Skip to main content

"माळ्याच्या मळ्या मध्ये कोण ग उभी "

लेखक Sanjay Uwach यांनी रविवार, 29/12/2019 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
फुकटची प्रसिद्धी हि कुणाला आवडणार नाही . दूरदर्शनवर दिसणारे कलाकार यांचा मला उगीचच हेवा वाटतो . अर्थात आमच्या लहान पणी टीव्ही हा प्रकार नव्हता ,रेडीओ असायचा.

रायगड भ्रमंती

लेखक मालविका यांनी रविवार, 29/12/2019 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
रायगड भ्रमंती दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही रायगड किल्ल्यावर जायचे ठरवले. मी, नवरा श्रीनिवास, मुलगा ईशान (इयत्ता ३री ) आणि भाची जुई (इयत्ता ५वि ). मुलांनी छत्रपती संभाजी मालिकेत अनेकदा ऐकलेला रायगड प्रत्यक्षात कसा आहे बघितला नव्हता. आता जरा मोठी झाल्याने त्यांना किल्ला, आणि त्याची माहिती कळेल अशी आशा होती. त्याप्रमाणे आम्ही प्लॅन केला. जाताना आम्ही चढून जायचं ठरवलं आणि येताना रोप वे ने. जेणेकरून मुलांना दोन्हीची ओळख होईल. रायगड चढायला १६०० पायऱ्या आहेत असं ऐकलं होतं. मुलं कितपत जमवतील जरा शंका होती. पण मुलांचा उत्साह होता. जमेल जमेल म्हणून उड्या मारत होती.

Whatsapp Romantic Shayari

लेखक तृप्ति २३ यांनी शनिवार, 28/12/2019 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari
काव्यरस

भारतीयांचे अपमानास्पद पराभव !! प्रकरण -१ खडकीची लढाई

लेखक kvponkshe यांनी शनिवार, 28/12/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग -१ भारताला वर्षानुवर्षांचा युद्धेतिहास आहे. या लढायांची यादी अगदी मागे खेचत नेली तर पुराणात वर्णिलेल्या देव दैत्य संग्रामापासून सुरु होईल आणि राम रावण युद्ध , भारतीय महायुद्ध , झेलम चे युद्ध वगैरे प्रवास करत करत १९९९ साली झालेल्या कारगिल युध्दपाशी येऊन थांबेल .यातील काही लढाया अंतर्गत आहेत तर अनेक परकीय शत्रूं विरुद्ध लढलेल्या आहेत .काही लढायातील विजय अभिमानाने मान उंचावणारे आहेत तर अनेक लढयातील पराभव हे शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. या लेख मालेद्वारे आपण भारतीयांना अशा शरमेने मान खाली घालणाऱ्या लढायांची चर्चा कारणार आहोत .

सूर जाणिले कोणी

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 28/12/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
खाली दिलेल्या लिंकवर जे गाणे आहे त्यावर काहीतरी खरडलंय. https://youtu.be/kWOXZmIIrSo २ दिवसांपूर्वी ९ वीच्या अभ्यासक्रमातील 'मेंदू'शी झटापट सुरू होती. उजवा बाजूला कुठली केंद्र व डाव्या बाजूला कसले हिशोब असं काय काय चर्वीचरण चालू होतं. "संगीत, नृत्य अशा कलांची जबाबदारी उजवा भाग घेतो." वाक्य वाचून झालं. आता हे शिकवायचं कसं ? का घेतो? कशी घेतो? कोण व कधी ठरवतं? जन्मतः घेऊन येतो हे सेटिंग का समाज व परिस्थितीनुसार बदलतं? हा माणूस अरसिक / रसिक असणार हे उजवा किंवा डावा भाग छापून आणत असतील तर बरंच आहे.

वृक्षतोड...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 27/12/2019 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
दिसतील ती झाडे, कापीत चाललो मी होऊन मेघ काळा, शापित चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने ओले अधीर अश्रू, कुरवाळीत चाललो मी पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत दिशाहीन प्रवासात, ऐटीत चाललो मी डागाळला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी -------- शब्दमेघ (Edited)

(प्रच्छन्न)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 27/12/2019 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थात ती विडंबित कविता धूसर होऊन विरून जाते कधी उचकापाचक करता करता अवचित दिसते पुन्हा विडंबन ते प्रतिक्रियांच्या पल्याड नेते अन् नकळत हसू अवखळसे ओठांवर येते चिवट कवी हे घाव विडंबित सोशीत राहतो अन् पुन्हा नवा कच्चा माल पाहूनी मी प्रच्छन्न हसतो पैजारबुवा,

प्रसन्न

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 27/12/2019 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
ते विस्मृत गाणे धूसर होऊन विरून जाते पण नेणीवेच्या अथांग डोही अवचित दिसते मग पुन्हा गीत ते शब्दांच्याही पल्याड नेते अन् नकळत अश्रु झरताना ओठांवर येते मग पुन्हा पुन्हा मी घाव सोसुनी लढत राहतो अन् कितीही हरलो तरी खळाळून प्रसन्न हसतो
काव्यरस

सोमा टक्रीकर -- एका कालवश मर्मस्पर्श

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 27/12/2019 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
(बॉल्टिमोर मराठी मंडळाच्या दिवाळी २०१९ अंकात मूळ प्रकाशित अद्भुत-भविष्य-रम्य कथा, जालावर अन्यत्र सहप्रकाशित) … (T)ouch … gives us our sense of 'reality'… rainbows, reflections in looking glasses, and so on (cannot be touched) … our whole conception of what exists outside us is based on the sense of touch. -- Bertrand Russell in ABC of Relativity ------- बॉल्टिमोर, सोमवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०३५. मागच्या शनिवारी, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सोमा टक्रीकर विलीन झाले, परंतु जालविश्वात या बातमीचे पाच लाखापेक्षा कमी पुनःस्पर्श झाले.

चित्रपट परीक्षण - पानिपतचे पानिपत !

लेखक kvponkshe यांनी गुरुवार, 26/12/2019 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcS0jmiD28tffm_2izq… निर्माते कशासाठी चित्रपट काढतात ? लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ? खरा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून ? समाज प्रबोधन करण्यासाठी? वरील प्रश्नाचे खरे उत्तर "पैसे कमावण्यासाठी " हेच आहे. जेव्हा एखादा निर्माता शेकडो कोटी खर्च करून एखादा चित्रपट काढतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की त्यातून त्याचे शेकडो कोटी वसूल व्हावेतच, शिवाय अधिक शेकडो कोटींचा नफा व्हावा. आता उलट बाजू विचार करू.