मिसळपाव .कॉम (मिपा)चे काम कसं चालतं?
नमस्कार,
गेली १३ वर्षे आपलं मिसळपाव.कॉम संकेतस्थळ अव्याहत सुरू आहे. लोकांना मराठीत व्यक्त होता यावं आणि मराठी लोकांशी गप्पा मारता याव्या व चर्चा करता यावी या साध्या हेतूने मिसळपाव.कॉम सुरू झाले होते. तेव्हाच्या म्हणजे २००७ मध्ये आंतरजालावर मराठी सहज लिहीता यावी व सहज व्यक्त होता यावे ही सुध्दा प्रेरणा होती.
मिपा गेल्या काळात अनेक उतार चढावांतून गेलंय. आणि अनेक लोक सुरूवातीपासून येथे आहेत. आज येथे लिहीतोय ते नवीन आलेल्या सदस्यांना मिसळपाव.कॉमचे काम कसे चालते हे कळायला हवे यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.
लेपाक्षी - हम्पी व परत भाग 3
भाग 1
भाग 2
आता भाग दोन वरून पुढे
सकाळचे सुमारे सात . ट्रेन होस्पेट स्टेशनात शिरली. धोपटी पाठिशी मारून बाहेर आलो .बाहेर येणाऱ्या प्रत्येका भोवती रिक्षावाल्यांचा गराडा व गलका . मी अगोदर ठरवून ठेवलेले वाक्य " मला बेल्लरीला जायचेय ! " सांगून सुटका करून घेतली. एका रिक्षावाल्याने २० रू मध्ये बस स्थानकावर सोडले .
नरभक्षकाच्या मागावर !
केनेथ अँडरसन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दक्षिणेचा जिम कॉर्बेट ! लालित्यपूर्ण भाषेत जंगलाचं चित्र उभं करण्यात अतिशय वाकबगार असणाऱ्या केनेथ ची पुस्तके १९५० च्या दशकापासून पुढे खूप गाजली. जीवावर बेतू शकणाऱ्या साहसात आनंदाने उडी घेऊन नरभक्षकाचा खात्मा करणे हे या स्कॉटिश वीराचे आवडते काम ! निसर्गावर आणि प्राणिमात्रांवर अतोनात प्रेम करणाऱ्या केनेथ ने मजा म्हणून शिकार करण्याचे उदाहरण अगदी क्वचितच मिळेल.
पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर
पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - पुणे ते कराड
पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी
पुणे ते कन्याकुमारी - ३ : निपाणी ते कित्तुर
दिवस चौथा - 18 डिसेंबर 2018 मंगळवार
कित्तुर - येल्लापुर
सकाळी लवकर उठून बॅग पॅक करणे. सायकलला पॕनीयर जोडणे, इत्यादी गोष्टी आवरुन आम्ही खाली आलो.
पॕनीयर म्हणजे सायकल सोबत सामान वाहून घ्यायचे पिशवी, जी मागच्या चाकावरती कॅरियरवर लावल्या जातात आणि पीटर पॕनीयर घेऊन आला होता.
मी, woodland चे बूट आणि Man Vs Wild
मी, woodland चे बूट आणि Man Vs Wild
आंबोली मध्ये माझ्या मित्राचं रिसॉर्ट आहे; हेमंत चं Whistling Woods. आज हेमंतला भारतातील एक आघाडीचा फुलपाखरू तज्ञ म्हणून बरेच लोकं ओळखतात मध्यंतरी त्याचं फुलपाखरांवरचं एक पुस्तक पण प्रकाशित झालं. माझी आणि त्याची ओळख नक्की कधी म्हणजे नक्की किती साली वगैरे झाली ते लक्षात नाही पण अगदी सोपं करून सांगायचं झालं तर जेव्हा हेमंतकडे आणि माझ्याकडेही SLR नव्हता तेव्हा पासूनची.... आमच्या एका कॉमन मित्रामुळे ओळख झाली हे नक्की. तर..... त्यावेळेस माझी निसर्ग भ्रमंती ला सुरुवात व्हायची होती.
लॉकडाऊन: एकोणतिसावा दिवस
लॉक डाऊन मध्ये आवडलेले चित्रपट
गेल्या काही वर्षात नेहमीच्या कॅन्टीन , ऑफिस , मित्र परिवार ह्या मध्ये नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईमच्या अनेक चित्रपटावर आणि विशेतः मालिकांवर चर्चा होत असायच्या , ह्यातील काहीही पाहिलं न गेल्याने एकदा दारू न पिणारा अट्टल बेवड्यांच्या बार मध्ये गेल्यावर जी अवस्था व्हायची तशी माझी अवस्था व्हायची !!
आपआपल्या दैनंदिन व्यवहारातून मस्त पैकी मोठी सुट्टी मिळावी आणि जे जे म्हणून भारी विग्रजी चित्रपट बघायचे आहेत ते पाहावं अशी इच्छा चक्क चीनने कोरोना व्हायरसला जन्माला घालून अप्रत्याक्षरीत्या पूर्ण केली , खर तर सुट्टी नाही मिळाली पण ऑफिसच वर्क फ्रॉम होमच काम स
विडंबन ( चायनाच्या वूहानमध्ये...)
चाल -( निंबोणीच्या झाडामागे चंद्र...)
चायनाच्या वूहानमध्ये, कोण शिंकला गं बाई
कोरोनाच्या व्हायरसला, झोप का गं येत नाही।।धृ ।।
किंवा
(असा कोरोना कळेना, कसा जन्मला गं बाई)
लोकं झोपले घरात, रस्त्यावर रोगराई
दिवसभर फेसबुक, कसली गं नाही घाई
लॉकडाऊन आशेचा, दारू मुळी मिळत नाही।।१।।
कामवाली बाई नसता, भांडी घासणे कपाळी
जरा चुना घेण्यासाठी, याचकाची आली पाळी
काठी राखते समता, समजून गुरेगाई ।।२।।
जगातल्या व्यवहारांची, होत आहे रोज माती
स्पर्श कसे पसरत गेले, गात विध्वंसाची गाणी
टेस्ट पॉझिटिव्ह येता, हातावर येई शाई।।३।।
किंवा
(विमानांतूनी उतरता)
आरोग्यपथकं फिरती, माज त्यांना शिक्षा देई
घेऊनी दगड हाती, रा
मौनाचे गुपित
मौनामागे दडुनी असती
नाना परिची किती कारणे
कुठे व्यग्रता, कुठे खिन्नता
वरुन दाखवी 'नको बोलणे'
मौनाच्या वाटांचे वळसे
वाटसरूला होई चकवा
निबिड शांतता चहुबाजूला
असह्य होई अबोल थकवा
मौन राखते दाट अरण्ये
अनेक गुपिते अनेक आख्या
वरवर जे दिसते डोळ्यांना
खरे भासते असून मिथ्या
मौन पाहते सूचक, रोखुन
धारदार भेदक डोळ्यांनी
एका एका प्रश्नासंगे
यक्षाची तलवार परजुनी
प्रश्नहि ऐसे महाकठिण ते
सापडता सापडे न उत्तर
चकव्यामधुनी सुटण्याइतके
नशिब कुणाचे की बलवत्तर?
कुणास होतो मोह अनावर
मौनाशी दो हात करावे
मौनाला मौनाने उत्तर
नजर भिडवुनी आपण द्यावे
करू नये कधि दुस्साहस हे
समोर येइल भयाण खाई
शरणागतिचा एकच रस्ता
मौन
सफरचंद , पाइन नट सलाड आणि भाजलेली कोंबडी
सफरचंद आणि पाइन नट सलाड आणि भाजलेली कोंबडी
य पाककृतीचा नायक कोंबडी नसून हे सलाड आहे
साहित्य: सर्व ताजे आणि फार पिकलेले लिबलंबित नसावे
- बिया काढलेला टोमॅटो चे काप
- काकडी बारीक लांबट काप ,गाजर काप
- ऑलिव्ह
- रॉकेट किंवा लेट्स चिरलेले
- ऑलिव्ह तेल
- काळी मिरी भरडी पूड
- मीठ
- सफरचंद आंबट गोड असावे आणि "क्रिस्प"
- पाइन नट च्या बिया भाजून घेणे ..
मिसळपाव