Skip to main content

मेळघाट ३: मचाणावरची एक रात्र

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 14/04/2020 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी मेळघाट २: नरनाळा किल्ला ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ नरनाळा किल्ला पाहून साडेसहाच्या आसपास वनखात्याच्या रेस्टहाऊस वर परत आलो, आता निघायचे होते ते मचाणावर, एक रात्र मुक्कामाला. मचाणावरील मुक्कामाचे बुकिंग सरकारच्या मॅजिकल मेळघाट ह्याच संस्थळावरुन करता येतं. येथे कच्ची आणि पक्की मचाणं मोठ्या प्रमाणावर आहेत.

मोगॅबो-८

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/04/2020 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी पक्या गण्या आणि संध्या सकाळी जॉगिंग पार्क वर सरांना भेटतो. आणि तुम्हाला फोन करतो. चला आता उद्या सकाळी भेटूया." सकाळी काय होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण तरीही सगळेच एका ठामपणा ने उठले. घरी जाऊन झोप येणार नव्हतीच .सकाळी मोगँबो सरांना भेटायचे होते. प्रश्नांला थेट भिडायचे होते. मागील दुवा http://misalpav.com/node/46406 फाईव्ह गार्डन च्या सेंट्रल गार्डन पहाटे इतकी गर्दी असू शकते यावर विश्वास बसणे जरा कठीणच जाते. सकाळी सहा वाजता इतकी माणसे इथे काय काय करतात. कोणी सुलटे चालतात कोणी विरुद्ध दिशेने चालतात. कोणी हात वर करून चालतात.

लॉकडाऊन: एकविसावा दिवस

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 14/04/2020 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीचे शेवटचे दोन महिने हापिसात खूप काम होतं जे नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत अधिकच वाढलं. या कारणाने बातम्यांकडे नेहमीसारखे लक्ष ठेवता येत नव्हते. तरी देखील जानेवारीत चीनमधून येणाऱ्या करोना व्हायरसच्या बातम्या दृष्टीस पडत होत्या. हे गंभीर प्रकरण आहे असे जाणवत होते. तपशिलात जाणून घ्यायला मात्र वेळ मिळाला नाही. मिपावरच्या ३१ जानेवारीला प्रकाशित झालेल्या या काथ्याकुटाच्या शीर्षकावरून या व्हायरसचा उच्चार करोनाऐवजी कहोना तर नाही असा विचार मनात आला. लेख उघडल्यावर दोन्हीचा दुरान्वयेही संबंध नाही हे लगेच कळले.

माधवनगरच्या आठवणीतून... गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/04/2020 00:17 या दिवशी प्रकाशित केले.

माधवनगरच्या आठवणीतून...

गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

गुरुवार पेठेतील आमच्या घराच्या अंगणात सायंकालीन रिंग खेळणे हे इतके सहजपणे होत असे कि तो पायंडाच पडला होता. मे महिन्यात पाण्याचा सडा घालून, नेट बांधायचे डांब वेळोवेळी पहारीने ठोकून ठाकून घट्ट तयार केले की जितके टाईट बांधता येईल तितका नेटचा दोर खेचायला गठ्ठ्या सारखा गबदुल तातडीने कामाला येई. त्या आधी आम्ही खेडकरांच्या बंगल्यासमोर कोर्टावर जात असू. चाळीतील कोकणी चेहर्‍याच्या मधु नाईकला त्या काळात हरवणे अशक्य बाब होती. तुफान वेगाच्या सर्विसवर तो अर्धे पॉईंट वसूल करे.

माम्मा  मिया

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 13/04/2020 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
चिकोडी तालुक्यातल्या एकसंब्याचा पहिलवान श्रीपती खंचनाळे जेव्हा "हिंद केसरी"ची लढत दिल्लीत जिंकला तेव्हा सगळ्या चिकोडी तालुक्याला आणि कोल्हापूर-बेळगांव परिसरातल्या कुस्ती शौकिनांना  ही कुस्ती बघण्यासाठी आपण दिल्लीला हजर नसल्याची चुटपूट लागलेली होती. जर तीच कुस्ती कोल्हापुरात झाली असती तर हेच सगळे कुस्ती शौकीन, गावागावांतून वर्गणी काढून, कसेही करून आपापल्या गावातून ६०-७० मैलांचा प्रवास करून खासबागेत घुसून "त्यांच्या" पहिलवानाची ही ऐतिहासिक कुस्ती प्रत्यक्ष बघण्याकरता हजर राहिले असते.

चकाकीच्या नावाखाली दमणूक

लेखक जेडी यांनी रविवार, 12/04/2020 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
सद्या 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. प्रवासाचे दिड तास वाचत आहेत. धूळ, प्रदूषण, रहदारी यापासून सुटका आहे. पण तरीही खूप दमायला होतं . गेल्या काही दिवसांत कोणतीच नवीन रेसिपी बनवली नाही. तरीही संध्याकाळ पर्यंत जीव मेटाकुटीला येतोय. कामवाल्या मावशी येत नाहीत. त्यामुळे दोन्ही वेळचा स्वयंपाक, ऑफिसचे काम पण हे तर मी पूर्वीही करायचे पण आता प्रवासाचा वेळ वाचूनही सायंकाळपर्यंत जीव मेटाकुटीला येतो. फरशीही मी काही रोज पुसत नाहीये पण तरीही दिवसभर घरातले काम, ऑफिसचे काम ( अगदी काटेकोरपणे त्या मिटिंग करणे, सारखे तेच तेच स्टेटस घेणे, देणे).

चिकन मोमोज

लेखक गणपा यांनी रविवार, 12/04/2020 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
*#सोअरे_भारतीय_पाककृती_चॅलेंज* नावात जरी चॅलेंज असलं तरी हे दुसऱ्याला भरीस पाडणारं चॅलेंज नाही, तर तुमच्यातल्याच कलेला वाव देणारं, खुलवणारं चॅलेंज. 'सोप्या अवघड रेसिपीज' या आमच्या एका वाॅट्सप कंपूवर आमच्या याडमिन बै प्राची गरूड यांच्या सुपीक डोक्यातुन कल्पना आली की येत्या रैवारी भारतिय खाद्य संस्कृतीचा जागर करावा. एकसे एक सुगरणी अन बल्लवांचा भरणा असलेल्या या कंपुतल्या प्रत्येकाला वेगववेगळी राज्य, प्रदेश बहाल करण्यात आला. माझ्या वाटेला आलं ते इशान्येचं छोटंसं सिक्किम. सुरूवात झाली ती सिक्किमची खाद्य संस्कृती धुंडाळण्यापासुन. तिथले पदार्थ शोधण्यापासुन.