✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"कहोना" व्हायरस चा प्रादुर्भाव - "कोण" संस्थेचा इशारा

च
चामुंडराय यांनी
Sat, 02/01/2020 - 08:55  ·  लेख
लेख
"कोण" ह्या जागतिक आरोग्य संस्थेने जगभर "कहोना" ह्या व्हायरसचा प्रभाव वाढत आहे असा इशारा दिला आहे. पुढील दोन आठवडे ह्या व्हायरसचा प्रभाव वाढत जाणार असून विशेषतः तरुण वर्गाला ह्या व्हायरसची लागण होण्याची शक्यता वर्तवली आहे. ज्या कोणाला लागण होईल त्याला प्रेमज्वर येऊन तो दिवसागणिक वाढत जाईल आणि पुढील दोनेक आठवड्यात ज्वर उच्चतम पातळीला पोहोचेल. ह्या ज्वराचे मुख्य लक्षण म्हणजे प्रेम, मैत्री असे शब्द वारंवार बोलण्यात येतील आणि गिफ्ट्स, फुले (विशेषतः लाल गुलाब), पुष्पगुच्छ, ग्रीटिंग कार्ड्स, हॉटेल मधील खादाडी (म्हणजे मराठीत डिनर डेट ) ह्यांची ज्वरपीडित लोकांमध्ये देवाणघेवाण होऊन मोठी उलाढाल होईल त्यामुळे मार्केट मोगॅम्बो खुश होईल. गावातल्या जत्रेतील हावशे, गवशे, नवशे यांच्या सारखे ह्या जागतिक, आधुनिक, व्हायरल जत्रेत देखील सालाबाद प्रमाणे सामील होणारे परंतु आत्तापर्यंत काहीच फलनिष्पत्ती न झालेले प्रयत्नवादी, आणखी एक नवी मासोळी गळाला लावायचा प्रयत्न करणारे गळेपडू आणि त्याबरोबरीने नवथर, नवशिके हौशे सामील होतील तर मासोळी ज्यांच्या गळाला अगोदरच लागून गवसलेली आहे असे गवशे आणखी पुढचा टप्पा हाती गवसतो का ह्याची चाचपणी घेतील. ह्या जत्रेतील जुने जाणते अनुभवी नवशे मंडळी आपापल्या प्रेमदेवतेवर प्रेमाचा वर्षाव करून नवसाची पूर्तता करतील. एकंदरीत हा "कहोना" व्हायरस पुढील दोन आठवडे समाजात मोठी उलाढाल घडवेल. ह्या "कहोना" व्हायरस ला प्रतिबंध करण्यासाठी अँटी-व्हायरस संस्कृतीरक्षक ग्रुप्स सक्रिय होतील अशी अपेक्षा "कोण" संस्थेने व्यक्त केली आहे. परंतु व्हायरस चा प्रादुर्भाव असा आहे कि अँटी-व्हायरसने विरोध केला तरी पीडित लोकं लपून छपून का होईना "कहोना" ला बळी पडतील अशी आशंका देखील व्यक्त केली आहे. ज्या प्रमाणे काळ्या ढगाला चमकदार चंदेरी किनार असते किंवा रोग्यावर उपचार करता करता वैद्य मालदार होतो त्याप्रमाणे "कहोना" मुळे बाधित लोकांमधील पन्नास टक्के लोकांवर प्रेम भावनेसह भेटवस्तूंचा वर्षाव होऊन आनंदी आनंद होईल. अशा रीतीने पुढील दोनेक आठवड्यात कहोना (प्यार है) ह्या व्हायरस मुळे मोठी धमाल उडेल. - इति बाबा व्हेलान्टीनंद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3559 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

सर्वात गंभीर बाब अशी समोर आली

पाषाणभेद
Mon, 02/03/2020 - 23:25 नवीन
सर्वात गंभीर बाब अशी समोर आली आहे की कहोना या व्हायरसचे अनेक वर्जन्स आहेत. कहो, क्या कहू, कुछ भी कहो, करो, करलो, ले लो बाबा, इतना मत करो, बस करो, बसभी करो, करो ना, ना करो ना, ना करो, करो आदी व्हर्जन्स मुळे आपल्याला नक्की कोणता आजार झाला आहे हेच रोग्याला समजत नाही.
  • Log in or register to post comments

अरे, हा तर ....

गामा पैलवान
Wed, 02/05/2020 - 01:43 नवीन
अरे, हा कुठला व्हायरस बियरस नाही, तर प्रेमपोळा नावाचा सण आहे. बैलपोळा असतो तसाच हा प्रेमपोळा. बैलपोळ्यास बैलाला सजवतात, गोडधोड खाऊ घालतात, तसंच प्रेमपोळ्याच्या दिवशी प्रेमबैलास गोडगोड वचने दिली जातात. त्याबदल्यात त्याचा खिसा कापून घेतला जातो. बैल व प्रेमबैल दोघांनाही पुढे वर्षभर मरमर ओझं वाहायचं असतं. त्याबद्दल केलेले एकदिवशीय लाड म्हणजे हे पोळे आहेत. -गा.पै.
  • Log in or register to post comments

"कहो ना" पेक्षा "करो ना"

आनन्दा
Wed, 02/05/2020 - 18:08 नवीन
"कहो ना" पेक्षा "करो ना" जास्त रोमँटिक आहे..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा