Skip to main content

या पसाऱ्याचं काय करावं?

लेखक राजे १०७ यांनी शुक्रवार, 27/09/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक खरेदी वेडा माणूस आहे. खरेदीची ओसीडी झाल्यासारखं नुसती खरेदी करत असतो. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपन्या निघाल्या पासून लाखो रुपयांची खरेदी केली आहे. अगोदर मॉलमध्ये फेरफटका मारुन शेपाचशेची खरेदी दिवसाआड ठरलेली. दारात चार मोटार सायकली, एक कार उभ्या आहेत, तीन सायकली, वीस पंचवीस चपला बुटांचे जोड, चांगले असलेले पंखे, भांडीकुंडी, कुकर अडगळीत पडलेले आहेत. दोन ओव्हन नवेच्या नवे, गॅस शेगड्या, मिक्सर लॉफ्टवर जागा अडवून बसले आहेत. विजेऱ्या, घड्याळं, दोन-तीन इस्र्या, जूनं कपाट, हिटर, कुलपं, जूने सिआरटी मॉनीटर, टिव्ही, कॅमेरे आणि शेकडो पुस्तकं एकदम चांगल्या स्थितीत आहेत. भंगारात द्यायला मन होत नाही. मोबाईल हॅण्डसेट दहा-बारा पडले आहेत, कपडे बेडशीट तर साचतच जात आहेत. जुन्या कापसाच्या गाद्या जागा अडवून बसल्या आहेत. खूर्ची टेबलं अडगळीच्या खोलीत धुळखात पडली आहेत. गरज नसताना वेगवेगळ्या पकडी, पाने, करवती, स्क्रू ड्रायव्हर, हातोड्या, ड्रील मशीन, ब्लोअर, व्हॅक्यूम क्लीनर, बागकामाची हत्यारं याची हजारो रुपयांची खरेदी करून ठेवली आहे. दिवसातून एकदा तरी या साईटवर भेट देतोच, मेलबॉक्स सुध्दा याच साईटींच्या मेलनी भरलेला असतो. नवीन गॅजेट्स पाहिली की मन कंट्रोल होत नाही. हेडसेट, हेडफोन्स, ब्लूटुथ स्पिकर, प्रिंटर अशा अनेक गोष्टी आधी विकत घेतल्या आहेत तरी परत परत घ्याव्या वाटतात. शूज अक्षरशः न वापरता फेकून दिले आहेत. तरीही वेगवेगळ्या ब्रॅण्डचे शूज खुणावत असतात. मनावर कितीही ताबा ठेवला तरी ब्रेक सैल केला की खरेदीची गाडी परत सुसाट धावत सुटते. घरच्यांनी आता समजावणं सोडून दुर्लक्ष करण्याची सवय करून घेतली आहे. एवढा पसारा करुन ठेवला पण जुन्या वस्तू टाकवत नाहीत व कोणाला सेकंडहॅंड द्यायलाही मन होत नाही. पाश्चात्त्य देशांत गराज सेल तरी असतो. पण आपल्याकडे असं नाही. ओएलेक्स, क्विकर फार डोकेखाऊ प्रकरण आहे. त्याच्या नादाला लागणं मला तरी शक्य नाही. मी स्वत:ला खरेदीपासून कसं थांबवावं याचे उपाय कृपया सुचवा. धन्यवाद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17767
प्रतिक्रिया 62

प्रतिक्रिया

तुमची जन्मतारीख किंवा राशी कळेल काय ? त्यानुसार उपाय सांगता येतील.

तुम्ही व्यनीतुन मला कोणती वस्तू किती रुपये किंमतीत विकणार आहात याची यादी द्याल काय . मला शेगडी , मोबाईल आणि ब्लू टूथ या वस्तू हव्या आहेत.

In reply to by राजे १०७

ओएल एक्स, क्विकरवर फार पडून मागतात लोक.
मला पत्ता द्या. फुकट पाठवून देतो. असा विरोधाभास का ?

In reply to by जॉनविक्क

तिकडच्या लोकांना हाव सुटल्यासारखं काहीच्या काही बोलतात. नाही म्हटलं की काय काय ऐकवतात.

तुमच्याकडे कानांवर वरून लावायचे हेडसेट आहेत का ? असतील तर कृपया फोटो आणि किंमत सांगा. मला हवे आहेत.

तुम्ही जेव्हढ्या रकमेची खरेदी करता ती रक्कम मला पाठवून देत चला.... विनोदाचा भाग निराळा, पण प्रत्येक वेळी ऍमेझॉन, फ्लिपकार्ट उघडलत कि गरीब, अनाथ मुलांचा किंवा ज्यांना 2 वेळा जेवण पण मिळत नाही अश्या लोकांना आठवा. खरेदी थांबेल हळू हळू. राहिला प्रश्न आधी घेतलेल्या पण वापरात नसलेल्या वस्तूंचा... एखाद्या अनाथाश्रमात किंवा ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रात देऊन टाका गाद्या, खुर्च्या, टेबलं वगैरे.... बघा पटतंय का....

In reply to by समीर वैद्य

समीर जी खूप सुंदर सल्ला दिला आहे आपण. पण वापरलेल्या वस्तू कुणाला द्यायला कसेसेच वाटते. आमच्या इथे माणुसकीची भिंत आहे, तिकडं काही दिल्यात.

In reply to by सतिश गावडे

माझ्या घरातील सर्व सरकारी नोकरी करत होते, करतात. भरपूर पगार, पेन्शन मिळते. वडिलोपार्जित संपत्ती अफाट आहे. आई-वडील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. बायको पंचेचाळीस हजार रुपये पगार कमावत आहे. मुलं शिकून नोकरीला आहेत.

In reply to by राजे १०७

खुप छान वाटले. मन रमेल आणी खर्चावरही नियंत्रण येईल.

In reply to by जॉनविक्क

कुत्रा आहे ना. दररोज मारी बिस्किटे खातो. इतका सुंदर कुत्रा आहे की बस.

In reply to by राजे १०७

त्याला एका बिस्कीटाचे चार तुकडे करुन घाला म्हणजे त्याला चार बिस्किटे दिल्यासारखे वाटेल व त्याचे तुमच्यावरील प्रेम चार पट वाढेल :)

In reply to by जॉनविक्क

मैंनेकिस्कोभी .. बनाया नयी. जो.. होते हैं उनको आवूर कैसे .. बनानेका भै.

In reply to by राजे १०७

मैंनेकिस्कोभी .. बनाया नयी. जो.. होते हैं उनको आवूर कैसे .. बनानेका भै.
ओह क्लिमिश बौ... तुमारे नजर्मे वो पायलेसेही वाइसे हाय वय... बरं बरं.

तुमचे (लिहून) जमा केलेले लेख धडाधड मिपावर रिकामे करत आहातच. तसाच थोडासा विचार करून शोध घेतलात तर, इतर वस्तू देण्याजोगी जागा सापडेलच. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तिकडे आणि इकडे एकाच दिवशी लेख टाकले आहेत. माझ्या अप्रतिम लेखनाचा आस्वाद आपणास घेता यावा म्हणून इकडे लेखन प्रपंच केला आहे.

उद्या पासून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीवर मेगा सेल चालू होतोय (प्राईम मेम्बर्स साठी सुरु झाला सुद्धा). तुम्ही खरेदीची हौस भागवण्यासाठी करा शॉपिंग, फक्त माझ्या पत्त्यावर पाठवा. तुमची हौस पण भागेल आणि घरी पसारा पण नाही होणार

सुरक्षिततेच्या कारणास्तव माझा पत्ता देऊ शकत नाही. तुमचा पत्ता कळवा.शंभर टक्के सामान पोच करतो.

In reply to by राजे १०७

आणी आम्ही निवडलेल्या वस्तू घेऊन पाताळेश्वरला भेटा, तेथून आम्ही कलेकट् करू जे जे हवंय ते.

In reply to by राजे १०७

काय काय घेऊन किती वाजता येणार ते सगळे डिटेल्स लिहा आम्ही पोचतोच आहोत.

कंपल्सरी बायिंग डिसऑर्डर ही एक सामाजिक मानसशास्त्रात नोंद असलेली पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. ऒनलाईन शॉपिंग मुळे ती फक्त तुम्हा आम्हाला दिसायला लागली आहे एवढच. विकिपिडियावर याची विस्तृत नोंद आहे. https://en.wikipedia.org/wiki/Compulsive_buying_disorder

In reply to by प्रकाश घाटपांडे

धन्यवाद प्रकाश सर. मला तरी असा आजार असावा हे वाटतंय.

In reply to by राजे १०७

तुमच्या सारखे लोक अजून असणं फार गरजेचे आहे

माझ्या सारखे लोकच अर्थव्यवस्थेला चालना आणि लोकांच्या हाताला काम देत असतात. कंजूस, चिक्कू लोक फक्त पैसा साठवत राहतात. पैसा मिळवून त्याचा उपभोग घेता आला पाहिजे.

In reply to by राजे १०७

आणी तरी तुम्हाला प्रश्न पडतात की या पसाऱ्याचे करायचे काय ? अतिशय अराष्ट्रवादी प्रश्न आहेत तूमचे.

वॉल्डन वाचून पहा... काही फरक पडतोय का .. माझ्यात तरी पडलाय. मी हे पुस्तक अनुवादित केले आहे म्हणून सांगत नाही... गैरसमज नसावा (कोणाचाही)

मी स्वत:ला खरेदीपासून कसं थांबवावं याचे उपाय कृपया सुचवा. >> संपादक महाशय मला चांगले उपाय , ठोस माहिती कळेल असे वाटलं होतं. पण काही महाभागांनी टिंगलीचा सूर लावला. काही भिकाऱ्यासारखे वस्तू आम्हाला वाटा असे म्हणू लागले. प्रकाश घाटपांडे यांनी योग्य सल्ला दिला. उथळ, नालायक लोकांनी मिपाचं डबकं करून टाकले आहे. मी परत इकडे लिहिणार नाही आणि इकडचं काही वाचणार सुध्दा नाही. धन्यवाद.