Skip to main content

नर्स एडिथ कॅवेल आणि प्रचार तंत्राचा महिमा

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 12/05/2020 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या महायुद्धाने तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अवयव प्रत्यारोपण, सुश्रुषा शास्त्र, उड्डयन तंत्र अशा अनेक शास्त्रीय क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवले तसेच व्यापार दळणवळण आर्थिक व्यवहार, अंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि राजकारणह्या क्षेत्रावरही प्रभाव आणि दबाव टाकला. बरेचदा ह्यापैकी एका क्षेत्रातले बदल दुसर्या क्षेत्रावर परिणाम करत . प्रचार तंत्र किंवा प्रोपोगंडा हे एक असेच तंत्र ज्याला पहिल्या मह्युद्धात नावेच आयाम प्राप्त झाले. ह्या प्रचार तंत्राचा आणि ब्रिटीश नर्स एडिथ कॅवेल हिचा फार घनिष्ठ संबंध आहे तर आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने तिची हि हकीगत.

दोसतार - ४५

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 11/05/2020 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ल्यात एक गुहा पण करायची आणि शेवटच्या दिवशी त्या भुयार करायला वापरलेल्या डबड्यात मोठ्ठा दंड्या फटाका लावायचा. धुडूम ... अख्खा किल्ला हादरून जातो. किल्ल्यातली माती उडते त्यावरच्या झाडाझुडपांसह. मस्त मजा येते रे" टंप्या. हे असले काही पाटणला नसायचे. तिथल्या दिवाळीची गम्मत काही वेगळीच.
मागील दुवा http://misalpav.com/node/46671 पाटणला किल्ला करायचा तर अगोदर जमीन सपाट करायला लागते. अंगणात जिथे म्हणून सपाट जमीन सापडेल तिथे तुळशीचे सदाफुलीचे नाहीतर कोरफडीचे रोप आज्जी लावायची. मोगर्‍याचे झाड होते. तगरीचे पण होते.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पहिला) 25.10.2019 *मुंबई ते पुणे सायकलिंग*

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी सोमवार, 11/05/2020 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर 25.10.2019 दिवस पहिला *मुंबई ते पुणे सायकलिंग* मुंबई ते कन्याकुमारी राईडचा आजचा पहिला दिवस होता. 1760 किमी सायकलिंग 11 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन, तसेच या संपूर्ण सायकल वारीत "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश जनमानसात रुजविण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू झाली सायकलवारी.

मसाया - Messiah

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 11/05/2020 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
जगभरातील धर्म पाहिले तर त्यात एक सामायिक बाब दिसून येते, ती म्हणजे प्रत्येक धर्मात असणारे अवतार, प्रेषित, देवदूत किंवा संदेशवाहक ! हे अवतार , प्रेषित यांनी लोककल्याणासाठी जन्म घेतला आणि धर्माचा प्रसार केला असे त्यांचे अनुयायी मानतात. अजुन एक कॉमन गोष्ट की हे अवतर, प्रेषित यांनी चमत्कार केलेत आणि ते पुन्हा जन्म घेतील यावर त्यांच्या अनुयायांचा ठाम विश्वास असतो. आजच्या युगात जर कोणीएक मनुष्य पुढे आला आणि अविश्वसनीय कामे केली, लोकांनी त्याला मसीहा मानायला सुरुवात केली तर काय ?

चिश्ती रेषा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी सोमवार, 11/05/2020 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार गवसला मागे तू पुढे रात्र उसवली. होती नव्हती पणती मी हळूवारपणे विझवली. पहाडा मागून आल्या कोर्‍या चिश्ती रेषा. केसरी हिरवा रंग नेसून बसली वेश्या. मुंग्यांचे फूटले वारूळ अलवार धुक्याच्या वेळी. सख्याचं उमटलं गोंदण क्षितीजाच्या अलगद भाळी. -कौस्तुभ
काव्यरस

माझी काळोखाची कविता

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 11/05/2020 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी न चाहता उगवतीचा येईल त्याला जातो सादर पसरूनि अंगावरती घेतो अंधाराची काळी चादर मोहक तिरिपा उजेडाच्या मृगजळ फसवे तिथेच होई त्याहूनी प्रिय, मजला घेणे बरबटून काळोखाची शाई नवे समर नव्या दिसाचे तयां सोबत आरवतेची हलके घाव देते भरूनि तमात शांती नीरवतेची जर का आहे प्रकाश जीवन नवसृजनाची नांदी काळोख गूढ गहिरे व्योम आणिक अज्ञाताचा प्रवास काळोख - संदीप भानुदास चांदणे (११/०५/२०२०)
काव्यरस

तिरुपती दर्शन भाग ४

लेखक AKSHAY NAIK यांनी रविवार, 10/05/2020 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस ७/०३/२०२० आजच्या दिवसाची सुरवात तशी निवांतच झाली. सकाळी आठ वाजता सर्वांचे आवरून झाल्यावर आम्ही हॉटेल बाहेर पडलो. आजच्या दिवसात गोविंदराज स्वामी मंदिर, श्री कालहस्ती मंदिर आणी पद्मावती मंदिर या स्थळांना भेटी देण्याचे आधीच निश्चित केले होते. आमच्या हॉटेल जवळच श्री गोविंदराज स्वामी मंदिर होते त्यामुळे सर्वप्रथम येथे भेट देण्याचे ठरविले. गोविंदराज स्वामी मंदिर हे तिरुपती रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मंदिराचा भव्य प्रांगण आणी दुरूनच दिसणारा गोपुरम येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. सकाळची वेळ असल्यामुळे मंदिरात गर्दी अजिबात नव्हती.

स्वप्नाला पडली भूल

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 10/05/2020 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नाला पडली भूल उन्हाची चूल. दे चंद्रभाकरी थकल्या जीवा. रानीचा वणवा ताटावर ओणवा…. एकलाच गातो जोगी थकलेले गूढ मंत्र… एकटाच चेतवी जाळ थकल्या सांजवेळी स्मरणाचे पाप जाळीतो लावून आग.. स्मरणाचा कचरा होतो आशेची होते राख. गुंतून जीव जातो. मरण भयातच रमतो. कृष्ण तेथे येतो. भुईकडे नाळ मागतो. जाळून इतिहास कंदीलात आज मी स्वर्ग पाहिला. काचेवर काजळीने प्राक्तन उमटवून गेला वाटसरू कोण येवून गेला. वाटेला फुटले काटे मोहरली वाटे काया डोळ्यात काजळमाया. …………….. चकोर शाह.

बापजन्म!

लेखक मन्या ऽ यांनी रविवार, 10/05/2020 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
बापजन्म! काल पाहिला मी एक बाप जन्मताना O.T. बाहेर अस्वस्थ घुटमळताना होणाऱ्या चिमुकल्या जिवासाठी तिळ तिळ तुटताना कोण म्हणतं कि मातृत्वाच्या वेदना फक्त आईलाच होतात बापालाही होतच असतात..
काव्यरस
Taxonomy upgrade extras

अस्वस्थ करणारे उत्तर रामायण

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 10/05/2020 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात (लिंक: पुन्हा एकदा रामायण) मी रामायण मालिकेचा मुख्य भाग संपल्या नंतर मनात घोळत असलेले विचार अगदी त्याच रात्री मांडले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पासुन उत्तर रामायण सुरु झालं, आणि ते संपल्यावर मात्र लगेच काही लिहायला हात उचलला नाही. शेवटचे काही भाग इतके भावुक आणि व्यथित करून गेले कि मनात नेमकं काय चाललं आहे हे मला स्वतःला कळायला, विचार थोडे तरी स्पष्ट व्हायला काही दिवस जावे लागले.