साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन!
साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन
आपल्या भारत देशात तरुणांची संख्या खूप आहे . त्यातही मतदान करणारा टक्का तर अधिकच . मतदार हा निवडणुकीपुरता का होईना राजा असतो . पण सध्या माझ्या पाहण्यात काही असे राजे/ राण्या आल्यात जे फक्त साक्षर आहेत, सुशिक्षित नाहीत . दुर्दैवाने हे खरे आहे . तिकडे मोदी ओरडून सांगतायत कि आजच्या युवा पिढीमध्ये भारत बदलायची ताकद आहे. पण मोदी, फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असताना आपण त्यातला मतदानाचा खारीचा वाटसुद्धा उचलू शकत नाही हि मोठी खंत आहे. दुर्दैवाने त्यांना हे कळत असूनही त्या दृष्टीने पावलं उचलणं त्यांना जमत नाही .
मिसळपाव