Skip to main content

मिसळपाव- एक कुरण..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 25/02/2008 02:02 या दिवशी प्रकाशित केले.

इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..

मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,
तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..

ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,
दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..

आमचेही काही प्रश्न...

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 25/02/2008 01:11 या दिवशी प्रकाशित केले.

सप्रेम नमस्कार,

आम्ही या संकेतस्थळावर तसे नविनच सदस्य आहोत.  सरपंचांपासुन स्फूर्ती घेऊन आम्हाला पडलेले काही कॉमन प्रश्न इथे देत आहोत.  कुणाला उत्तरे माहिती असल्यास देण्याची कृपा करावी...

१०.  मि. पा. वरील सदस्यांची सध्याची एकूण संख्या किती?

९.  मि. पा. वर अधूनमधून एका सुंदरीचे चित्र दिसते.  ही बया कोण, (आणि मुख्य म्हणजे) कुठे भेटेल?:)

८.  मि. पा. वर दारूचे नांव काढताक्षणी सगळे इतका आनंदकल्लोळ का करतात?

७.  चतुरंगसाहेब बुध्दिबळपटू असावेत का?

लेख अप्रकाशित, क्षमस्व!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 25/02/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.

स्वाती दिनेश यांचा 'ले गयी दिल दुनिया जपान की (भाग ८)' हा सुंदर लेख तूर्तास अप्रकाशित केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे एक तर बर्‍याच जणांना हा लेख उघडताच आलेला नाही तसेच ज्यांना उघडता आला आहे त्यापैकी काहींना प्रतिसाद देता आलेला नाही/येत नाही.

मिसळपावच्या बदललेल्या स्वरुपानुसार/मुळे, ही काहीतरी तांत्रिक अडचण उद्भवली असावी/आहे. तरी तिचे पूर्ण निराकरण/निवारण झाल्यावरच हा लेख पुन:प्रकाशित करण्यात येईल म्हणजे वाचकांना तो वाचण्यास आणि त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाही अडथळा येणार नाही.

स्वाक्षरी कशी जोडावी ?

लेखक सरपंच यांनी रविवार, 24/02/2008 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर प्रत्येक प्रतिक्रिये सोबत आपली स्वाक्षरी जोडण्याची सोयआहे. याचा वापर करून कित्येक सदस्यं आपल्याला आवडलेले वाक्य अथवा सुभाषीत देण्यासाठी करतात. काही त्यातुन आपली ओळख करून देतात. आदी उपयोग केल्या जाऊ शकतात.

तर ही स्वाक्षरी जोडावी कशी ?
सर्वात आधी डाव्या समासातील माझे खाते वर टिचकी द्या.
नंतर संपादन मधे जा.

मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

लेखक सरपंच यांनी रविवार, 24/02/2008 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांपैकी हा एक महत्वाचा प्रश्न आहे.
सरळ मिसळपाव वर फोटो चढवण्याची सोय नाहिये. त्या ऐवजी इतर फोटोहोस्ट करणार्‍या साईटवर तो फोटो आधी चढवावा व नंतर त्या फोटोचा पत्ता ( path)  येथील संपादकामधील फोटोचे बटन दाबल्यावर आलेल्या चौकटीत द्या.
Photo Upload

फोटो जोडल्या जाईल.

फोटो होस्ट करण्यासाठी याहूची फ्लिकर (http://www.flickr.com)
 किंवा

गमभन ०८.०२.२० आवृत्ती प्रकाशित..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 24/02/2008 18:27 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

आपल्याला सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव डॉट कॉमच्या अक्षर-सामर्थ्यदात्याने, म्हणजेच गमभन ने आता कात टाकली असून त्याची पुढील आवृत्ती 'गमभन ०८.०२.२०' ही आता प्रकाशित झाली आहे आणि मिसळपावला जोडली गेली आहे!

कन्नमवार नगर (विक्रोळी ,पुर्व) मुंबई

लेखक विकि यांनी रविवार, 24/02/2008 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कनमवार नगर, विक्रोळी येथील सभेत उत्तर भारतीयांविरोधात जे विधान केले . व त्यांची अटक आणि सुटका तेथील न्यायालयात झाली . त्यामुळे अचानक कन्नमवार नगर चे नाव सगळीकडे झाले. तर अशा कन्नमवार नगर ,विक्रोळी येथील भागाविषयी आम्हाला मिळालेली माहीती. मध्य रेल्वेच्या विक्रोळी (पुर्व )या उपनगरापासून अवघ्या १५ मिनिटांवर कन्नमवार नगर आहे. महापालीकेच्या 'एस ' विभागात हा प्रभाग येतो. प्रभागाचा क्रमांक आहे ११२.साधारण ६० ,७० च्या दशकात वसलेली अशी ही म्हाडाची वसाहत . या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी म्हाडाची आदर्श वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे.

बुध-शुक्र युती दिनांक २६/०२/२००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 24/02/2008 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो ! दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्राची युती मकर राशीत होते आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बुध आणि शुक्र हे मकरेत १६ अंशांवर असतील. कोणत्याही दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतियोगाला फलज्योतिषात फारच महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या युतीत असतात तेव्हा ते एकमेकांचे कारकत्व वाढवित असतात किंवा त्याचा नाश करतात. बुध शुक्र युतीबद्दल बोलायचे झाले तर हे दोन ग्रह "अंतर्वर्ती" ग्रह आहेत. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये हे दोन ग्रह आहेत. त्यांच्या नंतर सूर्यमालेत पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पुढे मंगळ गुरू शनी वगैरे ग्रह आहेत.