Skip to main content

मतदार हुशार झालेत का ?

लेखक विवेक9420 यांनी शुक्रवार, 28/02/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

कृतघ्न -1

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 27/02/2020 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : मला दीर्घ लिखाणाचा कोणताही अनुभव नाहीये. पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुकल्यास मिपाकर मोठ्या मनाने माफ करतील हि अपेक्षा. मे 2016 गावातील एक प्रितिष्ठित घर, ज्या घरी पैसा , संपत्ती सामाजिक मान सन्मान या सर्वांची कोणतीही कमतरता नव्हती असे हे घर. या घराने खूप उन्हाळे पावसाळे पहिले होती. कमालीची दरिद्री. शेती असून देखील ती करायला येत नाही कारण सर्व जमिनींवर दावे आणि कोर्टकचेऱ्या, घरी सदैव सासू सुना आणि जावा यांची भांडणे आणि त्यात सतत कोणाचे ना कोणाचे तरी आजारपण. घरात एकूण नऊ भावंडे. पण कोणाचाच कोणाला मेळ नाही.

माय मराठी

लेखक bhagwatblog यांनी गुरुवार, 27/02/2020 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीचा बोलण्यात गोडवा शब्द जणू शीतल हवेचा गारवा बोली भाषेची गोष्टच न्यारी जणू तुळस आपल्या दारी बारा कोसाला भाषा बदलते माय मराठी सर्वांना जोडते संतांनी गायिले मराठीचे रंग रूप अलंकारांनी नटले सोज्वळ स्वरूप प्राण मराठी जाण मराठी उल्हास मराठी महाराष्ट्राचा ज्वाजल्य अभिमान मराठी माय मराठी आम्हा सर्वांचीच आई सगळ्या लेकरांना अलगद कवेत घेई मराठी अस्मिता मराठी मान मराठी शान मराठी म्हणजे शब्द अनं आभूषणाची खाण मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
काव्यरस

तिरुपती दर्शन (पूर्वतयारी) भाग १

लेखक AKSHAY NAIK यांनी गुरुवार, 27/02/2020 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, तिरुपती दर्शनासाठी ५ मार्च ला जाण्याचा मुहूर्त काढला आहे. यापूर्वी तिरुपती पहिले नसल्यामुळे जाण्याची प्रचंड उस्तुकता आहे. त्यातही कॉलेज मधील मित्र मंडळींसोबत जात असल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला आहे. तयारी तर झाली आहे, बँग पाठीला बांधून निघण्याचा दिवस कधी उजाडतो याची वाट पाहत आहे. जाणकार मंडळींकडून काही सूचना, इतर काही पाहण्याची ठिकाणे, आलेले अनुभव इत्यादी चे स्वागतच आहे. त्याचे झाले असे की, मागच्या महिन्यात एका मित्राच्या लग्नामध्ये आमची कॉलेज मधील काही मित्रमंडळी भेटली. गप्पाच्या ओघात एकत्र कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत पक्का केला.

माय-(मराठीची) पोएम

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 27/02/2020 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज मराठी भाषा-दिन. मराठी असे आमुची मायबोली या कवितेचे कवि माधव ज्युलियन आज असते तर अनेक घरात बोलली जाणारी मिंग्लिश भाषा ऐकून त्याना असे म्हणावे लागले असते? ============ मराठी असे आमुची मायबोली जरी एव्हरी डे यूजमध्ये नसे नसो आज ऐश्वर्य त्या माऊलीला सक्सेसची तिच्या होप आम्हा असे ॥१॥ जरी पंचखंडांतही मान्यता घे पाॅवरफुल नि पाॅप्युलर इंग्रजी मराठी भिकारीण झाली तरीही तिचा आॅफस्प्रिंग तीस केवीं त्यजी ॥२॥

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 27/02/2020 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो न्हावी होता बिझी म्हणून पेपर वाचू लागलो पेपर वाचता वाचता एक जाहिरात बघितली होती तशी छोटी पण लक्षात बाकी राहिली नंबर आला जवळ म्हणून पेपर घेतला छाटून न्हावी होता मग्न कामात , दिला खिशात ढकलून भादरवुन थेट घरी मी अंघोळीला गेलो जाहिरात तशीच खिशात पडून , विजार मागे सोडून आलो दुसर्या दिवशी आरोळीने जाग मला आली मला वाटलं मनातल्या मनात, आमची हि खपली उभा राहिलो बघण्यासाठी , बघतो तर हे काय जाहिरातीचे पान हाती घेऊन डोके पिटत होती हि बाय सांगून सांगून थकलो तिला हरलो सारे उपाय अक्कल सारी गुडघ्यात यांची , दुसरं करणार तरी काय ? लंपट समजून मला तिने ,

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 27/02/2020 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. मिसळपाव परिवारातल्या समस्त मराठी जनांना मराठी राजभाषा दिनाच्या मऱ्हाटमोळ्या शुभेच्छा ! मराठी बोलूया, मराठी जपूया, मराठी वाढवूया ! हे आपलं मिसळपावडॉटकॉम चं ट्विटर खातं ज्यांना शक्य असेल त्यांनी लाईक आणि रिट्विट करा. आणि #मिसळपावडॉटकॉम हा हॅशटॅग वापरायला विसरू नका.

चला चला करबल्याला जाऊ... हुसैन (रह.)की मजार डोळा पाहू…

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 25/02/2020 20:39 या दिवशी प्रकाशित केले.

चला चला करबल्याला जाऊ ... हुसैन (रह.)की मजार डोळा पाहू…

अहो इथे अडीचशे किमी अंतरावर पाक पट्टनच्या बाबा फरीद (रह.) मजारला जायला जमेना आता करबल्याला कुठे जाताय? मियां बिबीतील संभाषणाने नकारसूर लावला. "आमा मियां, जायचं कोण म्हणतं फक्त तिथं जाणाऱ्या भाविकांच्या गमती, कष्ट, धावाधाव, परदेशचा परवाना कटकट, पैशाचा चुराडा वगैरे वाचलं ते सांगू म्हणून म्हटलं तेरी अजमेर शरीफ़ दर्ग्याची ख्वाहिश पूरी करेंगे. इंडिया में च जाएंगे!

शेतकी कॉलेजचे दिवस

लेखक बबु यांनी मंगळवार, 25/02/2020 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रा, आपण भेटलो परत पन्नास वर्षांनी या स्नेहमेळाव्यात… आणि आठवणींच्या चित्रांचे रंग परत एकदा ओले झाले... आठवला भाजी-भाकरीचा डबा, आईनं पहाटेच उठून तयार केलेला अन्नपूर्णेच्या मायेनं एसटीने आपल्यापर्यंत पोहोचवलेला ... आठवला बिनाका गीतमालाच्या सरताज गीतांचा कल्ला .. कित्येक बुडवून लेक्चर्स , गेलो मॅटिनी शो पाहायला .. आपण सर्वच कुणबीकीचा वसा आठवत लढत होतो ... अडचणींचा गोवर्धन जिद्दीच्या काठ्यांनी तोलत होतो ... आयुष्याच्या संध्याकाळी कृतार्थतेच्या सात्विक भावांनी उजळलेला तुझा चेहरा पाहताना मलाही त्या कृतार्थतेची अनुभूती येत आहे... संकल्प मनोमनी परतभेटीचा करूया...