वारी नाही ...
वारी नाही बारी नाही
दिसणार हरी नाही
विठ्ठला रे तुझ्या विना
दुसरा कैवारी नाही
साल भर खपायचे
वावरात झिजायचे
एका दर्शनाने देवा
दु:ख सारे जिरायचे
पावसाच्या सरी माथी
पाया खाली घाट वाट
लाख लाख तूच सवे
मैल गेले पटापट
आला गाव गेला गाव
खाणे पिणे तमा नाही
मुखी नाव चित्ती रूप
बाकी काही जमा नाही
पाहताच शांत झाली
काळजाची घालमेल
दिसे रूप असे डोळा
आनंदच खोल खोल
काय पाप झाले देवा
नाही आता परवणी
घर झाले बंदीशाळा
डोळ्या मध्ये जमा पाणी
घोर किती जीवा माझ्या
नाही येणे माहेराला
विनवणी हीच माये
तूच यावे भेटायाला
स्वच्छ एकटेच तळे : आस्वाद
- डॉ. सुधीर रा. देवरे
स्वच्छ एकटेच तळे
विसावले चांदण्यात.
- शंकर रामाणी
शंकर रामाणी यांची ही फक्त दोन ओळींची कविता. या दोन ओळीतील एकूण पाच शब्द म्हणजे ही कविता.
स्वच्छ - शुचिर्भूत. कलंक नसलेले. डाग नसलेले. नितळ.
एकटेच - एकांत. समाधी लागलेले. चिंतन.
तळे - पाण्याचा साठा. पाणी म्हणजे जीवन. जीवनाचा साठा. तृप्त. विसावले - शांतता. शांती. तृप्तता. आयुष्याच्या सुरूवातीला खूप कष्ट
करूनच विसावता येते. खस्ता खावूनच विसावता येते. तसे
नसेल तर विसावण्याला आळशी म्हणतात. सुस्त म्हणतात.
चांदण्यात - शीतलता. सौहार्दता.
कवितेत तळे आहे. तलाव नाही.
कोविड-कोविड गोविंद गोविंद
आली एकादशी
ग्रासे जरी कोविड
मुखी तरी गोविंद
वारकरी
हाती ग्लोव्हज्
मुखी मास्क
एकची टास्क
नाचूरंगी
सॅनीटाझर ची उधळण
वैष्णवां ना ताप
डोळ्यांपुढे बाप
पांडूरंग
कसले हे वर्ष
यंदा नाही वारी
तूच देवा तारी
भक्तजना
एकमेका आता
नाही लोटांगणे
उभी घटींगणे
पोलीस ते
युगे चार मास
राबताती अथक
सफाई मदतनीस
डाॅक्टर,नर्स,पोलीस
रात्रंदिस
तुझ्यात पांडूरंग
म्हणोनी वारकरी
पोलीस पाय धरी
होत धन्य
काव्यरस
(नदीम-) श्रवणभक्ती
आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे.
... अर्थात नदीम-श्रवणच्या संगीताचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे!
साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)
पण प्रत्येक काळ वेगळा असतो. आमचे आई-वडील शंकर-जयकिशनच्या लाखेच्या तबकड्या ग्रामोफोनवर लावायचे (…त्यांना त्या लाखमोलाच्या वाटायच्या!). ज्ये.
खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग १: क्रिकेट
(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित आहेत. त्याबद्दल थोडेसे.......
गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ४ अलवार
प्रियांसी
गोंधळलीस ना?
मी तुला हे विशेष नाव दिलंय. शुअर तुला आवडेल.
मॉडर्न वाटतं ना? आणि तितकंच प्रेमळ. प्रियांसी असं नाव नसतंच मुळी म्हणूनच ठेवलं तुझं नाव. कारण तुझ्यासारखी आणखी कोणी नको. म्हणजे तुलना करून मला जी आवडते तिच्याबद्दलच्या आदर मला कमी नाही करायचाय. म्हणून आजपासून तू प्रियांसी.
तू मला म्हंटलेलं idiot पण कित्ती गोड वाटतं.
आय डोन्ट माईंड तू मला इडियट म्हणत जा. आवडेल!!
इडियट ची प्रियांसी :)
अगं मी त्या SAP coding च्या टूर वर होतो. अमित सरांनी अचानक सांगितलं. म्हणून तुला उत्तर द्यायला वेळ लागला.
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप
वैदिक सहा दर्शनांपैकी (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत) सांख्य आणि मीमांसा ही दर्शने निरीश्वरवादी आहेत. निरीश्वरवाद ही संकल्पना जुनीच आहे. वैदिक परंपरेला निरीश्वरवादाचे वावडे नाही. असे असले तरी काळाच्या कसोटीवर उतरल्याने (मूळ तत्वांना बाधा न आणता बदलत्या काळानुसार अत्यंत उच्च कोटीच्या सत्पुरूषांनी वेळोवेळी उजाळा दिल्याने) वेदांत तत्वज्ञानाची महती आजही अखंडपणे टिकून आहे या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करत मूळ विषयाकडे वळतो.
या प्रकरणात ईश्वराच्या स्वरूपाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आमचे गाव अन देवाचे नाव
(हा धागा उडवलेला दिसला. कारण समजले नाही परंतु कदाचित काही शब्द आक्षेपार्ह असावेत असे समजून ते वगळून पुन्हा धागा पोस्ट करत आहे. धागा आक्षेपार्ह वाटल्यास जरूर उडवावा परंतु त्यामागचे कारणही कळवावे ही प्रशासनास विनंती)
रात्रीची जेवायची वेळ. बंड्या, आई, आणि बा जेवायला बसलेत. बंड्या एकदम खोल विचारात.
बंड्या(बांना): बा देवाला नाव कुणी ठेवलं?
(बा बंड्याच्या प्रश्नांनी एकदम चक्रावून जातात)
बा: आरं बंड्या, काय बी काय इचारतो.
बंड्या: आज की नई शाळेमंधी आमच्या वर्गात एक नवीन गुर्जी आलं व्हतं शहरातून. लै हुश्श्यार हाय म्हणं. आल्याआल्याच गुर्जीनं विचारलं देवाचं नाव कुणी ठेवलं सांगा पोरांनो.
स्मृतीची पाने चाळताना: दोन
स्मृतीची पाने चाळताना: एक
काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो.
मिसळपाव