Skip to main content

"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 21/02/2008 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रशांत दामलेंच " एक मस्त गाणं आहे बघा "कसं जगायचं , कसं वागायचं ? कोणी सांगेल का मला ? " अशीच माझी अवस्था झाले आहे आज. का म्हणून काय विचारता ? सांगतो .......... काल मस्त सुट्टी घेतली आणि आज जरा फ्रेश मूड मध्ये कार्यालयात आलो . आल्यावर नेहमीच्या प्रघातासारखे काही महत्वाच्या व्यक्तींना "गूड मॉर्निंग घालून" झाल्यावर [ त्या बाबतीत आम्ही अगदी 'बापू काण्यांच्या' हातावर हात मारला आहे] आमचा 'मेलबॉक्स' ऊघडला. पाहतो तर काय एकूण ५२ 'अनरीड मेल्स ".

शाळेतील गमती जमती

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 21/02/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतील गमती जमती.... यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत. तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका..... यावर एक मेल द्वारे आलेली कविता मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

सुविचार, छायाचित्रे..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 21/02/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मिसळपाव परिवारातील प्रत्येकाचे स्वागत! आजपर्यंत श्री गजाननाच्या, आई अंबाबाईच्या, आई योगेश्वरीच्या कृपेने, भाईकाकांच्या, बाबूजींच्या, भीमण्णांच्या आणि कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे मिसळपावने इथपर्यंत वाटचाल केली, आणि यापुढेही अशीच करेल अशी खात्री वाटते! येत्या एक दोन दिवसात मिसळपावच्या मुखपृष्ठात काही बदल करायचे ठरवले आहे. सध्या मिसळपावच्या डाव्या बाजूला नेहमी मिसळीचे चित्र लावलेले असते.

पोतडी

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 21/02/2008 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
balbharati
. . . . मध्यंतरी सहज मी एकाला म्हटले, तू आमच्या दोघींच्या मैत्रीत उत्प्रेरक होतास तर त्याला मजा वाटली. म्हणाला, "शाळा संपल्यावर पहिल्यांदाच हा शब्द ऐकला". . . परवा मिपा वर कोणी तरी अभिप्रायात "गृहितक" लिहिले आणि परत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला....

ईस्ट कोस्ट स्पेश्शल!!!!

लेखक वरदा यांनी गुरुवार, 21/02/2008 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी, प्राजु, धनंजय आणि मुक्तसुनीत एवढे जमलो अजुन कोण कोण आहे? न्यूजर्सी ला जमूयात माझ्या घरीही हरकत नाही..किंवा हॉटेलही भरपूर आहेत....बोला कधी जमूयात? एप्रिलच्या आसपास म्हणाल तर माझ्याकडे या बार्बेक्यू करु....विंटर मधे किती जणांना जमेल माहीत नाही....

पथ्य

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 21/02/2008 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची सुरेख कविता नेपथ्य का शेवटी माकड पिणार्‍याचे होते ? माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते ! चालता लुडकतो इकडे तिकडे पडतो हे असेच नेहमी बेवड्यांचे होते लागली वळाया नजर सारखी माझी हे लक्षण रे थोडी चढल्याचे होते तू चषक कशाला दिलास हातामध्ये ? मज दिसू लागले चित्र उद्याचे होते सोडता सुटेना मदिरा माझ्याच्याने मज खरे प्रलोभन मदिराक्ष्यांचे होते जर ताड, माड अन् मोह असे देशीही मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ? वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई जे काय फरक ते त्या पथ्याचे होते

...का?

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 21/02/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींची कविता "...का?" ही आमची प्रेरणा - ..................................... ...का?
Taxonomy upgrade extras

एक नेपाळी गीत...

लेखक मनस्वी यांनी बुधवार, 20/02/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
(मला विरोपातून आलेले)
नेपाळी गीत

(चाल: सुनो गौर से दुनियावालो)

शुनो गोर शे दुनियावालो

चाहे कितने महल बना लो

उश के आगे लॉन उगा लो

उश के आगे गेट लगा लो

उश के आगे होंगे हम नेपाली!!!!

सोल बांगडे

लेखक राजमुद्रा यांनी बुधवार, 20/02/2008 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बांगड्याचे ६ तुकडे (मध्यम आकाराचे) लसूण पाकळ्या ६/७ धणे पावडर ३/४ चहाचा चमचा हळद चिमूटभर लाल मिरची पावडर १ चहाचा चमचा कोकमचे तुकडे ३/४ तेल १ चचमचा पाणी १/२ कप मीठ चवीनुसार पध्दतः लसून ठेचून घ्या. कढईत तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण १ मिनिट भाजून घ्या. नंतर धणे पावडर, मिरची पावडर, हळद घाला. १ मिनिटानंतर बांगड्याचे तुकडे घालून परता.आता १/२ कप पाणी घाला. कोकमचे तुकडे घालून मासे शिजवून घ्या. (बांगडे पारदर्शक रंग सोडून पांढरट दिसायला लागले की शिजले आहेत असे समजावे.