Skip to main content

गोव्याचा इतिहास भाग -२ ( शिवोत्तर काल )

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 02/12/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
संभाजी राजांचा उदय मराठी राज्याचा पाया घालणारा स्वातंत्र्यसुर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित.

चंद्रायण..!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 02/12/2020 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार!

व्यंगचित्रांच्या निमित्ताने...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/12/2020 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (संदर्भ: 2012 साली केंद्रीय विद्यालयांच्या राज्यशास्त्र- नागरीकशास्त्र विषयांतील अभ्यासाला पुरक असलेल्या स्वातंत्र्याच्या पहाट काळातील काही भारतीय राजकीय ऐतिहासिक व्यक्‍तींच्या व्यंगचित्रांमुळे भावना दुखावण्याचा प्रसंग उद्‍भवला होता. म्हणून तत्कालीन शासनाकडून अनेक चांगली व्यंगचित्रे त्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आली होती. त्यावेळी लिहिलेला हा लेख. पण ब्लॉगवर अजूनही प्रकाशित केला नव्हता.) आजचे राजकीय नेते नको इतके संवेदनाशील झालेले आहेत.

पुन्हा पानिपत!

लेखक मनो यांनी मंगळवार, 01/12/2020 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.

मुसाफिर..

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 30/11/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मुसाफिर... अवचित एका मुसाफिरानं, जीवनात पाऊल टाकलं.. भूतकाळाच्या क्षणांचं पान, त्यानं अलगद पुसून टाकलं.. परीस स्पर्शानं त्याच्या, मनाला मोहरुन टाकलं.. आभार कसे मानू त्या योगेश्वराचे, ज्यानं माझं आयुष्यच उजळून टाकलं....!! जयगंधा.. ३०-११-२०२०.

कुणीतरी...

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 30/11/2020 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीतरी.. कुणीतरी माझच मला, नव्यानं ओळखायला शिकवलं.. आरशाचं स्थान जनात नसून, मनात असलेलं दाखवलं.. विचारांच्या पसारा-याला, मनातच आवरायला शिकवलं.. बावरलेल्या मनालाही, आशाकिरणांनी सावरलं.. सैरभैर चित्ताला त्यानं, विवेक देऊन स्थिरावलं.. कोमेजलेलं चैतन्य, एका आशीर्वादानं फुलवलं.. बदक नाही, प्रत्येक जीव, राजहंसच आहे हे जाणवलं.. "त्याच्या"कडे बघताना, "त्याची"च हो, हे समजावलं...!! जयगंधा.. ३०-११-२०२०.

JRDTata : राष्ट्रपुरुष

लेखक महासंग्राम यांनी रविवार, 29/11/2020 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
JRD जाऊन आज २७ वर्षे झाली.अनेकांच्या विस्मृतीत गेलेला हा दिवस, ना फारशा श्रद्धांजल्या, ना सोशल मीडियावर ट्रेंड्स. भारताच्या विकासात आमूलाग्र योगदान देणारा हा माणूस (केवळ JRD च नाही अनेक आदरणीय उद्योगपतींची नावं त्यात घ्यावी लागतील.) पण उद्योजकवर्गाला कधीही maker of modern India वैगेरे पदव्या जोडल्या जात नाहीत.

भावातीत अवस्था - कोडींग करताना

लेखक वगिश यांनी रविवार, 29/11/2020 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर बरेच धागे विदेहत्व आणि भावातीत अवस्था यांची चर्चा करत आहे. लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे आम्हालाही भावातीत अवस्था गाठण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे .परंतु ते बोटात बोटे घालून बसण्याइतके सोपे नाही किंवा कुठल्याही नशेत तंद्री लागण्याइतका सरळ हि नाही . हि अवस्था गाठण्यासाठी १०-१५ वर्षांची तापशर्या आहे . संगणक विज्ञान आणि अणुविद्युत तंत्रज्ञान शिकण्यासाठी अतीव मेहनत घेतली आहे .अनेक गुरु व ग्रंथ यांचे आमच्या तपात मोलाचे योगदान आहे. हि अवस्था गाठण्यासाठी आम्हला कुठल्याही एकांताची वा विशिष्ट जागेची गरज नाही, गरज आहे ती फक्त एका ट्रिगर ( प्रेरणा ?) ची. हा ट्रिगर आम्हाला अनेक रूपाने मिळतो.

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 29/11/2020 12:55 या दिवशी प्रकाशित केले.

'अरूणाचल पंचरत्नम' (भावानुवाद)

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 29/11/2020 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २९/११/२०२० (कार्तिक पौर्णिमा) प्रस्तावना: भगवान रमण महर्षींचा आश्रम पंचमहाभूतांपैकी अग्निचे स्वरूप, तसेच साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या अरूणाचल पर्वताच्या पायथ्याशी आहे हे आता तसे सर्वज्ञात आहे. दर वर्षी तमिळ पंचागाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला अरूणाचलाच्या शिखरावर दीप महोत्सव असतो.
काव्यरस