मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद

बिपीन सुरेश सांगळे · · जनातलं, मनातलं
आनंद ---------------------------------------------------------------------------------------------------- कपडे चढवताना तिने त्याला खुषीत डोळा मारला . “मजा आली ! ” तिच्या या वाक्यावर तो चमकला. एक धंदेवाली असं म्हणते ?... त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तीच पुढे म्हणाली , “प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असं माझं तत्व आहे. जग दुःखाने भरलेलं आहे . आपण का दुःखी व्हायचं ? हे काम करताना पैसाही मिळतो . पण मी त्या कामाचाही आनंद लुटते –मनापासून ! इतर पोरींसारखं नाही “… ती एक कॉलेजतरुणी होती , ऐश करण्यासाठी पैसा मिळवायला हे काम करणारी. खच्च्यॅक ! तिच्या मानेतून लालभडक रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या . त्याचा चाकू तिच्या मानेत रुतला होता. तिच्या डोळ्यात अविश्वासाची भावना होती. तो सीरिअल किलर म्हणाला , “ तुझ्यासारख्या रांडांना गाठून त्यांना खलास करण्यात मलाही आनंद मिळतो- मनापासून ! कळलं?” … ---------------------------------------------------------------------------------------------

वाचने 2303 वाचनखूण प्रतिक्रिया 2

जॉनविक्क 27/09/2019 - 11:26
:D तुमचा राम गोपाल वर्मा झाला. म्हणजे प्रयत्न स्तुत्य आहे पण...