कोविड योद्धा - अथर्व
दि २३ ऑगस्ट ला माझा मोठा मुलगा ( वय २४ ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोविद केयर सेंटर मध्ये सेवेसाठी म्हणून दाखल झाला. घरात गणपती बसले होते पण त्याने ठरविल्याप्रमाणे तिथे जायचे ठरविले आणि बाप्पाना सांगून तो गरवारे कॉलेज पुणे येथील सेंटरमध्ये दाखल झाला. त्यापुर्वी ही त्याने स्क्रीनिंगचे काम केले होते पण आता थेट पॉझिटिव्ह लोकांच्याबरोबर काम करायचे होते. त्याला नव्हता पण आम्हाला थोडा ताण आला होता.
दि ३० ऑगस्ट पर्यंत त्याने एक आठवडा काम केले ,त्यानंतर विलगीकरण असे ठरले होते पण स्वयंसेवकांची कमतरता म्हणून तो पुढच्या बॅच मध्येही सामील झाला ..
मिसळपाव