Skip to main content

तुझ्या भेटीला आलो दत्ता

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/09/2019 05:22 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या भेटीला आलो दत्ता सत्वरी या आता || तुझ्या मंदीराची केली वाट सोपी नसे काही चिंता, मनी आस मोठी वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा || भक्तांची दु:खे करुनीया दूर दिले जीवनात सुख भरपूर सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता || पाहूनिया रुप होईल मनाची शांती नसे आस कसली, तिच विश्रांती सखा तूच गुरू तूच तूच होई दाता || ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां || - पाषाणभेद २८/०९/२०१९

बाबा आणि खुशीची नेपाळ सफर

लेखक Yogesh Sawant यांनी शुक्रवार, 27/09/2019 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
"तुझी लढाई फक्त तुझ्या स्वतःबरोबर आहे. दुसऱ्या कुणाबरोबर नाही. इतरांकडे लक्ष देऊ नकोस." बाबा ऐकत होता. अडकून पडलेलं एक दार उघडत होतं. बाहेरून मदत मिळाल्यावर बऱ्याच वर्षांपासून अडकलेलं दार उघडलं. एके दिवशी बाबा विचार करत होता, "जर आपण दार अडकूच द्यायचं नाही असं ठरवलं तर?" ठरवणं हि पहिली पायरी. सतत जागरून राहून प्रयत्नपूर्वक पुढे जाणं हि योग्य वाटचाल. आपली वाट आपणच शोधावी लागते. दुसऱ्या कुणावर सोडून देऊन चालत नाही. असे शेकडो धडे जगाच्या बिनभिंतीच्या शाळेत मिळतच असतात. शिकणाऱ्याला. शिकायची इच्छा नसणाऱ्याची घागर रिकामीच राहते.

या पसाऱ्याचं काय करावं?

लेखक राजे १०७ यांनी शुक्रवार, 27/09/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक खरेदी वेडा माणूस आहे. खरेदीची ओसीडी झाल्यासारखं नुसती खरेदी करत असतो. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपन्या निघाल्या पासून लाखो रुपयांची खरेदी केली आहे. अगोदर मॉलमध्ये फेरफटका मारुन शेपाचशेची खरेदी दिवसाआड ठरलेली. दारात चार मोटार सायकली, एक कार उभ्या आहेत, तीन सायकली, वीस पंचवीस चपला बुटांचे जोड, चांगले असलेले पंखे, भांडीकुंडी, कुकर अडगळीत पडलेले आहेत. दोन ओव्हन नवेच्या नवे, गॅस शेगड्या, मिक्सर लॉफ्टवर जागा अडवून बसले आहेत. विजेऱ्या, घड्याळं, दोन-तीन इस्र्या, जूनं कपाट, हिटर, कुलपं, जूने सिआरटी मॉनीटर, टिव्ही, कॅमेरे आणि शेकडो पुस्तकं एकदम चांगल्या स्थितीत आहेत.

दोन नको देऊ...

लेखक राजे १०७ यांनी शुक्रवार, 27/09/2019 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे ही. सदुबा नावाचा माणूस असतो. कलाबाई त्याची बायको. दोघं मस्त जगत असतात. एक दिवस सदुबा मित्राला जेवायला बोलवायचं ठरवतात. सदुबाचा मित्र गणपा खूप सज्जन माणूस होता. वेळप्रसंगी सदुबा आणि कलाबाईला कामा पडायचा. एक दिवस सदुबानं दोन मासे आणून कलाबाईकडं दिले व मस्त आमटी, भाकरी, भात बनवायला सांगितले. जेवायला गणपा येणार आहे हेही सांगितले. कलाबाईनं मस्त जेवण रांधलं. माशाचं कालवण म्हटल्यावर तिला मन आवरेना. थोडं वाढून घेतलं आणि भाकरी सोबत खाल्लं. अजून थोडे घेतलं, अजून थोडे.. असे करता करता सगळं कालवण संपवलं.

radio ga ga

लेखक क्षितिज जयकर यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

जाणिवांची अंतरे

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्वचेच्या रंगांवरून अगदीच वेगळे ओळखे जाऊ अशा देशात मी राहतेय सध्या. आपण कितीही म्हटलं तर मनाच्या एका कोपऱ्यात आपण खरंच सामावले जाऊ का इथल्या लोकांच्यात हा प्रश्न येतोच. मुलाची शाळा इंटरनॅशनल स्कूल. त्यात जगाच्या चारी कोपऱ्यातून आलेली पिल्लं. माझ्या पिल्लासारखीच. हसरी पण नवीन जागेला बावरलेली. पण ती एकमेकांचे छान दोस्त होतात. नवऱ्याच्या ॲाफिसमध्येही तसेच पूर्ण जगभरातून आलेले लोक. पण काम करता करता त्यांचीही गट्टी होते. राहता राहिले मी. सध्या ऑफिसला जात नसल्याने माझा तो लोकांच्यात मिसळायचा मार्ग नाही. मग उरतात मला रोज भेटणारे लोक.

सिकन मटन फिस

लेखक मृणमय यांनी शुक्रवार, 27/09/2019 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज मध्ये असताना मला अनेक भाषा फाडायला मिळाल्या. कोकाट्याच्या फाडफाड इंग्लिश बरोबरच मी फाडफाड ( तोंडात रोसोगुल्ला ठेवून फॉडफॉड) बंगाली, असामीज आत्मसात कि भस्मसात केली माहित नाही. पण ह्या माझ्या गुणांमुळे मी नॉर्थ च्या खूप मैत्रिणी जमवल्या होत्या. त्यांचे राहणीमान आपल्यापेक्षा खूप वेगळे. त्या दिसायला पण इतक्या वेगळ्या कि नेपाळी किंवा तिबेटियन ,म्हणून सहज खपतील. बसके नाक आणि बारीक मिचमिचे डोळे. आता विचार करा ह्या डोळ्याच्या इवल्याश्या फटीतून डोळ्याचे हाव भाव कसे दिसतील? इमॅजिनेशन करून झाले असेल तर सांगते खूप छान दिसतात. अगदी जसे च्या तसे, पाहण्याची कला आपल्यात हवी.

पाहूणा पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/09/2019 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी ब-याच दिवसात भेटला नाही तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा पण तूच माझ्याशी बोलत नाही मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले अगदी जवळ गेल्यासारखे भासविले पण त्याचे मनात काही वेगळेच असेल जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले
काव्यरस

आनंद

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 26/09/2019 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद ---------------------------------------------------------------------------------------------------- कपडे चढवताना तिने त्याला खुषीत डोळा मारला . “मजा आली ! ” तिच्या या वाक्यावर तो चमकला. एक धंदेवाली असं म्हणते ?... त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तीच पुढे म्हणाली , “प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असं माझं तत्व आहे. जग दुःखाने भरलेलं आहे . आपण का दुःखी व्हायचं ? हे काम करताना पैसाही मिळतो . पण मी त्या कामाचाही आनंद लुटते –मनापासून !