मंथरा (भाग 2) (शेवटचा)
पहिला भागासाठी माझ्या ब्लॉगची लिंक देत आहे
https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/
मंथरा (भाग 2) (शेवटचा)
दुसऱ्या दिवशी दिवस चांगलाच वर आल्यावर मंथरा राणी कैकयीच्या महालात पोहोचली. तोपर्यंत महाराज राणी कैकयी सोबत असल्याने अंत:पुरात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती; याची तिला कल्पना होती. मंथरेने आत शिरताच राणी कैकयीचे मुख न्याहाळले आणि तिच्या लक्षात आले की काल अंत:पुरातून बाहेर पडताना तिने राणी कैकयीशी जो संवाद केला होता त्याचा योग्य तो परिणाम झाला आहे. राणी कैकयी काहीतरी खूप मोठे मिळवल्याच्या समाधानात होती.
मिसळपाव
