Skip to main content

स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा - करोना माहात्म्य ||३||

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 09/04/2020 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
करोना माहात्म्य ||३||
स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा
 
       करोना हे संकट अक्षरश: अभूतपूर्व असे आहे. यापूर्वी अशा तऱ्हेचे संकट देशावर कोसळले होते किंवा नाही हे सांगणे तसे अवघड आहे.

भयकथांचे रमाकांत आचरेकर : लवक्राफ्ट

लेखक साहना यांनी गुरुवार, 09/04/2020 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्हाला कसिनोत जाऊन जर रुले ( म्हणजे ते फिरणारे चक्र) खेळायचे असेल तर तुम्हाला सुतारकाम शिकून फायदा नाही, तुम्हाला गणित शिकावे लागेल" - गणित तज्ञ् तालेब एकदा क्रिकेट मधील जाणकारांच्या पार्टीत रमाकांत आचरेकर ह्यांच्या नावाचा उल्लेख आला. तिथे सलील अंकोला होता. त्याने सहज म्हटले कि ज्या माणसाने आयुषांत कधीही एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही त्या व्यक्तीने अनेक महान खेळाडू घडवले ह्यावरून कोचिंग आणि प्रत्यक्ष खेळ हि एक दोन वेगळी क्षेत्रे आहेत असे लक्षांत येते. मला क्रिकेट विशेष आवडत नसले तरी अंकोलाचे शब्द मनात घर करून गेले.

पिठल्याच्या वड्या

लेखक जुइ यांनी गुरुवार, 09/04/2020 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नुकतीच रामनवमी होऊन गेली. चैत्रात माझ्या आजोळी रामाचे नवरात्र असते. तर या दिवसांमध्ये रामाला नैवेद्य म्हणून अनेक प्रकार केले जातात. जसे की लापशी खीर, पिठल्याच्या वड्या, धिरडी आणि गुळवणी इत्यादी. बर्‍याच वर्षात पिठल्याच्या वड्या करायच्या मनात होत्या. तर या चैत्रात केल्याही, हो तशाही सध्या भाज्या मिळतीलच असे नाही.

मोगँबो - ७

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/04/2020 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
वर पाहिल्यावर ती कालची बाई जीना उतरत होती. खूप घाबरले. तीने मला पहायच्या आत पळायला हवे. मी स्टेशनच्या दारातून बाहेर पडले.आणि बाहेरच्या गर्दीत मिसळले. भुकेने अंगात त्राण नव्हते. चक्कर येत होती डोळ्यापुढे अंधारी येत होती तरीही चालत राहीले. पळत राहीले. आणि या दादांच्या गाडीला धडकले." आशा सांगत होती . ऐकणारे नि:शब्द झाले होते.
मागील दुवा http://misalpav.com/node/46323 आशाचे बोलणे संपले . पण सगळे अजूनही त्याच शॉक मधे. सारंग ने ही शांतता भंग केली. ही जेंव्हा माझ्या बाईकला धडकली तेंव्हाच ठरवले आपल्याच वयाची आहे ही.

दिल हैं छोटासा, छोटीसी आशा..

लेखक आजी यांनी बुधवार, 08/04/2020 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊन चालू आहे. तो कदाचित वाढेल अशा बातम्या येताहेत. किंवा अंशतः हटेल.देशाचा काही भाग सील केला जाईल,काही भाग मोकळा ठेवला जाईल असंही बोललं जातंय. दिवसागणिक रुग्ण वाढताहेत. म्रुतांचा आकडा वाढतोय.बरेचसे भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर झालेत. रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स,नर्सेस इतर स्टाफही कोरोनाला बळी पडतोय.व्ही आय पी लोकांच्या घराच्या आसपासही कोरोना शिरलाय. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आय सी यूत आहेत. राणी एलिझाबेथ, प्रिन्स चार्लस् क्वारंटाईन झालेत. रोजच्या अशा बातम्या वाचून सुन्न व्हायला होतंय.न्यूजपेपर बंद झालेत. टीव्हीवर फक्त कोरोनाच्याच बातम्या.

"ट्रिपल एम"[मेथी मुर्ग मलई] + तंदुरी गार्लिक नान

लेखक केडी यांनी बुधवार, 08/04/2020 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
1 गेल्या रविवारी "ट्रिपल एम" म्हणजे मेथी मुर्ग मलई चा बेत केला. सोबत तव्यावर केलेले कणकेचे (व्हिट) तंदुरी गार्लिक नान. चिकन (साधारण ९०० ग्राम) ला कसुरी मेथी, दही, आलं लसूण, गरम मसाला लावून घेतला. हे रात्रभर किंवा किमान ४ तास मॅरीनेट करत ठेवावे (फ्रिज मध्ये). कांदा (२ माध्यम आकाराचे), आलं, लसूण, हिरवी मिरची मिक्सर मधून बारीक करून, तेलावर परतून घेतली. थोडी हळद तिखट घातली. २ जुड्या मेथी बारीक चिरून ह्यात घातली आणि भरपूर परतून घेतली (आधी कडू लागते, पण कडवटपणा भरपूर परतून घेतल्यामुळे कमी होतो). ह्यात चिकन टाकून आता ते परतून घ्या (पाणी नको, चिकन ला पाणी सुटेल त्यात शिजवायचे आहे). झाकण लावून मंद आचेवर शिजवून घ्या (साधारण ३० ते ४५ मिनिटे). चवीनुसार मीठ घालून मर्जीनुसार ह्यात फ्रेश क्रीम घालावे! गार्लिक नान साठी आपली नेहेमीची कणिक घावी, जरा जाडसर पराठा/नान लाटावा. एकीकडे एक लोखंडी तवा (नॉन-स्टिक नको, कारण आपण तो उलटा करून नान भाजणार आहोत) गॅस वर तापवत ठेवावा. आता नान ला एकाबाजूने पाणी लावावे. पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकून गॅस कमी करावा. वरच्या बाजूला, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर आणि कलोंजी हाताने थापावी. नान वर थोडे फोड आले कि तवा उलटा करून आता लसूण लावलेली बाजू गॅस वर धरून सगळीकडून नीट भाजून घ्यावी. नान ला ब्रशने मस्त बटर लावावे. Step1 Step2      Step3 Step4 [ वरील फोटो हे मागे केलेल्या गार्लिक नान चे आहेत, यावेळेला पोरांना भुका लागलेल्या त्यामुळे फोटो नाही काढले करतानाचे ]

लहरींचा गुंता : सुर - बेसुर, रंग - बेरंग (Interference of Waves like Photons and Sounds)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी बुधवार, 08/04/2020 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
(आधी सर्वांनी मिळून आवाज केला. नंतर सर्वांनी मिळून दिवे लावले. यात karona जाईल कि नाही हे माहित नसलं तरी साऱ्यांचं एकत्र येऊन (आपापल्या घरीच राहून).. एका वेळी एक होणं याने निदान सर्वांच्या मनाला तरी resonance concept or constructive interference नुसार उभारी येईल. एकाच वेळी प्रार्थना म्हणायची पद्दत आहेच सर्व धर्मामध्ये . आपापल्या घरी राहून एकत्र येणं आणि त्यातून एकपणाची जाणीव होणं, शक्तीचा गुणाकार होणं आणि मनाला उभारी येणं हे सुद्धा कमी थोडीच आहे? असो. तर विक्रम वेताळांनी नेहमीप्रमाणे फिजिक्स मधल्या resonance ची चर्चा केली.. resonance of sound, resonance of light यांची चर्चा केली .

तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका - करोना महात्म्य ।।२।।

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 08/04/2020 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
करोना माहात्म्य ||२||
तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका
 
       मनुष्य मरणाला भीत नाही आणि हाच करोनाशी लढताना सगळ्यात मोठा अडचणीचा भाग ठरणार आहे. जो मरणाला भीत नाही, तो स्वतः बेसावध असतो आणि दुसर्‍याचे जीवनही बेसावधपणे धोक्यात घालू शकतो.

मुंग्या..

लेखक चिनार यांनी बुधवार, 08/04/2020 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल टीव्हीवरती मुंग्या येत नसल्याने रामायण-महाभारतामुळे अपेक्षित असलेला नॉस्टॅल्जीक फील म्हणावा तसा येत नाहीये. हल्ली जसं टीव्हीवर काही नसलं तरी सूर्यवंशम असतो तसं त्याकाळी मुंग्या असायच्या. या मुंग्या बऱ्याचदा एखादा कार्यक्रम सुरु असतानासुद्धा यायच्या. सिनेमा रंगात आला असताना म्हणजे हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात टीव्हीवर मुंग्यांचं आगमन व्हायचं.