चुकलेली वारी..
आषाढ महिना लागला की आठवतात काळे मेघ ; त्या मेघांनाच दूत बनवणारे महाकवि कालिदास आणि मग वेध लागतात आषाढी एकादशीचे ,टाळ मृदंगाच्या जयघोषाचे ,विठ्ठलाच्या नामाचे, पंढरीच्या वारीचे.
वारी म्हणजे तीनशेहून अधिक वर्षे जपलेला महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा ,वारी म्हणजे नेम ,अट्टाहासाने घेतलेले आत्मक्लेषाचे व्रत ,त्यातील भक्तिरसाच्या सुखाची अनुभूति , समर्पणातील आत्मानंद .
या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे 'मनाचिये द्वारी यंदाची ही वारी ' असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे.
मिसळपाव