Skip to main content

आषाढाच्या एक दिनी

लेखक नूतन यांनी मंगळवार, 28/07/2020 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढाच्या एक दिनी... कुंद,सावळ्या वातावरणी आषाढाच्या एक दिनी हिरवा डोंगर झाकून जाई पाऊसभरल्या मेघांनी स्तब्ध तरूंवरी स्तब्ध पाखरे लोकालयीही तीच स्तब्धता वाराही जणू रुसून बसला मनात भरवूनी उदासीनता अशात कुठुनी चुकार बगळा कापत जाई मेघांना भेदरलेली चिमणी बसली मिटून अपुल्या पंखांना असाच काही काळ लोटला अन् डोलू लागले वृक्षलता वा-यासंगे जणू मिळाली वर्षागमनाची वार्ता झरझर,सरसर पडू लागल्या धवल शुभ्र पाऊसधारा उदासलेल्या चराचरावर हो चैतन्याचा शिडकावा

शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

लेखक अनिल चव्हाण रामपुरीकर यांनी मंगळवार, 28/07/2020 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज सगळ जग डेवलप होतय , इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय , अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय | तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय , रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय, दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप || असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? मोठाले याप‍री ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात, देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात | पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार न ‌फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, || त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास , अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास | आज तोच झाला खाक अन

राजस्थानी घेवर

लेखक पियुशा यांनी सोमवार, 27/07/2020 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी ,कसे आहात ? मला यु ट्यूब वर नवनवीन रेसेपी पहायला न करून पाहायला पण आवडतात , असाच एकदा " राजस्थानी घेवर ची रेसेपी नजरेखालून गेली प्रकरण इंटरेस्टिंग वाटलं कारण हा पदार्थ मीच काय माझया घरच्यांनी हि पाहिला नाही खाणे तर लांबच म्हणून म्हणलं करून तर बघू अजून ३,४ व्हिडीओ बघितले तर काही जणांनी त्याला इतकं कठीण करून सांगितलं कि ,हिमालय चढणे सोप्प वाटू लागलं एक बया तर म्हणाली " भगवान ने चाहा तो आपके घेवर अच्छे बनेंगे और घेवर फ्राय करते सावधानी बरते नही तो आग लग सकती है , इतकं सगळं घाबरवल्यावर कुणाची हिम्मत होईल घेवर बनवायची ?म्हणून त्यावर घालण्यासाठी केलेली रबडी आम्ही बापड्यानी तशीच

वाटा वाटा वाटा ग..

लेखक Bhakti यांनी सोमवार, 27/07/2020 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी**** निशू...अबब..निशूबद्दल लिहायचं म्हणाल तरी अंगावर रोमांच येतो.all raounder ,सुंदर खळखळून हसणारी माझी निशू.हिची आणि माझी १ ते १.५ वर्षाचीच मैत्री पण जे कामच ,फिरायचं,खायचं ,प्यायचं ..trill मी हिच्या बरोबर अनुभवलं ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत.एकदा एक studant भाषणात बोलला होता “भक्ती madam आणि निशू madam दोघी सारख्याच आहेत.”खरच आम्ही जरा जरा सारख्याच होतो.पण निशू गर्भश्रीमंतीत वाढलेली लाडाची लेक होती.जास्त हट्टी होती पण तेवढीच हळवी होती.निशू विठ्ठल भक्त आहे . अशी बिनधास्त कार चालवायची की १५ दिवसातून एकदा तरी कार ठोकायाचीच कुठेतरी.सगळ्याना कार शिकवली चालवायला हिने

भुतंखेतं

लेखक जिन्क्स यांनी रविवार, 26/07/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
महिन्यातून एकदा ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्याच टेरेस वर रात्री जमून भोजनाचा आनंद घेत उशिरा पर्यंत गप्पा मारणे हा आमचा त्या वेळचा प्रघात होता. आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा आणि त्याचा आस्वाद घेत आमच्या गप्पा रंगायच्या. एका रात्री असाच तो मित्र याखनी पुलाव घेऊन आला होता. टेरेस कडे जातच होतो तेवढ्यात मी पाहिले की आमच्याच ऑफिसचा एक सीनियर डेव्हलपर एकटाच काम करत बसला होता. मी त्याला आमच्या सोबत यायचा आग्रह केला. तो आधी तयार नव्हता पण नंतर तयार झाला. त्या रात्री गप्पा अचानक भुतांच्या विषयावर आल्या.

शिक्षा (लघुकथा)

लेखक अभिरुप यांनी रविवार, 26/07/2020 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यापासून सतत बेचैन मनस्थितीत होता तो. काही समजत नव्हते त्याला. आपल्या भविष्याचे तारू कोठे जाणार हेच त्याला उमगत नव्हते. सततच्या बेचैनीला तो सुद्धा कंटाळून गेला होता. शेवटी काय होईल त्याला सामोरे जायचे असे मनाला सतत समजावीत होता. गेली तीन वर्षे नुसती फरपट सहन करत होता तो. असल्या जगण्यापेक्षा मरण बरे असे वाटे त्याला. त्या मरणाचीच वाट पाहत होता तो. स्वतःचा खूप राग येत होता त्याला. "च्यायला, वैताग आलाय नुसता या जगण्याचा. " असे म्हणून पचकन थुंकला तो . आयुष्य कधी कुणाला कसे घेऊन जाईल काही सांगता येत नाही.

वाटा वाटा वाटा ग..

लेखक Bhakti यांनी रविवार, 26/07/2020 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी**** “मैत्री अलवार नात चालत राहील पाहिजे निरंतर...” ही जर माझ्या आयुष्यात नसते तर मी मैत्रीचा गंध कधीच अनुभवला नसता.कारण माझ्याकडून मैत्री निभावली जाईला का याची मी काळजी हाकते.पण जी काही केल्या तुटतच नाही ती मैत्री...कधीही भेटलं तरी सहज संवाद साधणारी मैत्री असते... सुलू...प्रेमाने आम्ही अशीच हाक मारतो तिला.ती सगळ्यांना प्रेम वाटते ,तिला त्याहून दुप्पट मिळाव असे मला वाटत...आजही आमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या संपर्कात असणारी तीच आहे.सतत मदत करायला तयार असते.कस काय जमत तिला काय माहित?जोडण हे तिच्या स्वभावात आहे अस मला वाटत... सुलूच शालेय शिक्षण

दडपे पोहे.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 26/07/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
राहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी प्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे राजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी आणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी रोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी आले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे भूतकाळची तोडून नाती तमाशे केले ज्यांनी आता उभारती खोटे चि

दाभोळकर आणि साळगांवकर

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 26/07/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
*************************** आज सुटटी होती आणि रक्षाबंधन पण. सकाळी उठणं लवकरच होणार होतं, साहजिकचं होतं घरी पाहूणे येणारे होते, हो बहिण, आत्या येणार होती, आघोळं संपली आणि मग नेहमीसारखा टी. व्ही लावला, बातम्याचं चॅनेल लावलं, ब्रेकिग न्यूज होती, नंरेद्र दाभोलकराचीं पुण्यात गोळ्या घालून सकाळी हत्या केली होती, माझी पहिली प्रतिक्रिया होती, “असं नाय व्हायला पाहिजे होतं”. आणि मग टी. व्ही. वर झळकत होत्या मान्यवराच्या प्रतिक्रिया, दाभोलकरांनी दिलेल्या मुलाखती आणि इतर चित्रण विविध न्यूज चॅनेल दाखवत होते.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन

लेखक मदनबाण यांनी रविवार, 26/07/2020 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
कोव्हिड-१९ ने जगातल्या अगदी छोट्या व्यवसायां पासुन ते मोठ्या व्यवसायां पर्यंत सर्वांनाच ठप्प केले आहे हे आपण अनुभवतच आहोत... यातले अनेक व्यवसाय कायमचे बंद होतील तर काही त्यांच्या मूळ क्षमतेने कधीच काम करु शकणार नाहीत किंवा ती क्षमता परत मिळवण्यास बराच काळ जावा लागेल. अमेरिका आणि चीन चे शीत युद्ध देखील आपण पाहत आहोत याच शिवाय अमेरिकेत येणार्‍या निवडणुका देखील या संबंधावर प्रभाव टाकत आहेत आणि यापुढे देखील त्याचा प्रभाव होताना पहायला मिळेल. [ अमेरिका युद्ध सज्जता करतो आहे का ? तो युद्ध कधी करेल ? हे प्रश्न देखील सध्या मनात उद्भवले आहेत.