Skip to main content

पहिला क्षण-पहिला अनुभव

लेखक इनोबा म्हणे यांनी रविवार, 06/01/2008 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही 'पहिले क्षण' येतात जे आपल्या कायमचे लक्षात राहतात.पहिला पऊस प्रेयसीसोबतचा...तो प्रेमाचा 'ओलावा'...गारठलेले दोघे आणि गरम-गरम भजी,पहिला दिवस कॉलेजचा...तिला पहिल्यांदाच पाहण्याचा तो क्षण...काय 'सॉलीड' दिसत होती, शाळा-कॉलेजमधले पहिले स्नेह संमेलन...स्टेजवर जायचा तो पहिलाच क्षण आणि नेमके संवाद विसरलेले तुम्ही,पहिला प्रयत्न तिला 'प्रपोज करण्याचा'...घाबरलेले तुम्ही आणि बिथरलेली 'ति',पहिलीच ओली 'पार्टी'...मित्रांचा आग्रह आणि नुसत्या वासानेच झिंगलेले तुम्ही.तुमच्या बाबतीत घडलेय का असे काही?असेल तर आम्हालाही सांगा.

गणपती पुळे सहल

लेखक झकासराव यांनी शनिवार, 05/01/2008 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती पुळ्याला जावुन आलो. त्याचे फोटो लावले आहेत पिकासावर. बघुन घ्या. :) http://picasaweb.google.co.uk/zakasrao/TripToGanapatiPuleNearRatnagiri ganesh mandir हा एक अत्यंत सुंदर (माझ्या मते) असा समुद्राचा फोटो देण्याचा मोह आवरत नाहिये :)

नवी रेशमी वीण..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 05/01/2008 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मागे ऋषिकेश यांनी चारोळीचा सुंदर गोफ विणला होता. आपण सर्वांनी त्यात खूप मदत केली होती. आता या नव्या वीणीमध्येही मदत कराल अशी आशा आहे. पण ही थोडी वेगळी आहे. यात २ नियम आहेत. १. चारोळी ही चारच ओळींची असावी. पाचोळी नको. २. चारोळी लिहिताना त्यामध्ये आधीच्या चारोळीतील एक शब्द आलेला असावा... कृपया नियम मोडू नका.
Taxonomy upgrade extras

पी.जे. (अतिशय फालतू जोक)

लेखक प्राजु यांनी शनिवार, 05/01/2008 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक शिक्षिका शाळेत शिकवत असतात. शिक्षिका : व्हेल मासा हा जरी मोठा असला तरी तो माणसाला गिळू शकत नाही." छोटी रिया : " पण मॅम, माझा फ्रेंड जॉनला व्हेल माशानेच गिळले होते". शिक्षिका : नाही. कारण व्हेल माशाचा घसा लहान असतो. तो माणसाला नाही गिळू शकत" रिया : पण खरंच जॉनला व्हेलनेच गिळले होते. शिक्षिका : अगं! ते कसं काय? रिया : मी स्वर्गात गेल्यावर जॉनला विचारून सांगते तुम्हाला. शिक्षिका : आणि जॉन स्वर्गाऐवजी नरकात गेला असेल तर..? रिया : तर मग तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा विचारून सांगा मला. :))))))) ( हा फॉर्वर्डेड मेल मधून आलेला जोक आहे)

मिसळपावचा छापील अंक

लेखक इनोबा म्हणे यांनी शुक्रवार, 04/01/2008 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावची ख्याती आता सर्वदूर पसरली असताना मिसळपावची छापील आवृत्ती ही काढायला हरकत नाही असे मला वाटले.याच विचारातून 'मिसळबोध'(मला सुचलेले) या अंकाची कल्पना मला सुचली.या अंकाद्वारे मिसळपावच्या सदस्यांना आपले साहित्य रसिक वाचकांपर्यंत पोचवायला आणखी एक माध्यम मिळेल. शिवाय... १)महाजालावर साहित्यचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बरेचसे लेखक आपले साहित्य प्रसिद्ध करायला धजावत नाहित. २)ज्या रसिक वाचकांना इंटरनेटचा वापर करता येत नाहीत अशा वाचकांपर्यंत आपले विचार व साहित्य पोचेल. सहजच मिसळपावच्या जुन्या लेखांवर नजर टाकली तेव्हा ,शिमगा अंकाची एक संकल्पना वाचनात आली.चांगली वाटली.तुम्हाला काय वाटतं? स

पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 04/01/2008 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, येत्या २६/२७ जानेवारी (शनि-रवि) या दिवशी आम्ही पुण्यात पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन घ्यायचं ठरवलं आहे! अहो असे दचकू नका! अलिकडे आमच्याच जातीतल्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन पुण्यात पहिलं चित्तपावन संमेलन भरवलं होतं तेव्हा म्हटलं आपणही पुण्यात पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन भरवावं! :) जाऊ द्या, 'पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन' हे शब्द जर अगदीच जड वाटत असतील तर आपण आपलं त्याला 'पहिलावहिला मिसळपाव कट्टा' असं म्हणू! अहो आपल्या मिसळपाव परिवाराचा जीव तो केवढासा? अवघ्या तीनशे-साडेतीनशे लोकांचं हे आपलं एक छोटेखानी संस्थळ आहे तेव्हा उगाच कशाला संमेलनासारखे मोठे शब्द वापरा?!

पंचमदांना श्रद्धांजली

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 04/01/2008 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज ४ जानेवारी. महाराष्ट्राचे जावई श्री. राहूल देव बर्मन ऊर्फ पंचमदा यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! एस्.डी. बर्मन, पत्नी मीरा, पुत्र आर्.डी. बर्मन आणि स्नुषा आशा

नवीन वर्षाचा संकल्प

लेखक ब्रिटिश टिंग्या यांनी गुरुवार, 03/01/2008 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी छोटी टिंगी. सरत्या वर्षाच्या पुर्वसंध्येला मी प्रथमच मिसळपावाला भेट दिली. तसा पुर्वीपासून आपल्या "मायबोली"तून स्वतःचे "मनोगत" व्यक्त करीतच होतो. परंतु कुठे ती मिसळपाव आणि कुठे ते अळूचं फदंफदं...... असो, सालाबादाप्रमाणे आम्ही या वर्षीदेखील काही संकल्प "सोड"लेले आहेत (कॄपया शब्दश। अर्थ घेणे आणि ह.घ्या.) त्यांचे तपशील पुढीलप्रमाणे - १. या वर्षी आम्ही शिवराळ/ द्वैअर्थी भाषा अजिबात वापरणार नाही. अपवाद : चुकुन तोंडातून निघाल्यास आणि मिसळपावावर आल्यानंतर........च्यामारी आता मिसळपावावर तात्या वगैरे लोकांच्या संगतीत आल्यावर 'घंटा' ही सवय सुटणार? २.

शब्द!

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 03/01/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
हास्य.. एक चिरंतन हास्य.. हास्यच आणेल तुजला समीप माझ्या कळू देऊ नकोस जाणे तुझे कारण तेच आणेल पाणी डोळ्यात माझ्या दुनियेने घालविली रया नवे पर्व सुरू करूया आजच्या आज... प्रियतमे... तुजला नेहमी असेच वाटे माझे हरेक शब्द असती खोटे.... खरंतर... शब्द आणि केवळ शब्दच गं... आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी गोड शब्द असोत तुझे चिरंतन कर त्यांना तू मजला अर्पण अन् माझा जीव आहे तुझी साठवण प्रत्येक प्रसंगी असो माझीच आठवण तुजला नेहमी असेच वाटे माझे हरेक शब्द असती खोटे.... खरंतर.... शब्द आणि केवळ शब्दच गं... आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी शब्द आणि केवळ शब्दच गं... आहेत माझ्याजवळी...