनिकाने आणलेला निरोप. कृष्णाला बोलावून घेतले हे कळाल्यावर यशोदेचा जीव नुसता घाबराघुबरा झाला होता.
महापूर
महापूर
वरुणराजाच्या अंतरी आले |
काळे मेघ जमा केले |
अचानक बरसु लागले |
भूमीवरी ||1||
पाऊस पडला मुसळधार |
तंव नद्यांना आला पूर |
बुडाली खेडी आणि शहरं |
तयांमध्ये ||2||
सांगली आणि कोल्हापूर |
तेथे आला महापूर |
कित्येकांचे घर संसार |
वाहून गेले ||3||
पाण्याची पातळी वाढता |
लोकांची वाढली चिंता |
पुढे काय होईल आता |
कळेना काही ||4||
पुराचे पाणीजेंव्हा वाढले |
लोकं घरात अडकुन पडले |
कोणी गच्चीवरती चढले |
भिती पोटी ||5||
मिडियांनी खबर घेतली |
बातमी लोकांसमोर आणली |
सरकारी यंत्रनाही धावली |
मदतीला ||6||
एनडीआरएफ़चे जवान आले|
बचाव कार्य सुरु झाले |
जीव धोक्यात घालून गेले|
पाण्यामध्ये ||7||
तेंव
लक्षात राहिलेले प्रसंग...
आपल्या इथे गाजलेल्या हिंदी-मराठी सिनेमांची संख्या कमी नाही. गुरुदत्त पासून ते अनुराग कश्यपपर्यंत अनेक निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे गाजले. सिनेमे येतात...गाजतात....आणि जातात. मागे उरते ती त्यांची चर्चा. त्या सिनेमातल्या चांगल्या गाण्यांची, प्रसंगांची आणि कलाकारांच्या अभिनयाची चर्चा पुढे वर्षानुवर्षे सुरु असते. उदाहरणार्थ...शोले म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे गब्बरसिंग आणि त्याच्या एंट्रीचा सीन....कितने आदमी थे????
गब्बरसिंगची एंट्री ह्याहून जबरदस्त होऊच शकली नसती. मान्य....एकदम मान्य!! पण मुद्दा जरा वेगळा आहे.
इंद्रधनुष्य
इंद्रधनुष्य
लहान मुलांचं जग काही वेगळच असत. आपल्याला सुचणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी या मुलाना सहज सुचतात आणि आपल्याला नवल वाटत राहत. गणपतिला आम्ही आमच्या गावाला वेळणेश्वरला गेलो होतो. ईशानला माझ्या मुलाला इथे एक नवीन अन्वी नावाची मैत्रीण मिळाली. आम्ही बाहेर फिरायला जाताना ईशान बरोबरच अन्वीला देखील घेतली. अतिशय बडबड करणारी हि गोड मुलगी ४ वर्षाची आहे. येताना हलकीशी पावसाची सर पडली आणि लगेचच लख्ख ऊनदेखील पडल. सहजच वळून बघितलं तर पूर्ण इंद्रधनुष्य पडलं होतं. अगदी पूर्ण १८० अंशात. खूपच सुंदर देखावा होता तो. मुद्दाम गाडी थांबवून मुलांना दाखवलं ते सुंदर दृश्य. मुलं देखील खूप खुश होती.
"गोकूळाष्टमी स्पेशल"गोपाळकाला by Namrata's CookBook :१६
साहित्य Ingredients:
२ वाटी जाड पोहे(नेहमी पोह्यासाठी जे वापरतो ते पोहे)
१ वाटी मुरमुरे/चिरमूरे
१ लाह्या
हिरव्या मिरच्या ३(आवडीप्रमाणे)
डाळे
शेंगादाणे(भाजून)
डाळिंब
१ वाटी घट्ट दही
मीठ
साखर
कोथिंबीर
तेल/तुप
जिरे
हळद
मोहरी (आवडीप्रमाणे)
काकडी,केळी, सफरचंद (आवडीप्रमाणे)
लोणचे (आवडीप्रमाणे)
क्रमवार पाककृती:
१. पोहे २-३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या(पोहे जास्त भिजवायचे नाहीत फक्त ओले करायचे).
२.स्वरराधा
भैरव वा भटियार
पहाट फुलवत येती,
स्पर्श जणू कान्ह्याचे
राधेला उठवुन जाती.
ठाऊक तिला सारंग
माध्यान्ही झुलवत येतो,
"गंध" न त्यास स्वत:चा
तरि वृंदावनी घमघमतो.
यमन असा कान्ह्याचा
यमुनेचे श्यामल पाणी.
निनाद गोघंटांचा
सांज करी कल्याणी.
मालकंस वा जोग,
अमृत बरसे गात्री.
कान्ह्याच्या ओठी वेणू
तिच्याचसाठी रात्री.
कणकणात भिनली आहे
मल्हाराची आस,
मेघ पेटवून जातो
मयूरपंखी प्यास.
पण सूर भैरवीचा का
राधेला माहीत नाही?
युगे उलटली, अजुनी
राधा तर वाटच पाही..
काव्यरस
युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३६
कुटीच्या दाराची हालचाल झाली. विदूरने आत प्रवेश केला तसे कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले.
"प्रणाम, आत येण्याची परवानगी आहे?"
"प्रणाम विदुर. आज तुम्ही या द्रोणाचार्याच्या कुटीत?" द्रोणांनी आश्चर्याने विचारले.
"मनात प्रश्न होते काही."
"तुम्हाला प्रश्न पडलेत, विदुर? खुद्द धर्मात्म्यास?"
"मनाला कश्याचे बंधन असते, गुरु द्रोण? एका निमिषात असंख्य प्रश्न पडतात त्याला.
एक नष्ट झालेलं करिअर!
सांप्रत काळ मोठा कठीण आहे.
सध्या भारतात आणि जगात आर्थिक मंदीच आगमन झालं आहे की ही फक्त सुरुवात आहे यावर अनेक असलेले आणि नसलेले अर्थतज्ञ डोकेफोड (एकमेकांचे) करत आहेत. पण रिकाम्या वेळात फालतू पिक्चर बघणे ह्या उद्योगात गेल्या काही वर्षात प्रचंड मंदी आहे. वास्तव वगैरे पिक्चर यायला लागल्यापासून तर काही करिअर हे जवळपास नष्ट झाले आहेत. हे बघून अस्मादिकांना प्रचंड हळहळ वाटत आहे.
त्यापैकीच एक म्हणजे कुठल्याही जुन्या सिनेमामध्ये मुख्य गुंडाचे साथीदार, म्हणजे ‘असिस्टंट गुंड’ हे करिअर. गेल्या कित्येक सिनेमांमध्ये हे कोरस गुंड गायबच झाले आहेत. एक काळ ह्या पंटर लोकांनी खूप गाजवला.
मिसळपाव