कोरोना चे परिणाम - नोकरीवर गदा - व्यवसायाचा मुहूर्त
असे होईल असे अपेक्षित होते पण इतक्या लवकर होईल हे अपेक्षित नव्हते,
३० मार्च ला आमच्या कंपनीने काम नाही या कारणास्तव माझासहित ८ कर्मचाऱ्यांना जून पर्यंतचा पूर्ण पगार देऊन राजीनामा द्यायला लावला आणि वर सांगितले कि काम पूर्वतत झाले कि परत घेऊ असं, धक्का बसला पण काय करणार आणि मी ज्या प्रॉडक्ट वर काम करतो ते rare स्किल या प्रकारात असल्याने (Infor ERP - System Admin पूर्ण देशात फक्त १७ जण) नोकर्या पण कमी अगदी ६-८ कंपनी मध्ये संधी असते. मग आहेत त्या सर्वांना संपर्क साधून नोकरीचा शोध सुरु केला पण सर्वांनी नोकर भरती बंद केली असल्याने त्याची शक्यता नव्हतीच. तरी पण प्रयत्न चालू आहेत आणि एकदोघांकडून सकारात्मक रिप्लाय पण आला आहे. तरी आता जोपर्यंत काही कन्फर्म होत नाहो तोपर्यंत काय. तर खाली लिहिल्या प्रमाणे काम चालू केले आहे.
घरची १२ एकर शेती आहे ती करायला घेतली आहे - सध्या १ विहीर असून चांगले पाणी आहे आहे आणि अजून एक विहिरीचे लवकरच काम चालू करतो आहे , जमीन चुलतभावालाच निम्मी हिश्श्याने करायला दिली आहे (आधी २० हजार वर्षाला अशी दिली होती आणि नोकरीमुळे वेळ देता येत नाही असे कारण सांगायचो - तरी घरूनच काम करतो - पुण्यात राहून) आधी जिच्याकडे कधी डुंकून पण नाही पहिले आता कोपरा कोपरा फिरवते आहे. पण हि वेळ आली नसती तर मला अजून २ वर्षात डॉक्टर ने मधुमेहाचे औषध दिले असते आणि डायट सांगितले असते पण आता तशी वेळ येणार नाही.
थोडा वेळ काढून - टेलर भावाकडून शिवणकाम शिकतो आहे आणि नोकरी परत लागल्यावर स्वतःचा छोटा गारमेंट्स प्रोडूकशन युनिट चालू करण्याचा प्लॅन आहे - त्याची तयारी करतो आहे, अगदी सर्व शिकून घेतल्यास अडचण येणार नाही अशी अपेक्षा. अजून एक कापड व्यावसायिक आहेत पिंपरीचे ते पण मार्गदर्शन करता आहेत.
त्याच पिंपरीतील व्यावसायिक बंधुंचे प्लेसमेंट आहे (मॅनुफॅक्टरिंग मध्ये) आणि त्यांना IT मधला माणूस पाहिजे होता तर मला तिथे पण संधी मिळाली आणि त्यांच्या टीम ला योग्य प्रोफाइल शोधण्यासाठी मदत करतो आहे.
एकंदरीत जर नोकरी गेली नसती तर मी या गोष्टींचा कधी विचार नसता किंवा काहीच केलं नसता केला पण कदाचित जे होते ते चांगल्यासाठी या अर्थाने १ जाऊन २-३ कामे चालू झालीत.
परिस्थिती पूर्वतत झाल्यावर किंवा त्या आधीच नोकरीपण मिळेल पण मी भविष्यात कधीच त्यावर १०० टक्के विसंबून राहणार नाही आहे आणि नोकरीबरोबर माझी जमीन आणि व्यवसाय दोन्ही सांभाळणार आहे.
मानसिक आणि कौटुंबिक त्रास पण झाला आणि होतोय थोडा पण तो थोडे दिवस असतोच पण यापुढचे आयुष्य नक्कीच चांगले असेल.
वाचने
8581
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी सुरुवातीलाच तुमच्यावर
जीद्दीने मात करत मात करीत आहात.
.
...
नमस्कार ,
शेवटी मार्ग शोधायला लागतातच
कठीण परिस्थितीला आपण धैर्याने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere Dil Ka Tumse Hai Kehna ( Cover) | Armaan | Shankar Ehsaan Loy & Chitraवाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा
नमस्कार
In reply to वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा by प्रमोद देर्देकर
नमस्कार
In reply to वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा by प्रमोद देर्देकर
शुभेच्छा
सकारात्मक निर्णय
संकटातुनही संधी शोधण्याच्या
नमस्कार मित्रांनो
शुभेच्छा!
सदिच्छा
नोकरी वर पूर्ण विसंबून राहणे धोकादायक
शुभेच्छा
शुभेच्छा!