Skip to main content

नको मारू खडा रे सख्या

लेखक फटू यांनी शनिवार, 12/04/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
(1993 च्या आसपास कधीतरी आलेल्या दलाल या मिथुन चक्रवर्ती अभिनीत टुकार हिंदी चित्रपटातील "ठेहरे हुए पानीमें" या भावस्पर्शी गीताचा स्वैर मराठी अनुवाद...) नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्यावर उमटतील रे तरंग त्याचे माझ्या स्तब्ध या मनावर तुझ्यासाठी अनोळखी मी अन् तुही तसा परका मला कसं जाणल तू दु:ख माझं घाव जगापासून लपलेला सा~यानाच वेड असतं रे फुलांचं कुणी प्रेम करत नाही काट्यांवर मीही अशीच एक अभागी काटा नसू दे रे त्याची सावट तुझ्यावर तूच सांग रे सख्या मला आता कसा घ्यायचा स्वप्नांचा झोका अपुर्‍या राहतील इच्छा मनीच्या चालत नसते कधी वाळूत नौका नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्याव

महात्म्याला आदरांजली.

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 11/04/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
Jyotiba Fule
आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन. महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली. त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले.

ढोकळा

लेखक चकली यांनी शुक्रवार, 11/04/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, याप्रकारे ढोकळा मस्त होतो.
Taxonomy upgrade extras

थोडे असे, थोडे तसे

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 11/04/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

बंगळूरवासी मिपाकर...

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 11/04/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
बंगळुरात कुणी मिपाकर आहे काय? पुढील आठवड्यात मंगळवार ते गुरुवार बंगळूरात आहे, जमल्यास गाठ भेट होईल.

भारत एक खोज

लेखक परीचा परा यांनी शुक्रवार, 11/04/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर वर्षांपूर्वी भारत एक खोज ही मालिका नेमाने पहायचो. तेव्हाचे ते टायटल चे मंत्र जाम आवडायचे आम्हाला. मायाजालावर आम्हाला ते मिळाले ...

काही आठवत नाही

लेखक शितल यांनी शुक्रवार, 11/04/2008 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता मी ११ वीत असताना वाचली होती एक तारका हवी होती आकाश सजविण्यासाठी एक स्पर्श हवा होता धु॑द क्षण जगण्यासाठी एक तुच हवी होतीस मला साथ देण्यासाठी

नचिकेताचे उपाख्यान कोणी सांगेल का?

लेखक सागर यांनी शुक्रवार, 11/04/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
नचिकेताचे उपाख्यान कोणाला माहीत आहे काय? असेल तर कृपया सांगावे ही विनंती. एखादा यावर लेख कोणी लिहिला तर आनंदच वाटेल. एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे. त्यानंतर नचिकेत आणि यम यांचा संवाद ते नचिकेताचे उपाख्यान. यात यमलोकाचे वर्णन नचिकेताने केलेले आहे. मला नचिकेताची अशी फक्त ढोबळ अशी गोष्ट माहित आहे. पण मला सविस्तर जाणून घ्यायचे आहे. कोणी सांगेल का? (वेदोपनिषदप्रेमी) सागर

बरेच काही उगवून आलेले - द. भा. धामणस्कर

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 11/04/2008 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून नुकतेच हे पुस्तक घेतले, आणि ह्या कवितांच्या प्रेमातच पडलो. अतिशय सहज-सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, आकाश, निसर्ग ह्याच्यांभोवती गुंफलेल्या बहुतेक कविता - आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा! केवळ अफलातून!! अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणार्‍या ह्या कविता आहेत. त्यात काही मुलीविषयी, नातवाविषयी, आईविषयी आणि पोरक्या, गरीब मुलांविषयी देखील कविता आहेत; पण त्यांच्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसामावेशक निसर्ग आणि त्याची असंख्य रुपे आणि रुपके.

इंटरनेट ट्रेडींग

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 11/04/2008 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इंटरनेट वर अशा अनेक साईट्स आहेत ज्यांच्यावर अनेक वस्तु विक्रीस ठेवलेल्या असतात. (उदा. रेडिफ, ईबे वगैरे). यासंबंधी मला पडलेले काही प्रश्न खाली लिहिले आहेत. त्यांची उत्तरे मला येथे मिळतील अशी आशा वाटते. १] जर क्रेडीट कार्ड नसेल तर वस्तु विकत घेता येतात का? डेबीट कार्ड चालते का? २] वस्तुच्या गॅरंटीबद्दल काय खात्री? ३] वस्तु घरी पोहोचेपर्यंत जर काही इजा झाली तर जबाबदार कोण? कंपनी रिप्लेसमेंट देते का?