मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"गोकूळाष्टमी स्पेशल"गोपाळकाला by Namrata's CookBook :१६

Namokar · · पाककृती
साहित्य Ingredients: २ वाटी जाड पोहे(नेहमी पोह्यासाठी जे वापरतो ते पोहे) १ वाटी मुरमुरे/चिरमूरे १ लाह्या हिरव्या मिरच्या ३(आवडीप्रमाणे) डाळे शेंगादाणे(भाजून) डाळिंब १ वाटी घट्ट दही मीठ साखर कोथिंबीर तेल/तुप जिरे हळद मोहरी (आवडीप्रमाणे) काकडी,केळी, सफरचंद (आवडीप्रमाणे) लोणचे (आवडीप्रमाणे) क्रमवार पाककृती: १. पोहे २-३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या(पोहे जास्त भिजवायचे नाहीत फक्त ओले करायचे). २. एका भांड्यात पोहे , मुरमुरे/चिरमुरे , ज्वारीच्या लाह्या घालून चान एकत्र करुन घ्या ३. आता डाळे , शेंगदाणे (भाजलेले), बारीक चिरलेली मिरची (अर्धी चिरलेली मिरची बाजूला ठेवावी), दही घालून छान मिक्स करा. ४. आता यामध्ये हळद(optional), चवीनुसार मीठ , साखर , डाळिंब घाला (आपण काकडी, सफरचंद, केळी देखील घालू शकता) ५. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा ६. आता फोडणीसाठी कढईत तेल / तुप घाला ,तेल गरम झाले की जिरे, बारीक चिरलेली मिरची घालून १ मिनीट परतून घ्या ७. तयार फोडणी गोपाळकाला मध्ये घालून छान मिक्स करुन घ्या गोपाळकला तयार आहे अधिक टिपा: आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये काकडी, सफरचंद, केळी देखील घालू शकता रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/4JI3IVKWy3o

वाचन 5087 प्रतिक्रिया 0