Skip to main content

संडे स्पेशल ( कोळंबीचा भात)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 17/02/2008 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांच्या विनंतीला मान देऊन...... साहित्यः १/२ किलो कोलंबी १/२ किलो तांदुळ ४-५ वाट्या नारळाचे दुध (साधारण २ नारळाचे) १ टी.स्पून तिखट २ टी.स्पून आले, लसुण पेस्ट ( १ इंच आले व ७-८ लसूण पाकळ्या) १वाटी तेल मसाला (४ लवंगा,२ दालचिनीचे तुकडे, ४ वेल्दोडे, १/२ टी.स्पून जिरे, २ तमाल पत्रे) १ टी.स्पून गरम मसाला १ टी.स्पून बडीशेप, १ टी.स्पून जिरे पावडर १.टी.स्पून हळद चवीनुसार मीठ १.तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. २.कोळंबी धुवून हळद व मीठ लावून ठेवावी. ३.पातेल्यात तेल गरम करून त्यात वरील मसाला घालावा.

संडे स्पेशल ( कोंबडी वडे)

लेखक स्वाती राजेश यांनी शनिवार, 16/02/2008 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंत भाऊ यांच्या विनंती वरून ही रेसपी देत आहे. कोल्हापूर मध्ये ही वडा कोंबडा या नावाने ओळखतात.

मला आलेले एक स्वारस्यपूर्ण अग्रप्रेषित (Forward)

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 16/02/2008 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
दादरला चित्रा सिनेमाच्या समोरच्या गल्लीत शिरले की एक पोलीस चौकी लागते. तिला खेटूनच एक सायकल दुरुस्तीचे बिननावाचे एक छोटे दुकान आहे. हे दुकान श्री. भूमकर यांचे आहे ज्यांना लोक भाऊ म्हणून ओळखतात. ह्यांचे शिक्षण बेतास बात आहे मात्र वाचन सर्वांगीण आहे. दुकानात प्रवेश केला की समोरच हाताने लिहिलेले विविध फलक दिसतात ज्यावर अनेक संतवचने, सुवचने, मनोगते दिसतात त्या पैकी मला भावलेले काही विचार पुढे देत आहे - १) माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. २) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात.

फोटू कसे टाकू

लेखक बुध्दू बैल यांनी शनिवार, 16/02/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या प्रोफाईलवरच आपला किंवा आपल्याला हवा तो फोटू टाकता येतो का??

ओळख परेड(नविन सदस्यांची ओळख)

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 16/02/2008 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत! काही नविन सदस्यांनी आपली ओळख करुन देण्याकरिता स्वतंत्र थ्रेड टाकले आहेत.त्यापेक्षा सर्वच सदस्यांना एकमेकांची ओळख सांगण्याकरिता या एकाच थ्रेडचा वापर करता येईल.अर्थात आपल्याला स्वतंत्र थ्रेड बनवण्याची इच्छा असल्यास आपणास त्याचे स्वातंत्र्य आहे(लोकशाही आहे हो आमच्याकडे),सदस्यांच्या सोयीकरिता हा खटाटोप. नविन सदस्यांना काही अडचणी जाणवल्यास त्या येथे टाकाव्यात,जाणकार सदस्यांकडून तत्काळ मदत होईल. आपलाच मिपाकरी, इनोबा

नमस्कार..

लेखक अतिउत्साही यांनी शनिवार, 16/02/2008 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मी "अतिउत्साही" ! नवीन सदस्य ! बर्याच दिवसांपासून मि.पा. वाचत होतो. म्हटलं काहीतरी लिहावं. मी बरंच काही लिहीत असतो. ते लिखाण आंतरजालावर टाकण्याची ही माझी पहिलीच वेळ. बरंच काही मनात आहे, ते लिहून काढायचं आहे. तर हा श्रीगणेशा!

उद्‌घाटन, नको रे बाबा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 16/02/2008 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
बाबूराव पाटील म्हणजे अवली माणूस. गोंधळे बुद्रुक गावाचे सरपंच; पण रुबाब पंतप्रधान असल्याचा. अडल्यानडल्याची कामं करतील, पण प्रत्येक ठिकाणी मिरवायला मिळालं तर! लग्न असो, मुंज असो, साठी-पंच्याहत्तरी असो की श्राद्ध; बाबूरावांना काही वर्ज्य नाही. श्रद्धांजली सभेतही असं भाषण ठोकणार, की निवडणुकीच्या प्रचाराची सभा आहे की काय, असंच वाटावं. या अतिउत्साहापायी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यातही बाबूराव पटाईत. कधी तोंडघशी पडतील, याचा नेम नाही. बरं त्याचं यांना सोयर ना सुतक. आजूबाजूची मंडळीच खजील व्हायची. बाबूराव मात्र जय की थय! एकदा काय झालं, गावातल्या कुणातरी मान्यवराचं दुःखद निधन झालं होतं.

जोधा अकबर पाडण्यासाठी मराठी विरोधी लॉबिंग?

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 16/02/2008 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
लगान, स्वदेस आणि जोधा अकबर, असे एका पाठोपाठ एक दर्जेदार चित्रपट तयार करणार दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून चक्क मराठी आहे. त्याचे नाव आहे, आशुतोष गोवारीकर. महाराष्ट्र टाईम्समधील ही संतापजनक बातमी वाचा. (कट्टर मराठी) -इनोबा

आपल्याच नादानपणाचा कळस!!

लेखक वडापाव यांनी शनिवार, 16/02/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
वासुदेव बळवंतरावांचा वाडा भुईसपाट होणार, ही बातमी आज पेपरात वाचली,आणि आपल्याच नादानपणाचा उबग आला.

लिलीची फुले

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 16/02/2008 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
लिलीची फुले तिने एकदा चुंबिता, डोळां पाणी मी पाहिले....! लिलीची फुले आता कधीही पाहता, डोळां पाणी हे साकळे....! - पु. शि. रेगे
Taxonomy upgrade extras