Skip to main content

लेपाक्षी -हम्पी व परत ... भाग चौथा

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 28/04/2020 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 भाग 2 भाग 3 भाग 3 वरून पुढे सकाळी उठलो. आज तुन्गभद्रेच्या पलिकडे नावेने जायचे व स्कूटर भाड्याने घेऊन विरूपापुरागड्डी बेटाला भेट द्यायची ,सानापूर तलाव, जुना हम्प्पी व्हायडक्ट सारखा ब्रीज करीत ,हनुमान हळ्ळी , पम्पा सरोवर व अन्जनेय पर्वत असा भरगच्च बेत मनात आखला होता. नाश्ट्याला पुरी भाजी चा आस्वाद घेऊन मी १३ वर्शापूर्वी जिथे राहिले होतो त्या " अर्चना गेस्ट " हाउस च्या आन्टीना भेट दिली.

सुटकेस

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 28/04/2020 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
टपरीवर सिगारेट घेतली तेव्हा बॉसचे शब्द कानात घुमत होतो. आपण फक्त गाढवासारखे काम करतो. असे तो म्हणाला. 'आपण' म्हणजे त्यात तो ही आलाच की. सिगारेटचा कश घेत मी तो विचारच डोक्यातून काढून टाकला. विक्या म्हणतो खरं आहे. आपल्याला फक्त शिव्या खाण्याचे पैसे भेटतात. जो नम्रपणे ऐकून घेईल त्याची पगारवाढ नक्की. सिगारेट संपवून मी गाडीला किक मारली. तेवढ्यात विक्याचा फोन आला. "अरे ऐकना जगदीश, बॉसला घेतला होता मगाशी केबिनमध्ये" "पुन्हा एकदा?" "हो, बेकार ठासलीय त्याची... तिन्ही डायरेक्टरनी.." "काय ग्रेट न्यूज आहे यार.. हाहा.." "पण बॉस जाम भडलकलाय, ऊद्या आपल्या टीमचं काही खरं नाही.. जरा जपून.." "ठिक आहे.

सिनेमातले विनोदी प्रसंग..

लेखक चिनार यांनी मंगळवार, 28/04/2020 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवा प्रियदर्शनचा खट्टामीठा सुरु होता. नेमका तो रोड रोलर नेण्याचा प्रसंग बघण्यात आला. हा एक अफाट विनोदी सीन आहे. प्रचंड नुकसानीत असलेला कंगाल कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचकुले (अक्षय कुमार) नगरपालिकेविरोधात एक कोर्टकेस जिंकतो. आणि नुकसानभरपाई म्हणून त्याला पालिकेच्या मालकीचा रोड रोलर मिळतो. पण तो रोड रोलर नादुरुस्त आहे हे टिचकुलेला माहिती नसतं. रोलर चालवण्यासाठी स्पेशालिस्ट ड्रायव्हर जॉनी लिव्हरला बोलावण्यात येते. आणि रोडरोलर पुराण सुरु होते. जॉनी लिव्हरने टिपिकल ड्रायव्हरच्या भूमिकेचं बेयरिंग अचूक पकडलं आहे.

कोरोना चे परिणाम - नोकरीवर गदा - व्यवसायाचा मुहूर्त

लेखक उमेश पाटील यांनी मंगळवार, 28/04/2020 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना चे परिणाम - नोकरीवर गदा - व्यवसायाचा मुहूर्त असे होईल असे अपेक्षित होते पण इतक्या लवकर होईल हे अपेक्षित नव्हते, ३० मार्च ला आमच्या कंपनीने काम नाही या कारणास्तव माझासहित ८ कर्मचाऱ्यांना जून पर्यंतचा पूर्ण पगार देऊन राजीनामा द्यायला लावला आणि वर सांगितले कि काम पूर्वतत झाले कि परत घेऊ असं, धक्का बसला पण काय करणार आणि मी ज्या प्रॉडक्ट वर काम करतो ते rare स्किल या प्रकारात असल्याने (Infor ERP - System Admin पूर्ण देशात फक्त १७ जण) नोकर्या पण कमी अगदी ६-८ कंपनी मध्ये संधी असते.

निर्घृण खुन..

लेखक मन्या ऽ यांनी सोमवार, 27/04/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
निर्घुण खुन.. काय अपराध होता तयांचा जे त्यांस असे मरण यावे? माणसांतल्याच लांडग्यांनी तयांस जीवे ऐसे मारीले या माणसांपरी ते लांडगे तरी बरे हेरतात ते सावज भुक शमविण्यासाठी संचारबंदी असोनी ऐसा जथ्था तेथ जमला अन् माणसांतल्या माणुसकीचा निर्घुण खुन तेथेची जाहला.. (Dipti Bhagat)

पवित्रतास्वरूपिणी श्री शारदा माताजी - पुस्तक परिचय

लेखक Prajakta२१ यांनी सोमवार, 27/04/2020 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
पवित्रतास्वरूपिणी श्री शारदा माताजी - पुस्तक परिचय साधारण एक दीड वर्षांपूर्वी पुण्यातल्या शारदा मठातल्या २ दिवसांच्या युवती शिबिराला जाणे झाले तो अनुभव फारच छान होता पूर्ण महाराष्ट्रातून खूप मुली आल्या होत्या एक तर nethrland हुन आली होती दोन दिवस ९-५ असे होते चहा नाश्ता जेवणासकट. युवतींना अनुसरून शिबिरातील कार्यक्रम खेळ पथनाट्य असे उपक्रम होते सोबतच स्वामी विवेकानंद,रामकृष्ण परमहंस,आणि श्री शारदा माताजी ह्यांच्या जीवनाची ओळख पण तिथल्या माताजी सांगत होत्या.

अंताक्षरी

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 27/04/2020 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
अंताक्षरी 1 सिग्नल ला भिक मागण्या-या 5 वारक-याला मी म्हणालो, 8 तुकोबा म्हणतात, 10 "भिक्षापात्र अवलंबीणे, 12 जळो जिणे लाजिरवाणे" 15 वारक-याने काठी उंचावली, 18 "नाठाळाच्या माथी, 20 हाणू काठी" 22   मी :ठेविले अनंते तैसेची रहावे 27      चित्ती असो द्यावे समाधान 31   वारकारी : नरा ऐशा मोजोनी 35               माराव्या पैजारा  37   मी : रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग 42   वारकारी :&n

शशक-२०२०: पिंजरा

लेखक Nishantbhau यांनी सोमवार, 27/04/2020 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
" हे ना अमेरिकेतलं the Best झू आहे". निर्मोह ला कडेवर घेऊन श्रावण त्याला माहिती सांगत होता. "इतक्या सुंदर आणि मोठ्या पिंजऱ्यात फक्त एकच गोरिल्ला?" निर्मोह ने कुतूहलाने विचारल. "अरे तो इथला सगळ्यात हुशार गोरिल्ला आहे." गोरिल्लाला जवळून बघत निर्मोह ने विचारल "पण याचे मॉम डॅड कुठे आहेत? " "ते लांबच्या जंगलात." "पप्पा आपण याला पिंजऱ्यातून सोडून द्यायचं, म्हणजे तो आपल्या मॉम डॅड कडे जाईल." आपल्या मुलाकडे कौतुकाने बघून हसत श्रावण म्हणाला "अरे तो नाही जाणार.

पनीर उत्तप्पा (फसलेला)

लेखक Prajakta२१ यांनी सोमवार, 27/04/2020 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
पनीर उत्तप्पा (फसलेला) आज रविवार सामान आणण्याचा दिवस थोडे उशिराच बाहेर पडले (१० ते १२ वेळ ) नेहमीच्या दुकानासमोर मोठी रांग (कधी नव्हे ते ) तरी हिम्मत न हारता संयमाने उभी राहिले आपल्या सर्वांच्या एका स्वभावैशिष्ट्यानुसार मध्ये मध्ये शिरणाऱ्या बायका,त्यांना हॅन्डल करणारा तो महान सिद्ध दुकानदार असे सगळे एन्जॉय करत असताना तिथे डोशाचे आयते पीठ दिसले मग काय घेऊन टाकले (खिशाचा विचार न करता) डोसे /उत्तप्पे कधीतरी करू असा विचार केला पण मग नंतर म्हटले आजचा सुट्टीचा अक्षय तृतीयेचा दिवस आजच करून बघूया पनीर पण आणले होते तर पनीर उत्तप्पे करायचे ठरवले तेल नसल्यामुळे तुपाचे मोहन घालून करून बघायचे ठरवले प

शूद्दलेकन.

लेखक आजी यांनी सोमवार, 27/04/2020 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
"तूमचे लीखाण अतीषय आवडते.नेहमि लीहीत रहा." मी वाक्य वाचले. वाक्याचा अर्थ समजून खरंतर आनंद व्हायला पाहिजे. पण झालं असं की, तो अर्थ मला समजलाच नाही. वाक्यांत झालेल्या 'शीद्दूलेकना'च्या चुकाच आधी डोळ्यांत आणि डोक्यात घुसल्या. वाक्य दुरुस्त करुन घेतलं. पुन्हा वाचलं तेव्हा आशय ध्यानात आला, आणि मग मनाला समाधान वाटलं. माझं नेहमी असंच होतं. शुद्धलेखनातल्या चुका आधी दिसतात. ह्याला मुख्य कारणं दोन. एक म्हणजे लहानपणी कडवेकरसरांनी शुद्धलेखन चांगलं घटवून घेतलं. अक्षर तर सुवाच्य आणि वळणदार झालंच, पण लेखनही शुद्ध झालं. त्यांचं ऋण विसरता न येण्याजोगं.