Skip to main content

दवणे एक असणे !!!! दवणे एक जगणे !!!!!!!!!!!!!!

लेखक मारवा यांनी मंगळवार, 03/06/2025 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रातःस्मरणीय दवणे जेव्हा प्रातःस्मरणीय पदवीस प्राप्त झाले नव्हते त्या काळातला हा प्रसंग आजही मनकातळावर नाजुक स्मृतींनी कोरला गेलाय. दवणेंचे गुरुवर्य वपुलं बाल दवणेंना म्हणाले गुरुवर्य : " प्रवीण, मराठी वाचकांच्या अभिरुचीची घसरण आता बघवली जात नाही रे " प्रवीण : " काय होतय गुरुवर्य नेमकं " गुरुवर्य : " डाचतोय रे मला डाचतोय हा टचटचीत शब्द , हा शब्द म्ह्टला की वाचकांना तेच का आठवावे वहीनींची ती ....... हे ऐकुन प्रवीण कावराबावरा झाला, खर म्हणजे थोडासा लाजला सुद्धा मनातल्या मनात मग त्याने मनाशी चंग बांधला टचटचीत ला मी एक नवी जोडी देणार .

वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/06/2025 22:04 या दिवशी प्रकाशित केले.

वायुसेनेतील आठवणी – भाग ४

"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे" "सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?" (“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”) "यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!" (“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही!

वकीलाना टाटा-बायबाय

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 02/06/2025 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
ए० आय० ने अनेक क्षेत्रात धूमाकूळ घालत आपले पाय रोवले आहेत. ए० आय० मुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे. असे झाले तर कायद्याच्या लढाया लढण्यासाठी उर्मट आणि स्वत:च्याच अशीलांचे रक्त पिणार्‍या, तसेच फसवणार्‍या वकीलांना मोठी जरब बसेल अशी चिन्हे आहेत. अर्थात अडाणी लोकांना ही जमात फसवत राहीलच... https://youtu.be/WoqcSIcdx-Y?si=FURG5R1kytIfSUeB

गवळण

लेखक रामदास यांनी सोमवार, 02/06/2025 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
शिणवतो मजला छंद मनाचा काही सुचेना काम रे, हरि वाजवी वाजवी .... वेणू वाजवी वाजवी.. मन रिझवी रिझवी .. माझे रे....॥ कशी सोडवू जीवास माझ्या झाली मजला बाधा, कधी रुक्मिणी कधी भामिनी मध्यरात्री मी राधा हरवून गेले मीच मला मी दे आता आधार रे ॥ हरि वाजवी वाजवी ....।ध्रु। धडधड होते उरात माझ्या अंगी भासे कणकण अशी भुलावण,कशी लागली विसरून गेले मंथन या तीरावर कशी हरवले विसरून गेले मी पण हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।

समाधी....

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 01/06/2025 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
.. 45 सन 1982.महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचा तिल्लारी गाव. तिलारी गावांमध्ये धरणाचे काम जोरात सुरू होते. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही त्या ठिकाणी कामगार आले होते.त्यामध्येच मल्लाप्पा नावाचे कामगार होता. मल्लाप्पा आणि त्याच्याबरोबरचे सहकारी एका दिवशी जमीन खणत होते आणि अचानक एक मोठा काळा पत्थर लागला. महत्प्रयासाने त्यांनी तो काळा पत्थर बाजूला केला आणि खाली पाहतात तर एक जिवंत मनुष्य त्या पत्थरखाली बसलेला होता. हा प्रकार बघून मल्लाप्पा बेशुद्ध पडायचा बाकी राहिला.

सुट्टी

लेखक माहितगार यांनी शनिवार, 31/05/2025 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 31/05/2025 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा ==================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले भाकीत चुकले आहे. बाजार अधांतरी लटकलेला आहे.