वेळणेश्वर २०२०
गेल्या काही महिन्यांपासून घरात बसून खुपच कंटाळा आलेला होता. मुलीचेही ऑफिसचे काम घरूनच सुरु आहे. अशातच १ तारखेला माझ्या लग्न झालेल्या मोठ्या मुलीचा ठाण्याहून फोन आला. आम्हा दोघांना तीन दिवसांची सुट्टी आहे. कुठे फिरायला जायला मिळेल का. तुम्ही आणि आणखी कोणी येत असेल तर जाऊ सगळे मिळून. आमच्या शेजाऱ्यांना व मैत्रिणीला विचारले तर तेही लगेच तयार झाले. १० मोठे व एक छोटी मुलगी अशी अकरा जणांची टीम तयार झाली.
मुंबईच्या जवळची ठिकाणे शोधली तर खूप हॉटेलचे अव्वाच्या सव्वा दर मिळाले. जाण्याचे मन होईना. मग थोडे लांबच्या ठिकाणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पूर्वी एकदा वेळणेश्वरला गेलो होतो.
मिसळपाव