Skip to main content

तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे हा एक मानवि मनाचा गुणधर्म आहे.. दुसर्‍याच्या जीवनाशी आपली तुलना करीत ते एक तर सुख मानतात वा दुःखी होतात... काहि मुली आपण मैत्रिणींच्या मनाने जाड आहोत हा विचार करीत अस्वस्थ होतात.. तर सहका~याची गाडी जुन्या मॉडेल ची व माझी लेटेस्ट म्हणून काहि आनंदित होतात.. अशी माणसे आपणास कायम भेटत असतात..व काहि वेळा आपण हि तसेच वागत असतो.. बाह्य गोष्टींची तुलना करताना बरेच वेळा आपल्या आयुष्याची नेमकि किंमत काय? आपण काय मिळवले याचे मुल्य मापन करण्याची क्षमताच आपण हरवुन बसतो...व बाहे्रच्या गोष्टीवर आपला काहिच कंट्रोल नसल्याने एक हतबलतेची भावना येते...

क्लीओपात्रा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
क्लीओपात्राच्या सौंदर्याला सीझरच्या नश्वरतेचा शाप या भुताटकीच्या जगात सगळेच हॅम्लेटचे बाप * व्हेनीसचे व्यापारी सारे मासाचे भुकेले रोमीयोचे शहाणपण उगाळुन प्यायलेले * म्हणुन म्हणतो पोरी बरे असते स्व:ताला जपलेले ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे तारुण्याला हपापलेले..

धनेश्वर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
धनेश्वर भीतीवर खिळा ठोकत असतात मुलगा विचारतो -बाबा आमच्या कॉलेजची २ दिवस महाबळेश्वरला ट्रिप जाणार आहे -मित्र मैत्रिणी आहेत मी जाऊ का? धनेश्वर स्टूलावरून खाली उतरतात व खुर्चीवर बसतात व अचानक हातातली हातोडी कपाळावर मारतात त्यांच्या या विचित्र वागण्याने मुलगा घाबरतो व विचारतो अहो बाबा काय झाले असे का केले ? त्यावर बाबा म्हणतात -अरे विशेष काही नाही -जुना प्रसंग आठवला -तुझ्या वयाचा असताना आमची पण सहल महाबळेश्वरला गेली होती -छान थंडगार वातावरण होते -रात्रीची वेळ होती -मला झोप येत नव्हती म्हणून मी व्हरांड्यातल्या खुर्चीवर वाचत बसलो होतो - अन तेव्हढ्यात शेजारच्या रूम मधून मधु साने आली अन म्हणाली खूप थ

तिरडी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यात सारे जमले होते राम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू राधा मावशी आमरसाचा तुडुंब जेवण झालं होत राधाक्कां सार आवरा आवर केली मंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती गोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली बाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत तिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली राधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते आप्पा च वय ७७ आजारी असायचे गोद ला अंगावर चादर असलेली व्यक्ती बघता निराळाच संशय आला घरात मृत व्यक्ती असले की अश

पावभाजी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
घरात पावभाजी चा बेत असल्याने जोशीकाकूंच्या लक्षात येतेकी पावाची लादी घेण्यास त्या विसरल्या आहेत लगबगीने त्या समोरच्या जनरल स्टोअर मध्ये गेल्या व पाव लादी व दुधाची पिशवी आदी किरकोळ खरेदी केली दुकानदाराने ते सामान पातळ प्ल्यास्टीक च्या पिशवीत भरले व काकूंना दिले बाजूलाच भाजेवाला असल्याने त्यांनी भाजी खरेदी केली व पिशवीत भरली व सॊसायटी कडे त्या निघाल्या वाटेत वजन जास्त झाल्याने प्ल्यास्टीक ची पिशवी फाटली अन पावाची लादिने जमिनीकडे झेप घेतला पण जोशी काकूने चपळाईने पाव पडू दिला नाही अन सारे सामान छातीशी पकडत घर गाठले - मात्र यावेळी पावभाजीचा बेत असल्याने जोशी काकूंनी न विसरता पिशवी नेली अन सामान आणल

रँडम चॅट - लघुकथा

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 11/03/2020 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
'पुढील स्थानक दादर' .लोकलमधल्या घोषणेमुळे मंदार भानावर आला. त्याच्यासाठीचा हा रोजचा प्रवास. समोरच्या माणसांना ढकलत तो दरवाज्यापाशी आला. नेहमीप्रमाणे त्याच्याच वयाचा एक मुलगा दरवाज्यापाशी आला होता. हाही दादरलाच उतरायचा. मंदारला बघून त्याने ओळखीचे हसू दिले. तशी काही फारशी ओळख नव्हती पण रोज पाहून चेहरे ओळखीचे झाले होते. अनोळखी असूनही ओळखीचा होता तो! मंदार मात्र दरवाजातून बाहेर डोकावत होता. आज कोण जाणे काहीतरी बिनसले होते. उगाचच उदासीपणाचे मळभ दाटून आले होते. एवढ्यात दादर आले देखील. मंदार गर्दीबरोबर उतरू लागला. प्लॅटफॉर्मवर पाय ठेवताना मागून त्याला कुणाचा तरी धक्का लागला आणि तो तिथेच पडला.

खजुराहो दर्शन!!!

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/03/2020 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
img { padding: 10px; border: 1px solid #ccc; margin-top: 10px; margin-bottom: 10px: margin-left: auto; margin-right: auto; } p { text-align: justify; } जुराहो म्हंटल की एकतर आपण एकमेकांकडे बघून डोळा मारतो किंवा त्या विषयाला बगल देऊन दुसरंच काहीतरी बोलायला लागतो. का? कारण आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये कामशास्त्र या विषयावर उघडपणे चर्चा होऊच शकत नाही.... मात्र बहुतेक ज्या काळामध्ये खजुराहोची शिल्प बनली आहेत; त्या काळामध्ये कामशास्त्र हा विषय चोरून बोलण्यासारखा किंवा चर्चा न करण्यासारखा नसावा असा माझा कयास आहे.

सहावि सातवित असेन..बहुतेक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 11/03/2020 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
सहावि सातवित असेन..बहुतेक उन्हाळयाच्या सुट्या चालु झाल्या होत्या.. आमचे १०-१२ मित्रांचे टोळके बाळ पुंडलीक मित्राच्या वाड्यात दंगा करायला जमले होते... वाडा चौसोपि व.मोठा. .. आत एक विठ्ठल मंदिर हि होते..सभामंडपात सारे जमलो होतो.. गप्पा चालु होत्या.. "अन आपण नाटक करु यात का?".चंद्या घाटपांडे म्हणाला.. सा~यांनी कल्पना उचलुन धरली.. पण कोणचे? .कुणालाच सुचेना शेवटी "तुच एखादे नाटुकले लिहि..असा मला आग्रह झाला.. मित्रांच्या विश्वासाचा अन अज्ञानाचा फायदा घेत मी पण हो म्हटले.. रात्री विचार करीत अश्वथाम्याच्या कथेवर एक छोटे नाटुकले लिहिले... अश्वथामा दुध मागतो ..घरची गरीबी..

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 11/03/2020 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला असा तो व्हायरस पुचाट गेला घाबरून साहेबांना ||ध्रू|| आले आले ते परदेशी घेवून आले व्हायरसला खोकून शिंकून झाले बेजार त्यांनीच आजार पसरवला खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या एकदा व्हायरसचा आवळा गळा कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||१|| कसला हा विषाणू व्हायरस कोरोना नावाचा चायनाचा थुंकू नका, हात तोंड धुवा मास्क बांधा तुमच्या तोंडाला कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||२|| कितीक आजार आले अन गेले स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले चांगले खा प्या अन निट फिरा सांभाळून आपल्या आरोग्याला मंत्र हाच असे नाही दुसरे काही व्हायरसपासून दूर रहायला कोरो

कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - २

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 10/03/2020 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - २ गाभा :- कर्नाटक राज्यातील समुद्र आणि सह्याद्री मधली पर्यटन स्थळे बरीच आहेत आणि विखुरलेली आहेत. ती सर्व एकाच सहलीत करणे अशक्य म्हणून दोन भागांत करायचं ठरवलं होतं. समुद्र किनाऱ्याने कोकण रेल्वे जाते आणि काही स्टेशन्सला एक्सप्रेस गाड्या थांबतात. किनाऱ्यावरच्या काही शहरांतून सह्याद्री पर्वत चढून जाणारे मुख्य रस्ते आहेत आणि त्या मार्गांवर पर्यटनासाठी जागा ( बहुतेक देवळेच ) आहेत. नेचर रिझॉट्सही आहेत. एका मार्गाने वर गेलो तर दुसऱ्या मार्गावरची पाहता येत नाहीत. त्यामुळे थोडा सैल आराखडा बनवला.